Skip to main content

नवविवाहितेचे आईस पत्र ........

लेखक युगन्धरा@मिसलपाव यांनी सोमवार, 02/12/2013 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय आई, प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमाराची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने न्ह्वेत. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे न्हवे. तर त्याहि पलिकडे लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितका वेळ झोपु नाहि शकत. मला सर्वांच्या आधी उठणं गरजेच आहे. मी गबाळयासारखी घरभर फिरु नाहि शकत. मी टापटीप राहाणं गरजेच आहे. वाटेल तितका वेळ लोळू नाहि शकत. वाटेल तितका वेळ तुझ्याशि फोनवर बोलु शकत नाहि ........... मी ए़खाद्या राजकुमारीसारखी मला वागणू़क मीळावी अस नाहि म्ह्णत. पण मला माझ्या घरच्यांची काळजी घेणं गरजेचे आहे. मी मला हव्या त्या वेळि आणि ठीकाणी मनाला वाटेल तेव्हा नाहि जाउ शकत. अगदि तुझ्याकडेहि नाहि...........ग............. एकेकदा मी स्वत: ला विचारते , ' का बरं मी लग्न केलं असेल?'. खुप खुश होते ग मी तुझ्यासोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत. खुप गप्पा माराव्याशा वाटतात. मला घरी यायचं आहे तुझ्या हातचं जेवायला. माझ्या आवडीच्या डीशेस चाखयला. सगळ्या नातेवाइकांचे, शेजार्यांचे नविन किस्से एकायला. वेगवेगळ्या गोश्टि शेअर करायच्या आहेत. पण अचानक मला जाणिव झाली कि तु हि पण लग्न केलसं ना? कूटुंबा साठी किति त्याग केलेस. आहे त्या मधे खुप समाधानी राहिलिस. ना कधि दागिन्यांसाठी हट्ट केलास ना कधि कपड्यांसाठि ........ आपल नविन घर घेतल तेवा आठवतय मला तुझे सगळे दागिने गहाण टाकले होते. आम्हि खुप शिकाव म्हणुन तु आणि पप्पांनि घेतलेले श्रम आजहि आठवतात. तुम्हि दोघांनी संसार केला नसतात तर आज माझ्या जवळ ज्या काहि गोड आठवणी आहेत त्या कदाचित नसत्या. हे सर्व आठ्वून मी खुप शांत होते आणि मला माझ्या सासरि असण्याचा अर्थ उमगतो. मुलीच्या माहेरपणा साठि आई सासरि नांदते हेचं खरे. वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी मी ही रुळेन या सर्वांमधे. आणी लग्ना नन्तरचं आयुश्यही आवडु लागेल मला हळु हळू........................................... तू आणि पप्पांनी केलेल्या त्यागां बद्द्ल आणि तड्जोडिं बद्द्ल शतशः प्रणाम......... तेच माझ्या साठि प्रेरणा दायि आणि माझे बळ वाडवणारे ठरतात.......................................................
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23467
प्रतिक्रिया 137

प्रतिक्रिया

लेखाचे नाव ठेवुन खुप अपेक्षा ठेवुन आलो होतो ...छ्या: भलताच अपेक्षाभंग झाला . अवांतर : लेखाचे नाव आठवुन २-४ जोक आठवले .....पुरुषांसाठी एक क्लोस्ड गृप काढाच हो

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या भावना पुरुषांना कळणार नाहित. तुम्हाला लग्न करुन थोडीच सासरी जाव लागत?

In reply to by युगन्धरा@मिसलपाव

लग्न करुन सास्रि गेलेल्या पुरुषांच्या भावना सम्जून घेत्ल्यात कधी?

In reply to by अत्रुप्त आत्मा

वरच्या परतिसादात यक अ‍ॅडीशन र्‍हायलं! नवनवं टायपो असुदल्येखन वाचून .................................... "किच्चू ताईची आठवण येते!" =)) किच्चू ताई लवकर ये ना.......! :-/ कित्ती दिवस झाले गायबच हाए! :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

ओ स्मायलीवाले बाबा लोकांना मराठी लिहिण्यास उद्युक्त करावे की त्याचे पाय खेचावे. मराठी माणुस शोभता हं अगदी.........

