यौवनाची बाग
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
- Read more about यौवनाची बाग
- 8 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
कोण म्हणतो रात्र झाली
आत्ताच आमुच्या जीवनाची
आत्ता कुठे सुरवात झाली
फिरुनी पुन्हा या यौवनाची
नुकतीच साठी मागे सरुनी
यौवनाला जाग आली
बहर पुन्हा आला असा की
जीवनाची बाग झाली
प्रियेस माझ्या आजवरी मी
फुले कैक हो वाहिली
गंध ऐसा त्या फुलांचा
धुंदी आजही राहीली
त्याच गंधाने अजुनी
जेवनाचा बहर आहे
रात्र थोडी जाहली पण
एक बाकी प्रहर आहे
गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे
