माझी भटकंती - ओहाय (Ojai)
आज खूप दिवसांनी निवांत वेळ मिळाला.. म्हटलं आज काहीतरी छान , वेळ काढून, नीट लिहावे.. आता ते छान झालं की नाही माहीत नाही..! पण मन लावून लिहीतीय.. नेहेमी लिहीताना इतका विचार, इतकी तयारी मी एरवी नक्कीच करत नाही!
तर मी आज सुरवात करतीय "माझी भटकंती" लिहायला.. जसं जमेल तसे इथे पाहीलेल्या गोष्टी, ठीकाणं इत्यादींवर लिहायचे ठरवत आहे.. ते प्रवास वर्णन असेल की अजुन काय ते माहीत नाही.. खरं म्हणजे हे जास्त करून माझ्या आठवणींचा शोध, स्मरण आणि त्या त्या ठीकाणाबाबत मला जी काही माहीती मिळेल ती मी संकलित करून ठेवत आहे.. (काही माहीती ही विकीच्या माहीतीवरून भाषांतरीत केलेलीही असेल..) वाचकांना कितपत आवडेल कल्पना नाही पण माझा स्वतःचा आनंद नक्कीच असेल त्यात...
मी इथे लॉस एंजिलीस मधे राहते. म्हणजे अर्थातच माझ्या भ्रमंती मधे डिस्नेलॅंड आलं, युनिव्हर्सल स्टुडीओज आलं, सॅन दिएगो मधलं सीवर्ल्ड आलं.. अजुन हजार ठीकाणं.. पण मी सुरवात तरी करतीय त्यामानाने माहीत नसलेल्या ठीकाणापासून. तिथे मी रिसेंटलीच जाऊन आले त्यामुळे थोड्या आठवणी ताज्या! आणि कितीही छान असल्या तरी त्याच त्याच फेमस जागांबद्दल मला आत्तातरी नाही लिहायचेय.. ते परत कधीतरी!
ओके तर ही जागा म्हणजे ओहाय.. ( Ojai -> Valley of Moon ) . हे गाव पुर्वी म्हणजे साधारण १८७४ नॉर्डहॉफ नावाने स्थापन झाले.. परंतू पहील्या महायुद्धाच्या सुमारास जर्मन वाटणारी नावं बदलायचा ट्रेंड आला, त्यात या ही गावाचे नाव चेंज झाले.. व ते ओहाय म्हणून प्रसिद्ध झाले..
या व्हॅलीचा शोध माझ्या नवर्याला असंच फिरताना लागला.. संध्याकाळी लॉंग ड्राईव्हला बाहेर पडला तो सांता बार्बराच्याही पुढे गेला.. आणि काय रस्ता आहे पाहू म्हणत डोंगरदर्यांतून , जंगलातून, या सुंदर व्हॅलीतून जात राहीला.. आणि हे रत्न सापडले.. मी आल्यावर आम्ही मागच्या वर्षी खूप वेळा जाऊन आलो.. दर वेळेला तिथली फ्रेश हवा वेड लावते..
खरं म्हणजे मला काय लिहावं कळत नाहीये आता.. काही गोष्टी किती शब्दातीत असतात? मला नेहेमी तिथे जाताना असं वाटतं काय सुंदर निसर्ग आहे हा.. यावर भरभरून लिहीले पाहीजे.. प्रत्यक्ष लिहायला बसले तर काही सुचेना झालेय राव.. काही फोटोज टाकते अधुन मधुन.. म्हणजे तुम्हीही निशब्द व्हाल! :)
पुर्णपणे घाटातली वाट.. वळणा वळणाची! दोन्ही बाजुंना पानांच्या ओझ्याने वाकलेली आणि कोण येतंय बरं घाटातून अशा उत्सुकतेने बघणारी झाडं.. अगदी कोणीतरी येऊन लावली आहेत सिस्टीमॅटीकली असं वाटतं.. अर्थात इतकी झाडं त्यामुळे भरपूर फ्रेश आणि गारेगार हवा.. गाडीतल्या एसीच्या तोंडात मारेल अशी! तो ऑक्सिजन छातीत भरून ठेवायची आम्हा दोघांना खोडच लागलीय..
भरपुर मनासारखे घाटात हिंडून , वर खाली चढ उतार करून झाले की चाहुल लागते पाण्याची!
