Skip to main content

निजेला लॅपटॉप

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 08/04/2012 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
६ मार्च २०१२, सकाळी आठच्या सुमारास आम्ही कल्याणला, मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसमध्ये, एस-४ डब्यात आपल्या आरक्षित बैठकांवर स्थानापन्न झालो. गाडी सुटली. कामाचा दिवस आणि उलटी दिशा, ह्यामुळे गाडीला अजिबातच गर्दी नव्हती. कशाला उगाच आरक्षणाचा खर्च केला, त्यासाठी उगाचच जिवाचा आटापिटा केला असे वाटायला लागले. नेहमी शनिवार-रविवार-सुट्टीचे पुण्याला जाणारे आम्ही.

मारवा !

लेखक चैतन्य दीक्षित यांनी शुक्रवार, 06/04/2012 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी संध्याकाळी अचानकच आभाळ दाटलं होतं. नेहमीपेक्षा लवकर, आणि जरा जास्त अंधारून आलं होतं. आणि अशात सीडीवर वसंतरावांचा 'मारवा' लागला होता. 'मदमाती चली चमकत दामनीसी.... ' असे काही तरी बोल असावेत विलंबित ख्यालाचे.वसंतराव मारव्याच एक एक पदर उलगडत होते, आणि इकडे मनःपटलावर वेगवेगळ्या प्रतिमा तयार होत होत्या आणि विरून जात होत्या. कुणी जुना मित्र भेटावा, आणि कुणालाही न सांगता येण्याजोगं काहीतरी गहिरं असं त्यानं आपल्यासमोर मोकळं करावं तसंच झालं होतं अगदी. मन हळवं झालं होतं.

मोबाईल कंपन्यांची नवी बाजू

लेखक मनमौजी यांनी गुरुवार, 05/04/2012 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझा सोबत घडलेल्या ह्या प्रसंगाने मला मोबाईल कंपन्यांची नवी बाजू दाखवली. तिच बाजू तुमचा समोर मांडण्याचा हा माझा प्रयत्न. मि एक एअरटेल प्रि-पेड चा ग्राहक आहे. एअरटेल प्रि-पेड सोबत मि नेटवर्क विशयीचे चित्र-विचित्र अनुभव घेतच असतो. परन्तु, यावेळी तस नाही. काल रात्रि मि पाहिलेले शेवटची शिल्लक होती रू.५०.५४. पण आज सकाळी जेव्हा मि एका कॉल नन्तर बिल पाहिले तेव्हा मला ध्यानत आले की एअरटेलने माझा १ पैसा कमी केला होता. माझी शिल्लक रू.४५.५३ इतकी होती. १९८ ला लगेच कॉल केला. ५-७ मिनिट लागले कस्टमर केअर एक्झिक्युटीवशी बोलायला. त्या सुन्दर आवाझ असनार्‍या बाईला माझ बोलण पटेना.

सदमा.....

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 04/04/2012 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
बडीशेप चघळत बाहेर पडलो तेव्हा रात्रीचा जवळ जवळ एक वाजला होता. नाशिक पुणे रस्त्यावर संगमनेरच्या थोडे अलीकडे असणाऱ्या या ढाब्या कडे आजवर मी कधी ढुंकून बघितलं नव्हतं. पण आज इतका वैतागलो होतो, थकलो होतो की आता गाडी चालवण्याचा कंटाळा आला होता. एक तर सक्काळी चार वाजता नाशिकहून निघालो होतो. पुण्यातले काम आटोपून पुन्हा परत निघायला उशीर झालेला. पुण्याला बहुदा आजवर चालक घेऊन जावसं वाटलं नाही. त्यामुळे मी पुण्याला आलो की चालक नाशकात ऐश करतो. आम जनता बहुतेक नाशिक पुणे रस्त्याला कावलेली असते. पण मला हा रस्ता आवडतो. फुल रोमांटिक रस्ता आहे.

पैसा कमाओ पर दुआ भी कमाओ , मिया !