In reply to by युगन्धरा@मिसलपाव

कोणत्याही नवीन संकेतस्थळावर पहिले काही दिवस सासरी आलाचाच फील येतो गं सये :D

In reply to by प्रसाद गोडबोले

हो अगदि अगदि , गिरिजा काकाचा तर भय्यानक छळ केला होता =)) माझ्या तर मधुचंद्राच्या वेळी मला सळो कि पळो करुन सोडलं होतं :-/

In reply to by पैसा

ओह्ह पण मग तो मराठी शब्द णाय वाटत मराठी नसेल तर : ओ सासुबै मराठित लिवा कि , निलकान्त काका खिशातले पैसे भरतात मिपा नावाच्या मराठी संकेत स्थळासाठी :-/ उगा आपल्या दुसर्या भाषेचा प्रचार करताय्त ....:-/ :-/ ' तर ' म्हटलय हं सासुबै ... :-/

In reply to by जेनी...

मला पण तुमची भाषा कोणती ते कळत नै कधी. म्हणजे मराठीसारखी वाटते, पण मराठी नक्कीच नै.

In reply to by जेनी...

येन्नी नाय वो सासुबै .... तुमी तुमी तुमच्या मधुचंद्राला तुम्हाला पैसातैंनी सळो की पळो करुन सोडले होते? ?? हतबुद्ध झालेला (अशी स्माइली शोधा रे कोणीतरी)

In reply to by अत्रुप्त आत्मा

माफ करा लेखनाच्या चुका झाल्या बद्दल.......... पोटफोड्या श कसा लिहितात? जरा सांगाल का?

In reply to by युगन्धरा@मिसलपाव

एकदा लिहून कॉपी पेस्ट आपलं चोप्य पस्ते करताय काय? आम्हाला समजत नै वाटलं काय ;)

लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमाराची स्वप्ने रंगवत होते.
कठीण आहे :(

In reply to by मनीषा

हसायला नको, हसायला नको म्हणून दोनदा इथं येऊन हसून गेले गं बाई!

In reply to by रेवती

नवकलाकारांच्या लेखांवर असे दोनदा येऊन हसणर्या संपादकांना काय म्हणावे ब्वॉ?.:) :) खाली पैसा ताई बघ कशी हौसला अफजलखान करतेय नव्या लोकांचा!!!

In reply to by आनन्दिता

>>>नवकलाकारांच्या लेखांवर नकलाकारांच्या म्हणताय का? (भाषांतर म्हणजे नक्कल) भाषांतर आहे असं स्वतःच त्या नवकलाकार नकलाकार म्हणत आहेत. पैसातै डोक्यावर जिरेटोप नि बोटात वाघनख्या वगैरे घालून नवकलाकारांचा अफजलखान करत आहे असं दृश्य डोळ्यापुढं आलं नि ड्वाळे पाणावले. =)) -जिवा महाला ;) प्यारे

In reply to by प्यारे१

नाही ... मी नवकलाकारच म्हणतेय... पैलाच भाषांतरा चा लेख लिवलाय ना त्यांनी मिपावर म्हणून..
पैसातै डोक्यावर जिरेटोप नि बोटात वाघनख्या वगैरे घालून नवकलाकारांचा अफजलखान करत आहे असं दृश्य डोळ्यापुढं आलं नि ड्वाळे पाणावले.
प्रौढ, प्रतापी, बिलंदर,… मिपा कुलावतौश., नव मिपाकर प्रतिपालक… संपादक कुलं भूषण, छत्रपती…. पैसा ताई चा विजय असो~~~ - दिवा लावला कारे ( मधे डोळा मिचकावणरी स्माईली टाकुन)

