Skip to main content

आईपण

आईपण

Published on शुक्रवार, 03/02/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
'आई' या शब्दातच सारं जग सामावले आहे. आईपण मिळण्यासाठी प्रत्येक स्त्री किती आसुसलेली असते. मी एका private हॉस्पिटलमध्ये assistant customer care म्हणून जॉब करत होते. तिथली माझी सहकारी आणि मैत्रीण कविता. कविताचा नववा महिना संपत आला होता. हॉस्पिटलमध्ये स्त्री कामगारांना insurance policy द्वारे बाळंतपणाचा खर्च मिळत असे. त्यामुळे ती निश्चिंत होती. त्या दिवशी telephone operator न आल्यामुळे EPBX बोर्ड वर माझी duty होती. आणि त्याच दिवशी कविताला मुलगी झाली. मुलगी अतिशय सुंदर होती. संध्याकाळ झाली तशी कविताचा फोन आला, insurance policy मध्ये नमूद केल्याप्रमाणे जितका खर्च मिळणार होता त्यापेक्षा जास्त खर्च तिच्या बाळंतपणावर झाला होता. आणि जी excess amount आहे ती तिला भरावी लागणार होती पण तेवढे सुद्धा पैसे तिच्याकडे नव्हते. आणि कहर म्हणजे हॉस्पिटल ने तिचे बाळ दुसरीकडे हलवले. जोपर्यंत ती पैसे भरणार नव्हती तोपर्यंत तिचे बाळ तिला मिळणार नव्हते. ती अगदी काकुळतीला आली. तिच्या रूम मधून सारखे फोन येऊ लागले. सगळ्यांशी बोलून झाले पण कोणीच तिची मदत करायला तयार होत नव्हते. तिच्या नवऱ्याने पण सर्वतोपरी प्रयत्न केले. ती हॉस्पिटलची employee असूनसुद्धा तिच्यावर एवढा विश्वास हॉस्पिटलने दाखवू नये? दुसरया दिवशी माझा ऑफ होता. तिसऱ्या दिवशी कामावर आल्यानंतर तिला फोन करणार लागलीच तिचा फोन आला. ती हसतच सांगू लागली, 'अग चमत्कार झाला. आमचे सगळे बिल भरले आणि आमचे बाळ आम्हाला मिळाले'. मला ऐकून खूप आनंद झाला. ती पुढे सांगू लागली, special ward मधील एका बोर्ही मुल्सिम स्त्रीला मुलगा झाला होता पण ती बाळाला दुध पाजू शकत नव्हती तेव्हा कविताने तिच्या बाळाला आपले दुध पाजले. तिने जे केले ते निस्वार्थीपणे. पण त्या स्त्रीने तिचे हे दुधाचे कर्ज फेडले. तिला कविताची सगळी कर्मकहाणी समजली आणि तिने कविताचे सगळे बिल भरले. कविताचे शेवटचे वाक्य , 'जगात कुठेतरी देव आहे' , मी म्हटलं , 'खरेच!'.........
लेखनप्रकार

याद्या 3975
प्रतिक्रिया 25

प्रसंग टचिंग आहे.. पण स्वतःच्या एंप्लॉयीबाबत हॉस्पीटल असं वागेल असं मानणं कठीण गेलं. शिवाय डिफॉल्टर असला तरी मूल आईपासून तोडणं हा सरळसरळ अपराध आहे..

In reply to by गवि

असं कोणी वागेल असं वाटत नाही. एम्प्लोयीजसाठी सरकारी आस्थापनात मेडिकल बिले मिळतात आणि खाजगी कर्मचार्‍यांसाठी इ.एस.आय. (विम्याची) सोय असते. आणि हे हॉस्पिटल्सना चांगलं माहिती असतं. जर अशी घटना खरोखरच घडली असेल तर तुम्ही लोकानी मिडियापर्यंत पोचवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता.

In reply to by गवि

प्रसंग टचिंग आहे पण त्या आधी संतापजनक आणि घृणास्पद आहे. कुठल्याही नवजात अर्भकाला आईपासून दूर ठेवणे, ते पण काही हजारांच्या बिलासाठी हे अमानुष कृत्य आहे. हा प्रसंग खरा असेल तर या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. मिपावर अनेक पत्रकार, राजकीय पक्षांशी संबंधित लोक आहेत. ते या बद्दल काही करू शकतील का? अडचण एकच दिसते, ती म्हणजे पिडीत व्यक्ती त्याच ठिकाणी काम करते. त्यामुळे आपल्या employer विरुद्ध दाद मागायला धजावेल की नाही ते सांगता येत नाही.

