मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बळ दे !

उदय सप्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
बळ दे.....! दोन हात जोडून माझं एकंच मागणं देवा , दु:ख दूर करू नकोस , ते सोसायचं बळ दे ! कोण तसा जीवनांत सुखासीन असतो? स्व दु:खात आणि पर सुखात हसायचं बळ दे ! जीवनाच्या जुगारांत हार्-जीत असणारच ! एकदा तरी सुंदरशी खेळी फसायचं बळ दे ! दिवसा ढवळ्या भले कितीही पापं लपू देत ! पण अंधारातही स्वत:च्या चुका दिसायचं बळ दे ! कुणीतरी जीव लावलंच ना या वेड्याला? थकून कधी ते अश्रू ढाळील , तर ते पुसायचं बळ दे ! स्वप्नं ऊरी कवटाळून रमी खेळत रहाणारा मी ! सरते शेवटी "प्लस" व्हावं , इतकं पिसायचं बळ दे ! स्वप्नं पूर्तीनंतर फारसं जगावसं वाटत नाही , पण ; राहिलोच तसा , तर.....सर्वांत असूनही नसायचं बळ दे ! -----उदय गंगाधर सप्रे, ठाणे कवितेची तारीख : २३ फेब्रुवारी २००६.....रात्री ८ वाजतां

वाचने 1435 वाचनखूण प्रतिक्रिया 6

चन्द्रशेखर गोखले 20/04/2009 - 10:10
स्वप्नं ऊरी कवटाळून रमी खेळत रहाणारा मी ! सरते शेवटी "प्लस" व्हावं , इतकं पिसायचं बळ दे ! स्वप्नं पूर्तीनंतर फारसं जगावसं वाटत नाही , पण ; राहिलोच तसा , तर.....सर्वांत असूनही नसायचं बळ दे ! हे तर अप्रतिम..

क्रान्ति 20/04/2009 - 19:03
दु:ख दूर करू नकोस, ते सोसायचं बळ दे! खास कविता! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

प्राजु 20/04/2009 - 19:06
केवळ सुरेख! तुमची ही कविता खूप काही सांगून गेली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण 20/04/2009 - 19:06
अप्रतिम कविता... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.