Skip to main content

मरण ??

लेखक मिरची यांनी गुरुवार, 09/02/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
खरंच मरण एवढं अवघड आहे मान्य करायला? कुणाचं ? स्वतःच की दुसऱ्याच ?

प्राजक्त फुलला दारी

लेखक जागु यांनी मंगळवार, 07/02/2012 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजक्ताचे नाव काढताच डोळ्यासमोर येतो तो प्राजक्ताचा सडा त्याचा मंद सुगंध. प्राजक्ताच्या फुलाच रुपडंही अगदी सुंदर, केशरी रंगाचे देठ ह्याचे खास आकर्षण. प्राजक्त साधारण जुलै, ऑगस्टमध्ये बहरून येतो. असेच एक प्राजक्ताचे झाड माझ्या लहानपणी माझ्या माहेरच्या अंगणात होते. पावसाला सुरुवात झाली की काही दिवसांतच हा प्राजक्त बहरून यायचा. सकाळी छोट्या असणार्‍या कळ्या संध्याकाळी टपोर्‍या झालेल्या पाहताना मला खूप मजा वाटायची.

हास्यास्पद पाट्या...अमेरिकेतील...

लेखक वाटाड्या... यांनी मंगळवार, 07/02/2012 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो...मिपाकरहो... अमेरिकेत गावोगाव हिंडताना विविध प्रकारच्या पाट्या(हो इथेसुद्धा) पहायला मिळाल्या... त्यातल्याच काही पाट्या तुमच्या करता...

झपुर्झाच.......दुसरं काय ?

लेखक इरसाल यांनी शनिवार, 04/02/2012 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
जर का लता मंगेशकरांनी तुमच्यासाठी गाणे म्हटले, सचिनने शंभर तुम्हाला अर्पण केले, ए आर रहमानने तुम्ही गायलेल्या गाण्याला चाल आणि संगीत दिले तर तुमची अवस्था काय होईल.:D असाच काहीसा ढिंच्याक अनुभव मला आला.;) मला खात्री आहे काही ओळीनंतरच मिपाकर ओळखतील कि कोणाबद्दल बोलतोय ते.पण तरीही मी सांगणार नाही फक्त शेवटी एक संकेत (मराठीत-हिंट) देणार. ;) नवीन कंपनीत लागून २/३ च महिने झाले होते.सुरुवातीला कॉर्पोरेट ऑफिस सुप्रसिद्ध रॅडिसन हॉटेल मध्ये होते.पण कारखान्याचे बांधकाम चालू झाल्याने मुख्यप्रबंधकाने (मराठीत- एमडी) सगळ्या विभागप्रमुखांना कारखान्यावर पिटाळले( थोडक्यात हाकलले ४५ कि.मी. दूर):(.

आईपण

लेखक सुषमा आर्या यांनी शुक्रवार, 03/02/2012 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
'आई' या शब्दातच सारं जग सामावले आहे. आईपण मिळण्यासाठी प्रत्येक स्त्री किती आसुसलेली असते. मी एका private हॉस्पिटलमध्ये assistant customer care म्हणून जॉब करत होते. तिथली माझी सहकारी आणि मैत्रीण कविता. कविताचा नववा महिना संपत आला होता. हॉस्पिटलमध्ये स्त्री कामगारांना insurance policy द्वारे बाळंतपणाचा खर्च मिळत असे. त्यामुळे ती निश्चिंत होती. त्या दिवशी telephone operator न आल्यामुळे EPBX बोर्ड वर माझी duty होती. आणि त्याच दिवशी कविताला मुलगी झाली. मुलगी अतिशय सुंदर होती.

करंssट-मिसळ(४४० व्होल्ट)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 01/02/2012 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस लिहिन..लिहिन म्हणत होतो,,,सौरभनी काल आमच्या या करंट मिसळची अठवण करुन दिली ,आणी आज मुहुर्त लागला...तर ठाकाण कोणतं..?

ते दिवस सुंदर होते ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 31/01/2012 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात कधीतरी छान दिवस येतात . खूप मनासारख्या घटणा घडत राहतात. कुणाचेतरी आशीर्वाद आपल्यामागे असतात . आणि हे खूप खरे असते. मला अचानकपणे छान नोकरी मिळाली.मिळेल की नाही असे वाटत असताना मिळाली.कुणाचा वशिला नव्हता. डोक्यावर कुणाचा हात नव्हता. तशी ह्या महानगरात कुणाची तशी ओळख नव्हती.गावाच्या मुलाची जशी परिस्थिती तशी माझी होती पण वरच्याचा हात होता. त्याने बोट पकडले होते. आणि मी त्याच्या आधाराने वाट तुडवीत होतो. . मुंबईत छोटासां फ्ल्याट होता काकाचा. ते निवृत्त झाले होते.नि. जरा निवांत जगावे म्हणून ते गावी आले होते. निसर्गात ते मनापासून रमत होते.गावाकडची थंड हवा त्याना हवी होती.