Skip to main content

पिल्ले ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 24/02/2012 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/20678 ८ फेब. १२ ला कुत्रीने पिल्लांना जन्म दिला होता. आम्ही घरी नव्हतो. आल्यावर हे सर्व दिसले जाणवले.वैतागून गेलो. पण पिल्लांना नि पिल्लांच्या आईला बाहेर कसे काढणार . .? मनात थोडा थोडा करुणेचा प्रकाश झिरपत होता . आम्ही विचार करून तिला अंगणातच राहू देणे मंजूर केले .मग तिला रोज काहीना काही खायला पण देत होतोच. ती खातपण होती. आम्ही दिसताच शेपूट हलवीत होती. तिच्या आर्जवीपणाचा राग येत होता . मग आम्ही आमच्याच मनाला गोंजारून समजावीत होतो आजकाल उष्मा वाढला होता.

कालाय तस्मै नम:

लेखक यकु यांनी शुक्रवार, 24/02/2012 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्याछूटच सांगून टाकतो शॉटमारी लेख लिहीतोय. त्यामुळं निगुतीनं वाचा; आता वेळ नसेल तर लगेच वाचूच नका. हे लिहिण्यामागे अपेक्षित असलेलं हस्तांतर शेवटी झालं की नाही ते सांगा. गेल्या काही दिवसांपासून मला एक प्रश्न पडला आहे. आपण जगात वावरतो कोणत्या आधारावर? आपल्या वावराला आधार कशाचा असतो? आपण एखाद्या काल्पनीक मितीमध्‍ये जगतो की आपल्या पायाखाली काही ठोस असतं? थोडासा आणखी फाटा फोडतो. मला ' काळ किंवा वेळ' दोन मूळ रुपात प्रतित होते. एक आहे काळाच्या उलटण्‍याची नैसर्गिक गती - ज्या गतीत कुणीही फेरफार करु शकत नाही. या काळाच्या उलटत असलेल्या नैसर्गिक गतीमध्‍ये काहीही फेरफार संभवत नाही.

कावळे ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 22/02/2012 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
कावळे मला आवडतात . काळ्या रंगाचे दिमाखदार कावळे खरेच सुंदर शुभ्र वाटतात . पहाटे पहाटे कावळ्यांची कावकाव मला ऐकू येते नि माझी झोप उघडते. खूप छान प्रसन्न वाटते. कधीतरी कोंबड्याची बांग पण ऐकू येते . कोठे कोंबडा असतो किंवा नसतो पण कावळा मात्र सतत असतो .मनाच्या फांदीवर बसलेला असतो. कोठेही जा कोणत्याही गावी जा.कावळा दिसत नाही असे कधी होत नाही . कावळा दिसला की आपल्याला खरेच खूप बरे वाटते. कावळे दिसावयास सारखेच असतात त्यांचा आवाज एक असतो. त्यांचा रुबाब सारखाच असतो.

बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया

लेखक जागु यांनी मंगळवार, 21/02/2012 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
भले मोठे ऐटीत मिरवणारे बकुळीचे झाड आणि त्याला लागणारी नाजूकशी फुले म्हणजे जणूकाही एक एक नक्षीदार कुडीच.

कडाक्याच्या थंडीमुळे रिक्षाचालकाचा मृत्यु

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 21/02/2012 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
बरं झालं आत्ताच रिक्षा रिझर्वला लागली ते. नायतर आतमध्ये पॅसेंजर बसलेले असतांना रिक्शा रिझर्वला लागली म्हणजे पॅसेंजर नको ते उगाच बोलतात. इतर ठिकाणी टाईमपास करत तासभर थांबतील पण रिक्षा रिझर्वला आली की पेटोलकॉक रिझर्वकरेपर्यंत देखील थांबायची त्यांची तयारी नसते. आता रात्रीचे दहा वाजत आले आहेत. पटकन जवळचा कांतीशेटचा पेट्रोलपंप बंद व्हायच्या आता पेट्रोल भरून घेतलं पाहीजे. नाहीतर उगाच लांब हायवेला जावून पेट्रोल भरावे लागेल. अन टाइमाची खोटी होइल ते अलग. रात्री अकराची लोकल सापडली पाहीजे. त्यात बरेच पॅसेंजर मिळतात लांब लांब जाणारे. आज सुपरवायझर राणे उगाचच तणतणत होता. म्हणे जॉब कमी निघाले. हॅ.