अशा सुंदर ठीकाणी त्याहुन अत्युत्तम तलाव/लेक पाहीजेच! तिथे गाडी लावून त्या शांत पाण्यावर कधी उठल्याच तर लहरी आणि वार्याचा झाडा-जंगलातून जाणारा आवाज ऐकत थांबून राहायचे..(हा लेक कॅसितास..)
एखादीच नाव पाणी कापत संथपणे चाललेली...
अशा काही जागा असतात तिथे तुम्ही निशब्द होता.. लास व्हेगासला मानवाने निर्माण केलेले ते कर्तृत्व पाहून आपण अचंबित होतो.. तर इथे.. कोण निर्माता कोण जाणे.. त्या अनाम निर्मात्याची ही कलाकुसर.. निसर्ग!
आनंदाने वेड नाही लागलं तर तुम्ही एक नंबरचे अरसिक! :)
( तटी: यातले काही फोटोज मागच्या वर्षी मी ब्लॉगवर टाकले आहेत. लेख लिहायचा म्हणून
ते व नवीन काही फोटोज इथे डकवले आहेत.. )
अजुन एक माहीती विकीवर मिळाली ती अशी की, इथे पुर्व-पश्चिम अशा पर्वतरांगा असल्याने सूर्योदयाच्यावेळी जगात काहीच गावांमधे दिसणारी "पिंक मोमेंट" दिसते.. विकीमधे म्हणतात..
"The fading sunlight creates a brilliant shade of pink on the Topatopa Bluffs that stand at the east end of the Ojai Valley, reaching over 6,000 feet (1,800 m) above sea level. Nordhoff Ridge, the western extension of the Topatopa Mountains, towers over the north side of the town and valley at more than 5,000 feet (1,500 m). Sulphur Mountain creates the southern ranges bounding the Ojai Valley, a little under 3,000 feet (910 m) in elevation."
( फोटो आंतरजालावरून साभार.. http://www.flickr.com/photos/gamma-infinity/540215547/)
शिवाय एक इंटरेस्टींग माहीती ओहायच्या संदर्भात.. लॅरी हॅगमॅन(आय ड्रीम ऑफ जिनी मधला नेल्सन) , जॉनी डेप आणि जे. कृष्णमूर्ती ( फिलॉसॉफर ) हे ओहायचे रहिवासी आहेत/होते.. विशेषत: जे कृष्णमूर्तींचे बरेच वास्तव्य इथे होते, आणि त्यांनी इथे बरेच काम केले आहे... :)

वाचने
5653
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
सगळे फोटो भन्नाट आहेत. तलाव तर अप्रतिम
पिंक मोमेंट सुद्धा आवडली. :)
ज ह ब र्या !
लेखनाची स्टाईल पण आवडली. एकदम गप्पा मारता मारता माहिती देत सगळीकडे हिंडवुन आणल्यासारखे वाटले.
येव्हडे कष्ट घेउन , हिंडुन तुम्ही फोटु वगैरे काढता आणी आम्ही मात्र बसल्या जागी मस्त सफर अनुभवतो ;)
स्वार्थी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
In reply to ज ह ब र्या by परिकथेतील राजकुमार
सहमत.....
इतके सुंदर रस्ते पाहुन फार आनंद वाटला.:)
आणि आपल्या इथले (हिंदूस्थानातले) रस्ते पाहुन देशातल्या वेगवेगळ्या पक्षांनी देशाचा किती विकास केला आहे याची जाणिव करुन देतात...असो. लेख आवडला अजुन वाचावयास आवडेल. :)
(सिमेंट-डांबर-पेव्हर ब्लॉक या मिश्र पद्धती रस्तांच्या देशात राहणारा)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
फोटो भन्नाटच आहेत ग, खरंच नि:शब्द व्हायला होतं असा निसर्ग पाहिला की..
स्वाती
लेखाचे शिर्षक बघुनच जे. कृष्णमूर्तींची आठवण झाली होती .(बाकीचे दोघे कोण आहेत हे माहीत नाही.)
ओहायबद्दल ऐकून माहीत होतं, पण त्याच्या नावामागचा इतिहास आत्ताच समजला. फोटोज अप्रतिम आलेत. नॅरो ब्रिजचा विशेष आवडला. गूगल मॅप्सवर बघत होतो हे ठिकाण, तर ओहायच्यापुढेही आय-फायपर्यंत बरंच मोठं जंगल दिसतं आहे. एकदा आलं पाहिजे भटकून.