In reply to by प्रचेतस

डिस्क्लेमर :: कोंडकेजी, पर्सनली घेउ नये....
अनुभव टचिंग पण दादा कोंडके भावुक होऊन ढसाढसा रडताना पाहून गंमत वाटली.
बसवला टेंपोत, मी हे वाक्य पर्‍याच्या श्टाइलमध्ये वाचलं ना...

हॉस्पिटलच्या बोर्डावर माणसे आहेत कां?

शेवटी माणुसच माणसाच्या मदतीला येतो. एका ठिकाणी माणुसकीचा पुर्ण अभाव दिसतो तर दुसरीकडे माणसामधेच देव दिसुन येतो!

In reply to by मोहनराव

मोहनराव, आपण काही चुकताय का? बाइच बाइच्या मदतीला येते... असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही म्हटलं, वरील प्रसंगात दोन्हीही ठिकाणी जर माणुस असेल तर काय होइल हे इमॅजिन करुन लोळतो आहे....

In reply to by वपाडाव

'बाई' ही माणसात येत नाही का ? की अश्या संवेदनशील विषयावर हसताना जनावरे अन माणूस यात काहीच फरक असा उरत नाही ?? आई पासून मुल तोडणे हा अक्षम्य अपराध आहे , मग ते माणसाचे मूल असो की जनावराचे अन ते ही नवजात शिशू ?

In reply to by वपाडाव

हा जरा गंभीर मुद्दा आहे. इथे नीट चर्चा होऊ द्यात ना राव. दंगे घालायला खूप धागे आहेत. बाकी कुणाला काय .... निरीक्षण.... वगैरे वगैरे नेहमीप्रमाणे. (उपप्रतिसाद वप्याला दिला असला तरी तो केवळ त्यालाच उद्देशून नाही.)

मन हेलावणारा अनुभव.......

अस्सला राग आला आहे ना हा लेख वाचून ... हे हॉस्पिटल कुठे आहे ग? जरा नाव सांगशील का ? (व्यनी तून सांगीतलेस तरी चालेल या अश्या व्यवसाईक धंदेवाईक हॉस्पिटल्स ना वठणीवर आणायलाच पाहीजे. लगता हैं इनके सिनेमें दिल नहीं धडकते .. यांना कोमातच पाठवायला पाहीजे ते ही कायमचे , त्यांचे रजिस्ट्रेशनच बंद करायला पाहीजे. ) असेच एक प्रकरण झाले होते. एक हॉस्पिटल प्रेताचा ताबाच देत नव्हते. २ दिवसात पेशंट जनरल मधून आयसीयू त हलवला ,१० दिवस पेशंट आय सी सी यू त होता अन मग एक्स्पायर्ड झाले हॉस्पिटल ने बिल जनरल वॉर्ड अन आय सी सी यू या दोघांचे लावले ते पण औषधांसकट ! एकच पेशंट दोन ठिकाणी एकाच वेळी कसा असू शकतो ???

In reply to by वाहीदा

अस्सला राग आला आहे ना हा लेख वाचून ... हे हॉस्पिटल कुठे आहे ग? जरा नाव सांगशील का ? हम्म, आता आपण काय कराल याची उत्सुकता लागली आहे. -दिलीप बिरुटे

चमत्कारीकच दिसतेय हॉस्पिटल! एका श्रीमंत कुटुंबात सुनेला मुलगी झाल्याने बील द्यायला ना माहेरचे लोक राजी होते ना सासरचे. हा प्रसंग जितका विचित्र होता तसे काहीसे (किंवा थोडे जास्त) विकृत वाटले. तसाच विचित्र अनुभव माझ्या आतेबहिणीला नावाजलेल्या प्रसूतीगृहात आला होता. तिचा ना बील देण्याचा प्रश्न होता ना मुलगा/मुलगी होण्याचा.

कळस आहे.स्वतःच्या एमप्लोयीबद्दल दवाखाना अस कस करू शकतो? आणि बाळाला आईपासून तोडन म्हंजे अतीच.कुठे फेडतील हे पाप.कविताने तिचे दुध दुसर्याच्या बाळाला पाजले पण तिच्या स्वतःच्या बाळाच काय?ते उपाशीच? तुम्ही कर्माच्र्यानीही आवाज उठवायला हवा होता.किवा निदान वर्गणी काढून दवाखान्याची फी तरी भरायला हवी होती. त्या दवाखान्याच नाव सांगा.जेणेकरून आम्ही तिथे जायचं टाळू

In reply to by किचेन

त्या दवाखान्याच नाव सांगा. जेणेकरून आम्ही तिथे जायचं टाळू
मी आधीच सांगितलेलं पण कुणाचा विश्वास बसेल तर शप्पत !! पुन्हा एकदा वाचा हवं तर.... www.misalpav.com/node/20283#comment-363910