मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

InShort 4 – घड्याळांचा दवाखाना (शॉर्ट-फिल्म)

मनिष ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वडील आणि मुलाचे नाते हा एक जिव्हाळ्याचा पण तितकाच अवघड प्रश्न आहे. खास करून मुलगा 'टीनेजर' असेल तर. घड्याळांचा दवाखाना/The Watch Clinic ही अशीच एक कथा आहे वयात येणार्‍या मुलाची, त्याला भुरळ पाडणार्‍या रंगीबेरंगी जगाची आणि जगराहाटी सांभाळणार्‍या त्याच्या बापाची.

लहानांसाठी गोष्ट: पावसाचा ढग

पाषाणभेद ·
लेखनप्रकार
पावसाचा देव आहे इंद्र. इंद्राकडे पाऊस पाडणारे अनेक सरदार असतात. ते सरदार पृथ्वीवर पाऊस पाडत असतात. हे सरदार म्हणजे मोठे मोठे काळे ढग असतात. ते पाणी साठवतात आणि पाऊस पृथ्वीवर पाडतात. एकदा एका ढगाला इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडण्यासाठी पाठवले. पण तो ढग पाऊस न पाडता एका राज्याच्या मैदानावरील मुलांचा खेळ बघण्यात रमून गेला. ही गोष्ट इंद्राला समजल्यावर त्याने त्या ढगाला पाण्याचा ढग न राहण्याचा शाप दिला. आता त्या ढगात पाणी साठून राहू शकत नव्हते. तो ढग पाण्याविना पांढरा दिसू लागला. मग त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने इंद्राची माफी मागीतली.

व्हाटसअ‍ॅप चा एसएमएस मेसेज

पाषाणभेद ·
तो: हॅलो. ती: हं बोला. तो: काय गं, झोप झाली का? ती: हो आताच उठले. आज जरा जास्तच गाढ झोप लागली होती. पोस्टमनची आरोळीदेखील नाही ऐकू आली. तो: हं. ती: तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही पाठवलेले व्हाटसअ‍ॅप बघितले. उद्या त्यांचे जेवण बनवावे लागेल का त्यासाठी विचारते आहे. तो: सकाळी येणार आहे. पण ती दुसरीकडे उतरली आहे. आपल्याकडे आली तर येईल. मी एक एसएमएस पाठवलेला होता वाचला का? ती: हो वाचला ना. म्हणून तर विचारले की तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही व्हाटसअ‍ॅप केले आहे ना? तो: अग, एसएमएस चा मेसेज म्हणतोय मी.

पाभेचा चहा

पाषाणभेद ·
चहा पिणे अन पाजणे हे काही आपल्याकडे पुर्वी नव्हते. पुर्वी चहा नव्हताच. लोक गुळपाणी देवून स्वागत करायचे. नंतर कधीतरी बोस्टन टी पार्टी झाली. अमेरीका स्वातंत्र्य झाली. ब्रिटीश भारतात आले. चीन मधल्या चहाला शह देण्यासाठी त्यांनी चहाची भारतात लागवड केली अन त्यानंतर चहा भारतात उत्पादीत होत गेला. चीन नंतर भारत चहा उत्पादनात दोन क्रमांकावर गेला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रेल्वेस्थानकांवर चहा विकला जावू लागला. चहाची विक्री जाहीरात करून केली गेली. चहा पिणे कसे चांगले हे जाहिरात करून सांगितले जायचे. नंतर लोक चहाचे चाहते झाले.

InShort 3 – ज्यूस/Juice (शॉर्ट-फिल्म)

मनिष ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
Juice (हिंदी/२०१७) ही शॉर्ट-फिल्म बघितल्यानंतर हे वाचले तर जास्त मजा येईल, हवी तर वाचल्यानंतर पुन्हा एकदा पहा.

InShort 2 - Little Hands (शॉर्ट-फिल्म)

मनिष ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
Little Hands (२०१३) ही शॉर्ट-फिल्म बघूनच जर पुढचे वाचले तर जास्त मजा येईल, त्यामुळे शॉर्ट-फिल्म आधी बघावी ही विनंती. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे असे म्हटले जाते, त्याचा पुरेपूर अनुभव घ्यायचा असेल तर लिटल हँडस् ही शॉर्ट-फिल्म अवश्य बघावी.

