Skip to main content

बासरीविषयी थोडेसे !

लेखक चैतन्य दीक्षित यांनी सोमवार, 09/01/2012 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
बासरी हे भगवान् श्रीकृष्णाच्या हातात शोभलेलं एक लोभस वाद्य. कान्ह्याच्या बासरीचे सूर उमटावेत आणि गोपिकांनीच काय गाई-वासरांनीही देहभान विसरून जावं इतकी ह्या बासरीची किमया. अर्थात् ती बासरीची किमया की कान्ह्याची हे सांगणं अवघडच. ह्या बासरीविषयी एक कथा वाचण्यात आली ती अशी की कृष्णाचं बासरीवरच सर्वात अधिक प्रेम आहे हे जाणून गोपिका बासरीवर चिडून असायच्या. एकदा त्यांनी बासरीला विचारलंच की आम्ही असताना कान्ह्याचं तुझ्यावर इतकं प्रेम कसं? तर बासरीने उत्तर दिलं की मला एकूण सात छिद्रं आहेत. त्यातल्या ६ छिद्रांतून षड्रिपू केव्हाच बाहेर गेलेले आहेत.

काही किस्से...

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 05/01/2012 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
जालरंग प्रकाशन दरवर्षी ’शब्दगाऽऽरवा’ हा हिवाळी अंक (e-Publication) प्रकाशित करते. ह्या वर्षीच्या 'शब्दगाऽऽरवा २०११' मध्ये प्रकाशित झालेला माझा एक लेख इथे पुन: प्रकाशित करतो आहे. माणूस हा किस्सेबाज असतो. त्याला किस्से ऐकायला, सांगायला फार आवडते. अरे हो, पण ते किस्से झाल्याशिवाय कसे ऐकणार, सांगणार? मग ते किस्से करणे हेही त्याचे आवडते काम बनले. असंख्य किस्से आपल्या आजूबाजूला घडत असतात. काही किस्से आपण घडताना प्रत्यक्ष पाहतो.

हवेचा रंग कुठला?

लेखक गणपा यांनी रविवार, 01/01/2012 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
परवा लेक घरात शिरली ती एक प्रश्न मनात घेऊनच. “आई, हवा कुठल्या रंगाची असते?” इति लेक. “अगं हवेला रंग नसतो.” तिच्या बाला सुलभ प्रश्नाच बायकोने निरसन केल. “हरलीस?” “?” “अग हवेचा रंग गुलाबी असतो.” लेकीने तारा तोडला. आताशी बायकोच्या भूवयांच धनुष्य झाल होतं. “ते गाणं नाहीये कां ‘ही गुलाबी हवाऽऽऽऽऽऽ वेड लावी जीवाऽऽऽऽऽऽ’ येव्हाना लेकीने तालही धरला होता. मग एकदम खिदळली आणि म्हणाली “अग आई, पीजे होता”. “पण आई खरंच गुलाबी हवा म्हणजे काय?” बायकोचा छोटा पॉज. “कसला विंचार करतेयस आई.” “मोठ्या माणसांना वेगळ्या शब्दांत सांगाव लागत. लहान मुलांना साध्या सोप्प्या शब्दांत समजेल अस सांगाव लागत.

इन ट्रान्सिट...

लेखक अभिज्ञ यांनी बुधवार, 28/12/2011 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
टेंडरचे काम संपवून एअरपोर्टला पोहोचता पोहोचता रात्रीचे आठ वाजलेच.मुंबईला जाणारी रात्री साडे नऊ वाजताची फ़्लाईट पकडायची म्हणजे आधीच उशीर झाला होता.गडबडीत ऒन्लाईन चेक-इन करता आले नव्हते. ई-तिकिटावर कन्फ़मर्ड असे स्टेटस जरी दाखवत होते तरी मनात थोडी धाकधुक होतीच. सामानाचे स्कॆनिंग वगैरे सोपस्कार पार पाडून आत जातो तो काउंटर समोर हि भली मोठी रांग पाहून पोटात गोळाच आला.इतर फ़्लाइटना असलेली गर्दी पाहता इमिग्रेशन व सेक्युरिटी चेक संपवायला अर्धा एक तास सहजच लागणार होता. साडे नऊ ची फ़्लाईट म्हणजे किमान नऊ वाजता बोर्डिंग करणे आवश्यक होते.आताशा माझा धीर सुटायला लागला होता. त्याला कारणही तसेच होते.

एका लग्नाची............ (१)

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 26/12/2011 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
सत्यकथेवर आधारित, काही पात्रांची नावे बदलली आहेत (अर्थात काही चाणाक्ष मिपाकर ओळखतीलच ;) ) , भाषा संयत करण्याचा प्रयत्न केला आहे, पण आक्षेपार्ह आढळल्यास क्षमस्व ! कोणे एके काळी, जेव्हा लग्न - संस्थेला ' लव्ह मॅरेज' मान्य नव्हते .... " राक्याSSS, ती जेलरची पोरगी आहे " " मुख्य तरुंगाधिकारी !! " " हा येडा झालाय ! " " चढलीय भें** ला ! " " माझी तर उतरलीच, अजुन क्वार्टर मागव ! " पार्टी ऐन रंगात आली होती, आणी राक्या ने प्रस्ताव टाकला की सुमति ला पळवायची !! सुमति !! साक्षात सुमति !!

भ्रष्टाचारी उद्योगाविरुद्ध कारवाई व्हावी याकरिता दिलेल्या लढ्याचा वृत्तांत

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 21/12/2011 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
अजय पॉली प्रायवेट लिमिटेड या खासगी उद्योगाकडून सरकारच्या विविध खात्यांची कशा प्रकारे फसवणूक होत आहे याबद्दल मी शासनास एक सविस्तर पत्र लिहीले.

"इजय असो"

लेखक विसुनाना यांनी बुधवार, 21/12/2011 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम लेको, (म्हंजे शेरी लोकं म्हंत्यात तसं 'नमस्कार मंडळी' असं म्हनायचं असतया न्हवं?) गेला म्हैनाभर आपल्याला काय बोलायला टाईम गावला न्हाय. कसा गावंल? दिवाळी चाल्ली होती ना आमची. काय म्हनला? दिवाळी झाल्याला लै दिसं झाली? नाय वो, आमची दिवाळी तर परवाच्याला सपली. कसं काय सांगा बगू? जाऊंदे. तुमाला नाय समजायचं. अवो, गेला म्हैनाभर आमी म्हंजी आमच्या घरातल्या समद्यांनी लै ऐश केली. म्यातर दर्रोज रातीला मटान आनि कॉट्टर हानत होतो. त्येबी रोच्च्याला दोनशे रुपय घिऊन. वरनं बायकुलापन दर्रोज दोनशे रुपये आनि जेवान गावत होतं. घरातली चूल आनि बाहेरची धुनीभांडी सम्दं बंदच केल्तं तिनं.