' सच्या दिलाचा राजा '

लेखक रामकुमार यांनी मंगळवार, 21/02/2012 02:41 या दिवशी प्रकाशित केले.
' सच्या दिलाचा राजा ' हातावर बसलेली माशी जशी पटकन आपण उडवावी तशीच माझ्या अंगावरील पांघरुणे मी उडवली कारण आज होता; निवडणुकीचा निकाल या धावपळीत दिवस गेला. मावळत्या दिशेला पाहिलं तर दिवस कासराभर राहिला होता. पाहता - पाहता अजगराने जसा बेडूक गिळावा तसा अंधाराने दिवस गीळाला. मी माझ्या वाड्यात आलो तर सर्व वाडा चीडीचाप स्मशान शांतता. एरवी असणाऱ्या दिवसात आणि आजच्या असणाऱ्या दिवसात जमीन आसमानाचा फरक होता हे पाहुन मला काही वेळ करंट बसल्यासारखे झ|ले असा का ?

अ हेरिटेज वॉक..

लेखक मस्त कलंदर यांनी बुधवार, 15/02/2012 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांपासून ठरत होतं, पण योग यायचा होता. तो या शनिवारी आला. काळ्या घोड्याचंही एक निमित्त होतंच. फोनाफोनी करत, मोडकांना ट्रेनची सफर(ही हिंदी/मराठी बरं का, इंग्रजीमधली नव्हे) घडवत फोर्टात पोचलो. एलआयसीच्या दर वळणानजिक दिसणार्‍या शाखेबरोबरोबर रामदासांची ब्रांच ही तर नव्हे अशा शंका मनी बाळगत एकदाचे त्यांच्या हापिसात पोचलो. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असतानाच रामदासांनी टेबलाखालून एक मोठं बाड बाहेर काढलं, '१९४५ ते बहुधा १९५६ पर्यंतचे टाईम मासिकाचे अंक' होते ते. खजिनाच तो, दुसरा शब्दच नाही!! हापिसातून उतरून खाली आलो, आणि अलीबाबाच्या पोतडीतून एक एक गोष्ट बाहेर येऊ लागली.

"आय विल ऑल्वेज लव यू, व्हिटनी ह्यूस्टन"

लेखक प्रास यांनी सोमवार, 13/02/2012 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
१९९२ सालच्या एप्रिल महिन्यात मी एका मोठ्या संकटातून पार झालो. अनेक दिवसांचा माझ्यावरचा 'पालकीय' पहारा त्यावेळी उठला. मी त्यावेळेपूर्वी हवा तेवढा झोपू शकत नव्हतो, खेळू शकत नव्हतो, इतकंच काय तर अगदी हवं ते पुस्तकही वाचू शकत नव्हतो. माझ्या या सगळ्या आवडत्या गोष्टींवर बंधनं टाकण्यात आली होती. माझ्यावर तोपर्यंत शेजार्‍यापाजार्‍यांपासून सतत कुणी ना कुणी लक्ष ठेऊन आहे असंच वाटायचं. बारावीची परीक्षा देत होतो ना मी त्या वर्षी! एप्रिल महिन्यात ती संपली आणि मी एका स्थानबद्धतेतून मला हवं तसं वागण्यासाठी मुक्त झालो.

पिल्ले ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 13/02/2012 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक फोन आला. तुमच्या अंगणातील झाडाखाली कुत्रीने पिल्ले टाकली आहेत .. काल संध्याकाळी मी दादाच्या घरी गेलो होतो. घरातून निघताना काम्पौंडचा दरवाजा आतून कडी लावून बंद केला होता. मग कुत्री आत घुसली कशी .? कोणी गेट उघडले ..? का उघडले ..? उघडले तर बंद का नाही केले ..? अशा अनेक प्रश्नांनी मन भरून गेले . आता त्या कुत्रीला नि त्या पिल्लांना बाहेर काढणार तरी कसे ..? माझी रात्र खराब होऊन गेली. गेल्या दोन चार दिवसा पासून कुत्री गेट जवळच झोपत होती. तेथेच रेंगाळत होती. पण ती गर्भार आहे ह्याची मला तरी सुतराम कल्पना नव्हती .आणि असे कधी दिसले, वाटलेही नव्हते .

फुलांची महामंडई-मार्केट यार्ड-पुणे

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 11/02/2012 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
मार्केट यार्ड...पुणे हे एक संपुर्ण वेगळं जग आहे...त्या विषयीचा लेख लिहायचा म्हणजे कमितकमी तिथला १वर्षाचा(१२महिने/२४तसाचा) परिपुर्ण अनुभव हवा...पण आज आपण जी सचित्र ओळख करुन घेणार आहोत तो या अ-खंड मार्केटयार्डचा शतांश आहे असं मानलं तरी चालेल...हे आहे फुलांचे मार्केट ऊर्फ फुलांची महामंडई(माझा या अफाट जगाताशी संमंध आला,तो या फुलांच्या रांगोळीच्या वेडापायी..)---तर चला मग मारायचा फेरफटका....१)हे कॉमन पेड पार्किंग..हा फटू टाकण्याचं कारण...ही सामान्य दिवशी असलेली वाहन गर्दी आहे,,फुल्ल सिझनला इथे खरच गाडी ठेवायला सुद्धा जागा नसते..