मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

शतशब्द कथा: हडताल

विवेकपटाईत ·
शर्माजी एका फैक्टरीत २० वर्षांपासून सुपरवायझर. "शर्माजी, मुलाला नौकरी पाहिजे असेल तर आमचा साथ द्यावा लागेल. उद्या हडताल" - नेताजी. फैक्टरीच्या बाहेर "जिंदाबाद मुर्दाबाद, नेताजी जिंदाबाद". पोलिसांनी शर्माजीसह ४०-५० कर्मचार्यांना बस मध्ये कोंबले. थोड्यादूर नेल्यावर सर्वांना सोडून हि दिले. आपण नेताजींना साथ दिला, उद्या मुलाला हि याच फैक्टरीत नेताजी निश्चित नौकरी लाऊन देतील. दुसर्या दिवशी सकाळी, फैक्टरीच्या गेटवर गार्डने एक लिफाफा शर्माजींचा हाती दिला. "फैक्टरीत तोडफोड, दंगा"....शर्माजी बरखास्त. "तोडफोड करणारे आमचे लोक नव्हतेच"- नेताजी.

पूर्णब्रह्माचा अपमान!!

आनन्दा ·
बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे. त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं. मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो. हॉटेल ला जायचं ठरवलं, पण रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे गूगल मॅप वर सर्च केलं. आणि तिथूनच नाट लागायला सुरुवात झाली.

सबका साथ सबका विकासाचे आद्य पुरुष - स्वर्गीय अटलजी

विवेकपटाईत ·
मी भाग्यशाली होतो, १९९७ मध्ये प्रधानमंत्री कार्यालयात पोस्टिंग झाली. अटलजी प्रधानमंत्री झाले आणि कार्यालयात एक वेगळीच चेतना आली. कामाचा बोझा एकदम वाढलला. सरकारी दफ्तरात नूतन कल्पना साकारताना, भरपूर कागदी कार्य करावे लागतेच. सकाळी ९ ते रात्री ९ वाजायचे कधी कळायचे नाही. पण देशासाठी आपण काही ठोस कार्य करत आहोत या जाणीवेने त्या कामातहि आनंदच मिळत होता. सबका साथ, सबका विकास याचा अर्थ काय. स्व. अटलजींनी अनेक राजनीतिक दलांना आपल्या सोबत घेऊन सरकार चालवली म्हणजे विकास होतो. नाही. देशात विभिन्न राजनीतिक आणि धार्मिक समूहांना आरक्षण दिल्याने सर्वांचा विकास होतो. नाही.

भारांच्या जगात... ४

अजिंक्य विश्वास ·
भारांच्या जगात... ४ उडती छबकडी- भा. रा. भागवत उडती छबकडी- भा. रा. भागवत उडती छबकडी हा भारांचा विज्ञान(वेड)कथा संग्रह! ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे ह्या नुसत्याच विज्ञानकथा नसून वेडकथा देखील आहेत. एक एक कल्पना नुसती धुमाकूळ घालणारी आहे आणि विज्ञानाला धरून देखील आहे. त्या काळी प्रचलित असलेल्या विज्ञान संकल्पना हाती धरून एक सुंदर पार्श्वभूमी निर्माण करण्यात भारांचा हातखंडा होता.

भारांच्या जगात... ३

अजिंक्य विश्वास ·
भारांच्या जगात... ३ मुक्काम शेंडेनक्षत्र- भा. रा. भागवत मुक्काम शेंडेनक्षत्र ज्यूल्स व्हर्नच्या ' ऑफ ऑन अ कॉमेट' (Off on a comet) या कादंबरीचा हा दुसरा रोमांचकारी भाग!.