पावणेदोन पायांचा माणूस

महासंग्राम ·
लेखनप्रकार
राजकारणात पीए नावाची जमात म्हणजे जरा अवघड जागेचं दुखणं असतं. कारण त्यांना नेत्याच्या सगळ्या भानगडी माहीत असतात. त्याचा पैसा कुठून येतो, कधीपर्यंत टिकणार आहे ते कोणाच्या कोण सोबत त्याची सेटिंग आहे. अनेक ठिकाणी नेत्यांचा अर्धा कारभार हे पीए लोकंच निभावून नेतात. लोकसत्तेतलं दोन फुल एक हाफ किंवा महाराष्ट्र टाइम्स मधलं दिड दमडी मध्ये तंबी दुराई ने राजकारणावर केलेलं खुसखुशीत भाष्य तुम्ही कधी ना कधीतरी वाचलंच असेल, त्याच तंबी दुराई म्हणजे श्रीकांत बोजेवार यांची पावणेदोन पायांचा माणूस हि कादंबरी सुद्धा तशीच चिमटे काढणारी आहे.

हवाईदलातील गणेश पूजेचे किस्से भाग २

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
गणेशोत्सव १९७७ उधमपुरची विसर्जन मिरवणूक! ६० किमी अंतराची! पायलट ऑफिसर रँक बॅडमिंटनच्या खेळातील 'शटल कॉक' प्रमाणे वापरली जात असे. आता ती रँकच बंद झाली. असो. असेच "जा उदमपूरला" म्हणून पाठवले गेले होते. आम्हा जुनियर्सना काहीच हरकत नसे. कारण दर आठवड्याला ड्युटीऑफिसर म्हणून सर्व समावेशक मोठ्या होल्डॉल मधे गाशा गुंडाळून मेस पासून 35 किमी दूर एयरपोर्ट वर राहायला जाणे अंगवळणी पडले होते! शिवाय टीए डीए वेगळा! उधमपुरच्या छोटेखानी मूर्तीचे विसर्जन आठवणी राहिले. झाले असे की विसर्जन करायची जागा म्हणजे तवी नदीचा प्रवाह असे ठरवले होते.

InShort १ - Afterglow (शॉर्ट-फिल्म)

मनिष ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ह्या शॉर्ट-फिल्मविषयी वाचण्यापुर्वी एकदा Afterglow पहावा आणि मग वाचावे ही विनंती. आवडलेल्या, थोड्या अनोळखी शॉर्ट-फिल्मविषयी इतरांना सांगावे; त्यात काय भावले, काय स्पर्शून गेले ते लिहावे हा हेतू. लिखाणाच्या ओघात काही स्पॉइलर्स येतील, त्याची वेगळी सूचना नाही. कोर्‍या मनाने फिल्म पाहूनच हे वाचावे ही पुन्हा एकदा विनंती.

गणेश पूजा... सन १९७२ बल्ले बल्ले जी...! गनेस पूजे दी!!

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
गणेश पूजा... सन १९७२ बल्ले बल्ले जी...! गनेस पूजे दी!! भाग १ हवाईदलातील माझ्या आठवणी... १९७१साली बांगलादेशच्या लढाईची सांगता भारत विजयी होऊन झाल्याने आनंदी वातावरणात गणेशाचे आगमन झाले होते. हवाईदलातील चंदिगढ स्टेशनमध्ये मला पहिल्या पोस्टींगवर रुजू होऊन ५-६ आठवडे झाले होते. तेंव्हा सेक्टर १९ मधील एका मंदिरात सिव्हिलियन्स सोबत हवाईदलातील एयरमन गणेशोत्सव साजरा करत असत. त्यावेळेस झालेली विसर्जनाची मिरवणूक आजही लक्षात राहिली आहे. कल्पना करा, गणेशाच्या मोठ्या मोठ्या १०० च्या वर मूर्ती हार-माला घालून आर्मीच्या ट्रकवर सजवून निघालेल्या आहेत.