लेखक पहाटवारा यांनी बुधवार, 04/04/2012 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
हैद्राबादी हिन्दी ची थोडि झलक म्हणून लिहिले आहे .. इंदुरि झलक वाचून जरा तल्लफ आली म्हणून .. स्थळ - हैदराबादेतील एक मुन्सिपल ओफिस जिथे जन्म नोन्दणी होते ते "स्स्लाम आलेकुम मिया .. खॅरियत ??" "बोलो , क्या काम है?" डोळे वर न ऊचलता साहेब बोलले .. "छोटासा काम है बस .." "अरे छोटा , बडा सब काम करने के वास्तेच बैठे है , बोलो." "मिया , ये अस्लम , मेरा छोटा भाई" "तो ?" "इनो एक छोकरि हूई परसूं को , ह्यां कोटि अस्पताल मेंईच हुई .." "हां , काम बोलो" अजुनहि साहेबाची नजर काहि वर येइना .. "ये बरथ सरटिफिकिटां ..." "फोर्म भरो .. बाहर .. " "नहि मियां .. ये सरटिफि़किटां मिलेसो है ..

काही नोंदी अशातशाच... - ९

लेखक श्रावण मोडक यांनी सोमवार, 02/04/2012 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
दहा दिवस झाले वास्तवात या गोष्टीला. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू व्हायचा होता. पण त्याची हवा तयार होत गेली होती. या आंदोलनाचा, खरं तर आंदोलनामागील मागणीमागील विचाराचा, विरोधक हीच माझी त्या वर्तुळात प्रतिमा होती आणि आहेही. स्वाभाविकच ते सारे एका बाजूला आणि मी एका बाजूला अशी चर्चा सुरू होती. चर्चा नव्हे, किंचित वादच. समोर एक वकील होते, त्यांचे दोघे-तिघे समर्थक, एक प्राध्यापक. भ्रष्टाचाराची कीड वगैरे शब्दप्रयोगांपलीकडे सारा विषय. त्यामुळे मुळात जनलोकपालाची गरज कशी आहे, त्यासाठी कायदा कसा झाला पाहिजे हे ते मला पटवून देत होते. म्हणजे, माझं मतपरिवर्तन करण्यासाठी नाही.

जागो ग्राहक जागो - एक अनुभव

लेखक बाळ सप्रे यांनी शुक्रवार, 30/03/2012 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
दिड एक वर्षापूर्वीची गोष्टं.. टिपिकल ट्रॅप.. बिग बझार/ उत्सव प्रदर्शनात स्लिप भरलेली.. तिथे मिळवलेला फोन नं. वापरून फोन आला.. लकी ड्रॉ मध्ये तुमचा नंबर लागलाय.. ३ दिवस ४ रात्री हॉलिडे फ्री वगैरे वगैरे.. खरं तर फक्त टाइमपास म्हणून गेलो. ठरवलं होतं थोड ऐकायचं.. काय फ्री असेल तर घ्यायचं आणि परत फिरायचं.. भन्नाट दावे केलेले.. ज्या हॉटेल्सचा मार्केट रेट ७०००-८०००रु दर दिवशी आहे अशी हॉटेल्स ७००-८००रुपयात मिळतील.. ते पण फक्त "युटिलिटि चार्जेस"!! भारतात आणि परदेशात हजारो ठिकाणी टायअप्स्.. सर्व बुकिंग सेवा ऑनलाइन उपलब्ध.. परदेशात तर युटिलिटि चार्जेस दर आठवड्याला फक्त $१०० !!

ती

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 29/03/2012 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
लोकांचे मला माहीत नाही, पण मला ती फारच हवीहवीशी वाटते. तिच्यात काय आहे एवढे? अहो, प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट आवडली पाहिजे असे कुठे आहे? मला मात्र ती आवडते. विशिष्ट वेळ झाली, संकेत झाला की मला तिच्या येण्याचे वेध लागतात. मन अनावर होते. शरीर बंड करू लागते. अर्थात, मी काही तिला मोबाईल उचलून हाक घालत नाही. केवळ तशी प्रथा नाही म्हणून. एरव्ही तेही आवडले असते. तिचे वर्णनच करायचे झाले तर फार बहारीचे होईल. मात्र हल्ली इंग्लिशमध्ये जर वर्णन केले नाही तर त्याला फारशी 'व्हॅल्यू' नसते.