Skip to main content

भाषांतर

शेवटचे पान

लेखक मनीषा यांनी सोमवार, 07/10/2013 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रथितयश लेखक ओ'हेन्री यांनी लिहिलेल्या "द लास्ट लिफ" , या कथेचे हे मराठी रुपांतर. या कथेमध्ये वर्णन केलेले प्रसंग, ते प्रसंग जेथे घडतात ते स्थळ, आणि तो प्रसंग साकार करणारी पात्रे, यांचे यथातथ्य चित्रं, ही कथा वाचताना, वाचकाच्या नजरेसमोर उभी राहते. ओ'हेन्री यांच्या लेखनाचे हे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. त्यांच्या कथा वाचताना त्यांची धारदार कल्पनाशक्ती, अमाप शब्दसंपदा, आणि ते शब्द अचूकपणे वापरण्याची हातोटी याचा वेळोवेळी प्रत्यय येतो. ) वॉशिंग्टन चौकाच्या पश्चिमेकडे एक अजब वस्ती वसलेली आहे. नाव आहे ग्रीनविच. अतर्क्य वळणे घेत जाणारे रस्ते आणि आणि अनाकलनीय अशा गल्ल्याबोळांनी बनलेली ही वस्ती.

सकारात्मक भाषा

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 07/10/2013 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ ऑनलाईन छोटे पुस्तक: एक्झाम्पल्स ऑफ पॉझिटिव्ह लँग्वेज स्रोत: इंटरनेट अनुवाद : निमिष न. सोनार प्रस्तावना: महात्मा गांधी एकदा म्हणाले होते : " शब्द नेहमी सकारात्मक ठेवा . शब्दानुसार आपली वागणूक बनते. आपली वागणूक, वर्तन सकारात्मक ठेवा कारण तेच आपल्या सवयी बनतात . आपल्या सवयी सकारात्मक ठेवा कारण सवयी पुढे मूल्ये बनतात. मूल्ये आपलं नशीब होतात. जीवन चांगले जगण्यासाठी आपले नशीब सकारात्मक बनवा.

थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक २

लेखक मन यांनी सोमवार, 22/07/2013 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1: http://misalpav.com/node/25241 पुजालोच्या खाजगी आयुष्याबद्दलः- त्याने शाळा अर्धवट सोडली होती. अनेक लहानमोठी कामे तो शिकला होता. कधी हार्डवेअरच्या दुकानात काम कर तर कधी पोल्ट्री फार्म शिक असे त्याचे सुरु होते. वडलांनी मागे थोडिफार संपत्ती सोडली होती. पण स्पॅनिश युद्धादरम्यानच्या काळात तिथल्या कामगारांनी ताब्यात घेतली. स्पॅनिश यादवी युद्धात एका बाजूला इटाली- नाझी समर्थित फॅसिस्ट गट होता, तर दुसरीकडे रशिया समर्थित कम्युनिस्ट होते.

थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक १

लेखक मन यांनी सोमवार, 22/07/2013 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
सत्य कल्पना करु शकाल त्याहून थरारक, विचित्र असतं असा एक वन लायनर फार पूर्वीपासून ऐकत आलोय. त्या फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत असे पूर्वी वाटे. पण एक सत्यकथा हाताला लागली आणि काहीही तिखट मीठ न लावता जे जसं आहे ते तसं मांडलं तरी ते किती थरारक, रोमांचकारक, विचित्र आणि धम्माल गंमतीशीरही असू शकतं हे अनुभवलं. एक बरचसं अनवट, अल्पपरिचित किंवा अपरिचित असलेलं भूतकाळातलं पान जे जसं आहे ते जवळपास जशाला तसं भाषांतरीत करतोय विकिपिडियातून. . कल्पना करा. दुसरे महायुद्ध सुरु आहे आणि तुम्ही जर्मन सैन्याच्या pay roll वर आहात. ब्रिटनवगलता इतर युरोपमेनलँडवर नाझींचा ताबा आलेला आहे.

कमिशनर- जेफ्री आर्चर (उत्तरार्ध)

लेखक लाल टोपी यांनी गुरुवार, 13/06/2013 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूत्रः कमिशनर- जेफ्री आर्चर (पुर्वार्ध) (या कथेचा हा भाग आधीच टाकला होता परंतु मिपाच्या गेल्या काही दिवसांच्या पडझडीत गायबलेला दिसतोय कथा पूर्ण असावी केवळ याच हेतूने हा भाग पुन्हा टाकत आहे). मलिकच्या पूर्व ईतिहासाची माहिती, त्याचा फोटो, कमिशनर साहेबांनी केलेली मदत या सर्वच गोष्टींची गौरवपूर्ण दाखल मुंबईच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने घेतली.

