अंधार क्षण भाग ४ - अलेक्सांद्र मिखाइलोव्हस्की (लेख १५)
अंधार क्षण - अलेक्सांद्र मिखाइलोव्हस्की
इतिहासाच्या कोणत्याही अभ्यासकाला हे माहीत असतं की आपली भूतकाळाकडे बघण्याची दृष्टी ही सतत बदलत असते. घटनांचे नवीन अर्थ लावले जातात, त्यांच्या जुन्या अर्थांमध्ये सुधारणा केल्या जातात, आक्षेप घेतले जातात. अनेक आदराची स्थानं धुळीला मिळतात, नवीन आदरस्थानं शोधली जातात. कुठलाही इतिहासकार हा भूतकाळाचे दस्तऐवज आणि साक्षीदार यांच्या आधारानेच घटनाक्रमाची निश्चिती करत असतो. जर हे साक्षीदार किंवा दस्तऐवज उपलब्धच झाले नाहीत तर इतिहासलेखनावर साहजिकच मर्यादा येतात. याचं एक बोलकं उदाहरण म्हणजे सोविएत युनियन. १९९१ मध्ये सोविएत युनियन संपुष्टात आलं.
मिसळपाव