पौर्णिमा
लेखनविषय:
काव्य विभागातल्या पौर्णिमा पाहून {वाचून} मला माझी पौर्णिमा खुणावू लागली. थोडी वेगळी पौर्णिमा.
हाकारले फुलांनी अंगार शोधताना
मज पौर्णिमा गवसली अंधार शोधताना
एकेक पाकळीचा एकेक सूर झाला
हरपून भान गेले गंधार शोधताना
माझ्यापुढे खुली ही झाली कुबेरनगरी,
माझ्याच अंतरीचे भांडार शोधताना
डोळ्यांत दाटलेले ते भाव मूर्त झाले
नाकारण्यात दडला स्वीकार शोधताना
खुलली अजाणता ती विश्वातली रहस्ये,
सगुणात निर्गुणाचा आकार शोधताना
मी, सावळ्या अरूपाची ब्रम्हलीन छाया
झाले तपस्विनी का संसार शोधताना?
वाचने
1762
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
अप्रतिम!
छान
>>खुलली
अप्रतिम... म
क्या बात है..