मालिकेतल्या पुढच्या भागांची वाट बघतो. (सॉल्वँगसह) :)
In reply to सही by नंदन
हेच म्हणतो. सुरेख लेख , फोटो.
In reply to सही by नंदन
सहमत आहे.
हे ओजाय कुठे आलं हो? ;)
In reply to सही by नंदन
(भटक्या)बेसनलाडू
फोटोंबरोबर लेखही छान जमला आहे.
अजुन येउदे.
In reply to मस्त by आनंदयात्री
सहमत्..फोटो क्लास आले आहेत..
फारच छान फोटो आहेत. तलाव तर खासच!
तर मी आज सुरवात करतीय "माझी भटकंती" लिहायला.. जसं जमेल तसे इथे पाहीलेल्या गोष्टी, ठीकाणं इत्यादींवर लिहायचे ठरवत आहे..भटकंती छानच आहे. जरूर लिहीत रहा.. वाचायला आवडेल. --शाल्मली.
असे रस्ते आपल्याकडे झाले तर?
-------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे पहा
In reply to असे रस्ते by अमोल केळकर
आहेत. होत आहेत. आणि त्या रस्त्यावरुन जाताना वेगळाच आनंद मिळतो , आपलेपणाचा.
फोटु तर मस्तच
Ojai म्हणजे ओजइ किंवा ओजाइ ते ओहाय कसे काय मोठा प्रश्न आहे बुवा. ओहाय म्हणजे आपल Ohi नाही होत का?
अमेरीकन ईंग्लीश म्हणजे ....
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
In reply to मस्तच by पाषाणभेद
ज चा उच्चार य किंवा ह्य असा करतात्.ती युरोपियन पध्धत आहे.उ.दा. Jesus चा उच्चार हिब्रु मधे (ह्येसु).तोच मराठीत येशू.
John चा उच्चार यॉन असा पण करतात.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
In reply to ज by चिरोटा
मी पाषाणभेद यांना दिलेले उत्तर पेस्ट करते..
तो प्रकार स्पॅनिश मधून आलाय. साउथ कॅलिफॉर्निया पूर्वी मेक्सिको मधे होते. त्यामुळे इथली बरीच नावं अशीच.. विचित्र! :)सॅन होजे नाही का? स्पेलिंग प्रमाणे(San Jose) सॅन जोसे पाहीजे! :) तसेच ओहाय.. जे चा उच्चार ह करतात.. :)
मला हे युरोपिअन पद्धतीचे माहीत नव्हते.. कदाचित स्पेन मुळे असावं.. म्हणजे स्पॅनिश हा एक कॉमन भाग आहे मेक्सिको आणि स्पेन मधे, म्हणून वाटलं..
वा!! मस्त वर्णन...
फोटोही छान आहेत...
यु.के. मधे असे रस्ते आहेत...
ड्रायव्हींग करायला मस्त मजा येते....सतत ५-६ तास जरी ड्रायव्हींग केले तरी थकवा जाणवत नाही....
छान फोटो आणि ओघवते वर्णन! अशाच छान छान जागांची ओळख करून दे.
चकली
http://chakali.blogspot.com
भाग्यश्री,
फोटो अप्रतिम आणि सहज फिरता फिरता गप्पा मारव्यात तशी तुझी लेखन शैली.
फोटो आणि वर्णन दोन्ही सुरेख. :)
In reply to वा ! by शितल
शितलशी सहमत.
पुढची ट्रीप लवकर घडू दे!
रेवती
In reply to वा ! by शितल
मस्तच आहेत सगळे फोटो आणी तुझे लेखन पण
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
वा ! मस्त लेख व अप्रतिम फोटो. तळे तर मस्तच आहे. आता पुढची ट्रिप कुठे ? अजुन असेच लेख येउदेत.
- सूर्य.
अप्रतिम लेख. फोटो पाहूनही नि:शब्द होतो, तर प्रत्यक्षात पाहिल्यावर होणारच! अशीच नव्या नव्या सौन्दर्याची ओळख करून द्या, तुम्ही भटकंती करा, आम्ही घरबसल्या फिरण्याची मजा घेऊ! मस्त!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
शब्दच नाहीत गं..
लेक तर.... बोलती बंद!!!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
पाणि कापत चाललेली नाव तर फारच सुरेख ....!
--- आणि सहज सुंदर वर्णन .
छान!