झपुर्झाच.......दुसरं काय ?
जर का लता मंगेशकरांनी तुमच्यासाठी गाणे म्हटले, सचिनने शंभर तुम्हाला अर्पण केले, ए आर रहमानने तुम्ही गायलेल्या गाण्याला चाल आणि संगीत दिले तर तुमची अवस्था काय होईल.:D
असाच काहीसा ढिंच्याक अनुभव मला आला.;)
मला खात्री आहे काही ओळीनंतरच मिपाकर ओळखतील कि कोणाबद्दल बोलतोय ते.पण तरीही मी सांगणार नाही फक्त शेवटी एक संकेत (मराठीत-हिंट) देणार. ;)
नवीन कंपनीत लागून २/३ च महिने झाले होते.सुरुवातीला कॉर्पोरेट ऑफिस सुप्रसिद्ध रॅडिसन हॉटेल मध्ये होते.पण कारखान्याचे बांधकाम चालू झाल्याने मुख्यप्रबंधकाने (मराठीत- एमडी) सगळ्या विभागप्रमुखांना कारखान्यावर पिटाळले( थोडक्यात हाकलले ४५ कि.मी. दूर):(. एक प्रकारे आम्ही काही मोजकेच लोक हिरवळीतून वाळवंटात विस्थापित झालो.
सुरुवातीला आमचे मुख्य काम काहीच नव्हते फक्त मुकादमगिरी,नवनवीन यंत्रांच्या दरसूची मागवणे, निवड करणे आणि आपापल्या विभागाचे बांधकाम नकाशाबरहुकूम चालले कि नाही ह्याचे लक्ष ठेवणे हेच होते.
अश्यात सोबतीला फक्त अंकधरसंगणक होता.अश्याच एका रिकामटेकड्या दिवशी आंजावर मिसळपाव कसा बनवायचा तोही कोल्हापुरी हे शोधत होतो अचानक “मिसळपाव.कॉम” खाली " अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं.... " अशी अर्धवट ओळ असणाऱ्या संकेतस्थळाचा शोध लागला आणि अचानक तोंडातून शब्द बाहेर पडले "ओ त्तेरी णू के होण लाग ऱ्या घणी सुरती लाग ऱ्ही" :love: मग काय अलिबाबाची गुहाच माझ्यासाठी उघडली गेली.
वाचनाची भयानक 8) आवड आधीपासूनच होती. त्यातल्या त्यात मी पहिल्यापासूनच "शुद्ध मांसाहारी" सुद्धा आहे. म्हणूनच मिपावर वाचनाबरोबर पाककृती हा विभाग पाहून "दिल बाग बाग झाला". आणि दुधात साखर पडली.
वाचनाबरोबर दिवसेंदिवस माझा अभ्यास वाढवत होतो. आधी व्य. नि., खफ, बाडीस, पुलेशु,:~ वगैरे काय हे सगळे अवांतर चेंडू होते. काही म्हणजे काही समजायचे नाही. बाकीचे इथे "जाणकार", "प्रस्थापित" वगैरे होते त्यामुळे थोडे दबून असायचो.
आताचे नवीन सदस्य जरा पुढारलेले आहेत आता जे सदस्य येतात ते मुख्यत्वे तीन गोष्टी बरोबर घेवून येतात "जिलेबीचे थाळ, शाल-श्रीफळ (महावस्त्र- नारळ) आणि फसफसता उत्साह (यात काही इमरतीहि असतात हा भाग वेगळा)(कोल्हापुरी चपला, डायरी वगैरे तत्सम वस्तू मिपावर पुरवल्या जातात.))
इतका गुऱ्हाळ लावायचं कारण हे कि मला पाककृती मध्ये चिकनची एक अफलातून पाककृती मिळाली.
अहाहा काय वर्णू त्या पाकृचा महिमा, पदार्थांची मागणी, कच्चा माल सुबकतेने हाताळायची कला, पायरी पायरीने बनणाऱ्या चविष्ट पदार्थाचे सादरीकरण आणि सगळ्यात शेवटी म्हणजे पूर्ण तयार असलेल्या पदार्थाला नव-वधू प्रमाणे नखशिखांत सजवून खादाडांपुढे प्रस्तुत करणे हे कोणी त्यातून शिकावे.