In reply to by आनन्दिता

हौसला अफजाई करून पैसाताई गावाला जाई करणार आणि लेखकांना मिळालेल्या हौसल्याने आमची संपादकपदाची हौस पुरती फिटणार तश्यातला प्रकार आहे. ;)

In reply to by रेवती

मी कित्ती चांगली आहे की नै? "अर्धं" काम करून सग्गळं श्रेय बाकीच्यांना देतेय! *pleasantry* *diablo* *pardon*

In reply to by आनन्दिता

हौसला अफजलखान?? :)) :)) अग आनंदिता काही कळफलकाला हाड हाय का नाय म्हणते मी.

In reply to by स्पंदना

तेच तर. आणि हौसंसाठी अफझलखान वगैरे कशाला घ्यायचे? आपल्यातले नेताजी, तानाजी वगैरे काय कमी आहेत का?

In reply to by राजेश घासकडवी

देवा! युगंधरा ताईंनी करुण वगैरे धागा काढलाय त्याचा असा पानिपतातला बाजीप्रभू का करताय?

In reply to by स्पंदना

ख्खिक. हे म्हणजे आमच्या एका प्रसिद्ध शाहीरांच्या कवनासारखे झाले. ते पोवाड्यात असे घुसले होते की बास्स. त्याच तारेत ते सांगू लागले "आणि रायगडावरचा सूर्य मावळला मावळता मावळता थांबला २ पळ आमचा राजसूर्य मावळताना बघण्यासाठी. ते साल होते १९८०" आम्ही अशा गंभीर प्रसंगातही दात गच्च आवळून हसू दाबायचा प्रयत्न करत होतो.

कोणाच्याही पहिल्या लिखाणावर एवढी गडबड काय चाललीय? आँ?? लिहा हो ताई तुम्ही बिनधास्त! या सगळ्या वात्रट लोकांकडे दुर्लक्ष करा हां, मात्र पुढच्या वेळी तर शुद्ध लिहा बरं का. (कोण म्हणतोय रे तो मिपावर बेशुद्धलेखनच चालतं म्हणून??)

In reply to by युगन्धरा@मिसलपाव

जीवात जीव आला माझ्या
इतक्या लगेच =)) ( जीवात जीव येणे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ प्रेगन्ट होणे असा आहे )

In reply to by प्रसाद गोडबोले

=)) अहो तो जीव बाहेरच्या जगात येईपर्यंतचा काळ नै धरला तरी चालतं ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

@ जीवात जीव येणे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ प्रेगन्ट होणे http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif असा आहे>>> =)) पूर्णपणे वारल्या गेलो आहे! http://www.sherv.net/cm/emo/laughing/red-neck-laughing-smiley-emoticon.gif

या विषयाला अनुसरून आठवलेले गाणे घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात सुखी आहे पोर सांग आईच्या कानात आई भाऊसाठी परी मन खंतावतं विसरली का गं भादव्यात वर्स झालं माहेरीच्या सुखाला गं मन आसवलं फिरुन फिरुन सय येई, जीव वेडावतो चंद्रकळेचा गं शेव ओलाचिंब होतो काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार हुंगहुंगुनिया करी कशी गं बेजार परसात पारिजातकाचा सडा पडे कधी फुलं वेचायला नेशील तू गडे कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय माया माझ्यावर दाट जशी तुझी माय आले भरुन डोळे पुन्हा गळा ही दाटला माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात

In reply to by प्रसाद प्रसाद

:( काय गिरिजा काका सकाळी सकाळी घरची आठवण ़करुन दिलीत :( आता दिवसभर उगाच लोळणे आले सोबत लन्च्साठी लार्ज पिझ्झा मागवणे पण आले :-/

In reply to by जेपी

आर्र्र चुकलच :( सोरी सोरी प्रसाद प्रसाद काका :( थेन्कु तुत्थु काका :) अबि क्ये अबि माफि मांगी ने केटले हॉलका हॉलका लग र्हा है |