कमिशनर- जेफ्री आर्चर (पुर्वार्ध)

लेखक लाल टोपी यांनी गुरुवार, 30/05/2013 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
जेफ्री आर्चरच्या 'कमिशनर' कथेचा स्वैर अनुवाद.... "कशासाठी तो माझ्या भेटीची वेळ मागतो आहे?" कमिशनर साहेबांनी विचारले. "तो म्हणत होता काही खासगी काम आहे" "त्याला तुरुंगाबाहेर येऊन किती दिवस झाले?" कमिशनर साहेबांनी पुन्हा विचारले. "दीड महिन्यांपूर्वीच तुरुंगातून सुटला आहे." राज मलिक ची फाईल पाहत सचिवाने उत्तर दिले. कमिशनर नरेश कुमार आपल्या खुर्ची वरून उठले आणि काहीतरी विचार करीत आपल्या खोलीत येरझारा घालू लागले. एखाद्या गहन विचारात असले म्हणजे त्यांच्या कडून ही कृती अगदी अभावितपणे होत असे.

वाद-संवाद

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 08/05/2013 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
मला उशीर झाला होता. माझी पत्नी एलीनॉर आणि मी सात वाजता रेस्टॉरंट मध्ये भेटणार होतो, पण मला चांगले साडेसात होऊन गेले होते. मला उशीर व्हायला क्लायेंटबरोबरची मीटिंग खूप वेळ चालण्याचं कारण झालं होतं. मी धावतपळत पोहोचलो आणि एलिनॉरला माझ्या उशीरा येण्याचं कारण सांगून टाकून 'सॉरी' म्हणून मोकळा झालो, "अगं खरं तर उशीर करण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता." "तुझा हेतू कधीच नसतो रे!" अरे बापरे!

आगंतुक

लेखक मूकवाचक यांनी शनिवार, 04/05/2013 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या वर्षाचा हा पहिला महिना. नेमके बोलायचे झाले तर आज एकतीस जानेवारी. गेले तीस दिवस मी प्रचंड दडपणाखाली आहे. केव्हाही काहीतरी अघटीत घडेल अशी भीती आम्हा तिघांनाही सतावते आहे. एकतीस डिसेंबरच्या रात्री 'ती' पार्टी झालीच नसती तर बरं असं आता आम्हा तिघांनाही राहून राहून वाटतं. आम्हा तिघांव्यतिरिक्त त्या पार्टीला हजर असणारा आमचा मित्र रिचर्ड कॅरेक त्यादिवसापासून बेपत्ता आहे आणि त्याचा शोध घेण्याची हिंमत आम्हा तिघांमधेही नाही. त्या दिवशी कॅरेकने सांगितलेली त्याची चित्तरकथा अशक्य कोटीतली वाटेल अशी असली तरी ती पूर्णपणे काल्पनिक आहे असं आम्हा तिघांनाही वाटत नाही.

खिडकी

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 26/04/2013 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
माधवराव देवळे त्या 'बुद्रुक' खेडेगावात खास विश्रांती घेण्यासाठी गेले होते. त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी किमान दोन महिने कामकाज बंद ठेउन पूर्णपणे विश्रांती घेण्याची त्यांच्यावर जवळजवळ सक्तीच केलेली होती. कुठलाही शारिरीक किंवा मानसिक ताण त्यांची तोळामासा झालेली प्रकृती लक्षात घेता कदाचित प्राणघातक ठरला असता. अनायासे त्यांच्या बहिणीच्या एका जीवश्चकंठश्च बालमैत्रिणीकडे त्यांची 'पेईग गेस्ट' पद्धतीने राहण्याची व्यवस्थाही झालेली होती. तशी तजवीज बहिणीने करून ठेवलेली होती. माधवरावांजवळ त्यांचा परिचय करून देणारी एक चिठ्ठीही दिली होती.

चंद्रकांता - १.३ - बगिचातला दगाफटका

लेखक आदूबाळ यांनी बुधवार, 24/04/2013 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
Chandrakanta (चित्रपट्टीसाठी अभ्याचे आभार!) यापूर्वी: चंद्रकांता - १.१ - नजरकैदेतली राजकन्या चंद्रकांता - १.२ - मदांध आणि सत्तांध ~~~~~ त्याच संध्याकाळची गोष्ट. चंद्रकांता, चपला आणि चंपा उद्यानात विहार करत होत्या. मावळतीच्या बाजूच्या घनदाट अरण्यात सूर्य बुडत चालला होता.