गणेशोत्सव १९७७
उधमपुरची विसर्जन मिरवणूक! ६० किमी अंतराची!
पायलट ऑफिसर रँक बॅडमिंटनच्या खेळातील 'शटल कॉक' प्रमाणे वापरली जात असे. आता ती रँकच बंद झाली. असो.
असेच "जा उदमपूरला" म्हणून पाठवले गेले होते. आम्हा जुनियर्सना काहीच हरकत नसे. कारण दर आठवड्याला ड्युटीऑफिसर म्हणून सर्व समावेशक मोठ्या होल्डॉल मधे गाशा गुंडाळून मेस पासून 35 किमी दूर एयरपोर्ट वर राहायला जाणे अंगवळणी पडले होते! शिवाय टीए डीए वेगळा!
उधमपुरच्या छोटेखानी मूर्तीचे विसर्जन आठवणी राहिले.
झाले असे की विसर्जन करायची जागा म्हणजे तवी नदीचा प्रवाह असे ठरवले होते. किती दूर आहे ते कोणालाही माहित नव्हते. मी व एक कोल्हापूरचा फ्लाईंग ऑफिसर पाटील आणि बाकी एयरमन, यांची बायका, मुले, शिवाय गणेश मूर्ती धरून असलेले २५-३० जण. ड्रायव्हर नॉन मराठी! असे निघालो.
१०, २०, ३०, ५० किमी झाले तरी ठरवलेली जागा येईना! आत्ता आलेच, म्हणत शेवटी तवी नदीचे पात्र सापडले. आम्हाला पुलावर उभे करून काही ४-५ मोजके मूर्तीला धक्का न लागेल अशा बेताने मोठ्या शिळा, घसरड्या वाटामधून पाण्यात उतरले.
' सर काळजी नको आम्ही मुंबईकर आहोत. समुद्रात लाटांमधून विसर्जनाची सवय आहे'! . झिरमिर पावसात, जोरदार प्रवाहात दोन जणांनी मूर्ती ३ वेळा बुचकळून विसर्जित केली!
सगळेजण वर चढून आल्यावर आम्हाला हायसे वाटले!
नंतर पुढचे बाळंतपण झाले! ड्रायव्हर एयरमनने तक्रार केली की इतके अंतर होते हे सांगितले नाही. अंतर वेल्फेअर रनपेक्षा जास्त झाले होते. कोर्ट ऑफ इन्कायरी झाली. मीमधे पडून ऑडिटर्स पकडणार नाहीत असे अंतर एडजेस्ट करून ते मिटवले. असो...
...
गणेशोत्सव १९७८ श्रीनगर.
जवाहरनगर मधे हवाईदलातील गणेशोत्सव साजरा होत असे. त्या वर्षी 'दोन्ही घरचा पाहुणा'
फार्स बसवला होता. उत्साही एयरमन एकत्र येऊन माझ्या घरी रोज प्रॅक्टिस चाले. नाटक रविंद्र नाट्य मंदिर श्रीनगर, मधे सादर झाले. आर्मीच्या अनेक युनिट्स मधील मराठी सेनेतील शेकडो प्रेक्षक टाळ्या, शिट्ट्यांनी नाट्यगृह दणाणून जाताना पाहून दिग्दर्शक म्हणून पहिल्या ओळीत बसून मी तो आनंद अनुभव घेत होतो.
...
"सर मी सतीश नांदेडकर! आठवलं का? श्रीनगरच्या पोस्टींगला नाटक बसवले होते!"
"कोण ऽऽ आमचा दोन्ही घरचा पाहुणा वाला हीरो?
"हो सर, मी आता एडव्होकेट झालोय. तुमचे नाव मिसेसला मिळाले. मला खात्री होती ते तुम्हीच असाल!"
यंदाच्या गणेशोत्सवाचा आनंद वाढला!
...
मन मागे गेले... साल होते १९७३.
मी आणि माझा पायलट ऑफिसर मित्र अशोक वाधोने लाल चौकातील पुलावरून जात होतो. मागून पाठीवर थाप पडली म्हणून मागे वळून पाहिले तो ते होते प्रसिद्ध कवी आणि प्रोफेसर ! 'मी वसंत बापट व या सुधा वर्दे मॅडम' मुंबईहून मुलींचे डान्स ट्रूप घेऊन आलो आहे. तुम्ही मराठीत बोलताना पाहून ओळख करून दिली. या जरूर रविंद्र नाट्यगृहात. निमंत्रण स्वीकारून आम्ही पोहोचलो. आम्हाला पहिल्या रांगेत स्थान दिले गेले! वेगवेगळ्या राज्यातील डान्सेस दिमाखात सादर होत होते. लावणी ठसकेबाज झाली. भांगडा सुरू झाला. तुफान रंगला. खांदे उडवून, लाठी, रुमाल, रंगी बेरंगी लुंगी कुडत्यातील मुली खांद्यावर चढून कसरती करून बेभान नाचल्या. सभागृहातील भिंती हादरल्या असाव्यात!
त्या आठवणी ठेवून रविंद्र मधे मराठीत नाटक करायचंच असे ठरवून होतो. असो.
...
वाचने
10087
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर आठवणी.
नमस्कार डॉ साहेब,
In reply to सुंदर आठवणी. by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही तुमच्या विविध लिखाणातून अशा सुंदर सुंदर कथा किस्से गुंफत
नमस्कार जॉनविक्क
धन्यवाद सर.
In reply to नमस्कार जॉनविक्क by शशिकांत ओक
जीवन जगत आहे...
In reply to धन्यवाद सर. by जॉनविक्क
कृपया लिंक द्यावी.
In reply to जीवन जगत आहे... by शशिकांत ओक
आपणास
In reply to कृपया लिंक द्यावी. by जॉनविक्क
लष्करी थाटाच्या आठवणी वाचायला
मस्त आठवणी !
आत्ताऽऽ! मगऽऽ?
लोकांना हरामाची कमाई करताना पाहायला
In reply to आत्ताऽऽ! मगऽऽ? by शशिकांत ओक
बाय द वे
ओक सर विंग कमांडर होते.
In reply to बाय द वे by जेम्स वांड
सगळे विंग कमांडर पायलट नसतात
वाह!
In reply to सगळे विंग कमांडर पायलट नसतात by शशिकांत ओक
तुमचे किस्से वाचनिय असतात...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरे लिये धड़कता है... :- Aashiquiसुरस आणि मनोरंजक
मस्त...