उलूक परिवार कथा

विवेकपटाईत ·
बालीत कपडे स्वस्त मिळतात. सरकारी कामातूनवेळ काढून खरीदारी करायला गेलो. मालमध्ये फिरताना, लाकडाचे आई, बाबा आणि बाळ या उलूक परिवाराने ध्यान आकर्षित केले. खरीदारी पूर्ण झाली, तरीही सारखे-सारखे लक्ष त्या उलूक परिवाराकडे जायचे, जणू ते म्हणत होते, आम्हाला हि तुझ्या सोबत यायचे आहे. अखेर राहवले नाही, भारतीय मुद्रेत फक्त ८० रुपये देऊन उलूक परिवार खरेदी केला. काही सहकार्यांनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. एक दुसर्याच्या कानात, मला ऐकू येईल एवढ्या जोरात म्हणाला, "शायद दिल के साथ दिमाग भी खराब हो जाता है" दुसरा उद्गरला "नहीं यार, पटाईतजी पठिया (सठिया) गए है".

भारांच्या जगात... २

अजिंक्य विश्वास ·
भटांच्या वाड्यातील भुतावळ- भा. रा. भागवत भटांच्या वाड्यातील भुतावळ भूत म्हणले की, आजपण आपले कान टवकारले जातात. ह्या भुतावळीचे नाव वाचल्यावर माझे देखील तसेच झाले होते.

भारांच्या जगात... १

अजिंक्य विश्वास ·
सूर्यावर स्वारी? - भा रा भागवत. . माझा प्रिय मित्र सागर ह्याने माझ्या डोक्यात काही वर्षांपूर्वी भागवतांच्या संक्षेपाचे मूळ रूप शोधायचे खूळ डोक्यात घातले, त्याबद्दल त्याचे मानावे तेवढे आभार आणि उपकार कमीच आहेत!

चुलीवरचे जेवन...

मुकेश चौधरी मेळघाट ·
चुलीवरील जेवणाचा घरगुती आस्वाद.... धकाधकीच्या दैनंदिन जीवनातला आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय खास राहिला. सकाळीच दिपकदादांचा (आमचे पुणे येथील मोठे बंधु) फोन आला. माईंना खास वैदर्भीय खणखणीत डाळभाजी आणि पोळी चुलीवरचं जेवण करायचे आहे म्हणुन. आमच्या माई सौ. सिंधुताई सपकाळ यांना आज अमरावती आल्यावर खास वर्हाडी जेवणाचा आस्वाद घ्यायचा होता. मग लागलो तयारीला. सरोज चौकातील रुक्मिणी वल्लभ झुणका भाकर केंद्रात ऑर्डर दिली. माई, दिपकदादा, शामराव दादा, विनय दादा, मी, अधिक्षिका मॅडम, पांडा भाऊ, चालक नितीन दादा, असे आम्ही सर्व एकसाथ जेवायला बसलो.

४ गोष्टींच्या निमित्ताने!

लई भारी ·
'लस्ट स्टोरीज' च टायटल सार्थ असलं तरी मला त्यात मार्केटिंगचा भाग जास्त वाटतो. नेटफ्लिक्स आताशी भारतीय वेब-सेरीज घेऊन येतंय त्यामुळे कितीही आधुनिकतेचा आव आणला तरी ह्या माध्यमाची बलस्थानं(पक्षी: सेन्सॉरमुक्ती) वापरून चांगल्या मालिकांमध्ये सुद्धा 'बिनधास्त' माल भरपूर टाकला आहे. कथेची गरज आहेच म्हणा पण त्यानिमित्ताने प्रसिद्धी पण होतेच. खरतर या मालिकेतल्या छोटेखानी ४ कथा या रूढार्थाने 'कथा' म्हणण्यापेक्षा, त्या पात्रांच्या जीवनातले काही प्रसंग आहेत. सरधोपट शेवट-सुरुवात न करता त्यांच्या जीवनातला एक तुकडा दिग्दर्शकांनी आपल्या समोर मांडला आहे. किमान पहिल्या ३ कथांमध्ये तरी हे अगदी प्रकर्षानं जाणवत.