आयला "कोण" आहे इतके सफाईदारपणे सगळे काही मंत्रमुग्धपणे साकार करणार.
ह्या "कोण" शी मनापासून ओळख वाढवावी असे वाटू लागले पण हिम्मत काही होईना.मिपाच्या भाषेत "कोण" प्रस्थापितांमध्ये सामील, त्यामुळे जरा भीड चेपत नव्हती. बरं हि व्यक्ती मिपावर लाडकी आणि प्रसिद्ध हि होती/आहे/राहील. पण अचानक काही लेख वाचताना जाणवले कि "कोण" ची आणि आपली वारंवारता जुळतेय. मग अहो जाहो सुरु होवून ग-पत्राची देवाणघेवाण झाली.
मग काय विचारता एक दिवस चक्क गबोल्यावर भेटलो.शालेय जीवनातला दुरावलेला मित्र सापडल्याचा आनंद झाला.गबोल्यावर बात करताना कधी घट्ट मैत्री जुळली हे आणि अहो जाहो वरून कधी अरे तुरे वर आलो कळलेच नाही.
आज पर्यंत कधी न भेटलेली व्यक्ती कशी इतकी जवळची बनते ना कधी कधी हे कोडे उलगडत नाही.
अश्याच बातांमध्ये मग "कोण" कडून माझ्या अपेक्षा वाढल्या.मधेच मी काही मागणी करायला लागलो.अहो आश्चर्य मागणी पूर्ण झाली, एकदा नाही बऱ्याचदा.
आता हेच घ्याना कालच एक अफलातून भेट मला मिळाली काय असेल बरे.........फक्त आणि फक्त माझ्याच साठी.........तुम्हीच पाहाना आणि सांगा.................” कोण” कोण आहे ते?
वर्गीकरण
तो गंपा आहे की काय? हिंट काही
दुसरं कोण हो...? तो अमचा
न्हाई!!
In reply to न्हाई!! by तुषार काळभोर
ओ पैलवान.....नाय वो तसा काय
In reply to ओ पैलवान.....नाय वो तसा काय by इरसाल
आर्रर्र...
नक्की झालं काय ? जल्लां
मग अहो जाहो सुरु होवून
कोडी कसली घालताय?
काहीतरी भानगड घडून गडबड
मग कोण? मराठमोळे की काय?
गणपाच असणार.खात्रिने
इरसाल, ओळखलयं की ती व्यक्ती
इरसाल भाव तुझाकडे चाखलेल्या
गणपाच तो!!
गंपाच तो
भारी लिहिले आहे .. लग्न
मला एक बेसिक प्रश्न पडला
In reply to मला एक बेसिक प्रश्न पडला by विश्वनाथ मेहेंदळे
+१
In reply to +१ by सुहास झेले
बहुधा.. जा पोरी जा..
In reply to मला एक बेसिक प्रश्न पडला by विश्वनाथ मेहेंदळे
झपुर्झा म्हणजे
ही ती प्रसीध्द कवीता
धन्यवाद चिन्तामणीजी, हेच
In reply to धन्यवाद चिन्तामणीजी, हेच by इरसाल
धन्यवाद पोहोचले. आधी उत्तर
In reply to धन्यवाद पोहोचले. आधी उत्तर by रेवती
झपूर्झा ! गडे झपूर्झा !
In reply to झपूर्झा ! गडे झपूर्झा ! by चिंतामणी
चिंतुकाका, तुम्ही थांबा
In reply to चिंतुकाका, तुम्ही थांबा by रेवती
थांबतो.
रेवती +१
:)
अजून चालूच आहे का ? चालू
उत्सुकता वाढलीय राव, 'त्या'
कोण ?
In reply to कोण ? by इरसाल
हे हे हे
In reply to कोण ? by इरसाल
डॉले पाणावले मित्रा.
In reply to डॉले पाणावले मित्रा. by गणपा
(No subject)
हुर्रेर्रे..!