भाषांतर
माझी चार अंग वस्रे
जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे
- तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे
जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे
- तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही
जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे
- तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका
जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे
- तीच्या फारसे जवळ जाउ नका.
सवा डॉलर चढाऊंगी (एक आध्यात्मिक दृष्टीकोन)
मित्रहो, सहज गाणं ऐकत ऐकत मला अचानक हा दृष्टांत झाला की ही लावणी नव्हेच!! ही तर एका ईश्वराच्या प्रेमात पडलेल्या कन्यकेने त्या ईश्वराला केलेली आळवणीच !! गाण्याची सुरुवात ऐकताच आपल्याला कन्यकेच्या आध्यात्मिक विचारांची जाणिव व्हायला लागते. गाण्याची सुरुवात काहीशी अशी आहे.
हिंदी फिल्मों में देखा जीवन का सारा लेखा।
पेडों के आगे बच्चन पेडों के पिछे रेखा॥
वरच्या ओळींमध्ये क्न्यकेला नव्वदच्या दशकात प्रसारीत होणारी रामायण ही मालिका अभिप्रेत आहे. 'हिंदी सिरीयलों मे देखा' हे मीटर मध्ये बसणार नाही म्हणून फिल्मों मे हा शब्द वापरला आहे. तर कन्यका म्हणते, या हिंदी रामायण मालिकेत जीवनाचं सारं सार आहे.
बाप माणूस
मी आज हे एक बाप म्हणून लिहितोय
तुला स्वतःला मूल होईपर्यंत कळणार नाही,
आनंदापलिकडची अनुभुती, प्रेमापल्याडची प्रीती
जी बापाच्या हृदयात उचंबळते पोराकडे पाहून
नाही कळणार तुला, कसला अभिमान असतो तो एका पुरुषाला
आपण आहोत त्यापेक्षा खूप मोठं होण्याचा आणि ते परंपरेने चालू ठेवण्याचा
काहीतरी चांगलं आणि आशादायी पोराच्या हाती ठेवण्याचा
आणि नाही कळणार तुला त्या वडिलांचा आक्रोश
जेंव्हा कधी त्यांच्या मनातले दैत्य त्यांना 'ते पुरूष' बनू देत नाहीत
जे त्यांच्या मुलाने पहावेत असं त्यांना मनापासून वाटतं
तुला फक्त दिसतोय तो तुझ्यासमोरचा माणूस
जो तुझ्यावर सामर्थ्य गाजवतोय, भल्यासाठी वा बुर्यासाठी
ते सामर्थ्य जे
स्त्रियांना नक्की काय हवे असते?**** (आधारित स्वैर अनुवाद)
स्त्रियांना नक्की काय हवे असते?
हे नेहमी लक्षात ठेवा! (स्त्रियांनो) जरा यावर विचार करा. (पुरुषांनो) कथेची मजा घ्या. ****
तरुण आर्थर राजाला शेजारच्या साम्राज्याच्या राजाने पकडले होते आणि कैद करून ठेवले होते.****
****
त्या राजाने आर्थरला ठार मारले असते; परंतु तो त्याच्या तरुणाईने आणि आदर्शांनी प्रभावित झाला होता. त्यामुळे राजाने त्याला सोडून देण्याचा निर्णय घेतला, अर्थात...
जर त्याने एका खूपच कठीण प्रश्नाचे उत्तर दिले तर. आर्थरकडे उत्तरावर विचार करण्यासाठी एक वर्ष होते.
विशिष्ट अभिजाताच्या मंत्रसमाधीचे प्राक्तन
अनन्यशून्या गरळविशिष्टा
मंतरलेली चरणप्रतिष्ठा
अल्लडढोली धोतरजोडी
चित्तरबद्धा जळमंजिष्ठा
चपळ्शरीरी आटापीटा
अल्फाबीटाग्यामाथीटा
शोधनभंजक वरबालंटा
कुठे कोणासी सचित्रघंटा
अभिजाताची मंत्रसमाधी
थिल्लर घोटा अतिकोलांटी
कांक्षितबुद्धी धरणललाटी
मेंदूक्रांती मेंदूक्रांती
शरदिनी १८ ऑगस्ट २०१२ पुणे
वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं
हळू हळू येतेय बिनपावली
तुझ्या खांद्यामागे सकाळ सोनसळी
पांढूरल्या तावदानात
धीट होत, सूर्य येतोय आत
उशीवर बरसताहेत तुझे केस
तू अजूनही झोपेतच आहेस!
वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं
सांगितलेलं गुपित, पुन्हा सांगावं
बघ, मी सकाळ देतोय तुला
हा दिवसही घे, माझ्या फुला!
येतील हलत्या पडद्यामागे सूर्याची किरणे
फडफडणाऱ्या पापण्यामागे स्वप्नांचे फिरणे
झोपेत तुझे स्वप्नांना बिलगणे
सुखाचे क्षण आठवून ओठांचे विलगणे
वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं
सांगितलेलं गुपित, पुन्हा सांगावं
बघ, मी सकाळ देतोय तुला
हा दिवसही घे, माझ्या फुला!
मिसळपाव