अ हेरिटेज वॉक..
खूप दिवसांपासून ठरत होतं, पण योग यायचा होता. तो या शनिवारी आला. काळ्या घोड्याचंही एक निमित्त होतंच. फोनाफोनी करत, मोडकांना ट्रेनची सफर(ही हिंदी/मराठी बरं का, इंग्रजीमधली नव्हे) घडवत फोर्टात पोचलो. एलआयसीच्या दर वळणानजिक दिसणार्या शाखेबरोबरोबर रामदासांची ब्रांच ही तर नव्हे अशा शंका मनी बाळगत एकदाचे त्यांच्या हापिसात पोचलो. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असतानाच रामदासांनी टेबलाखालून एक मोठं बाड बाहेर काढलं, '१९४५ ते बहुधा १९५६ पर्यंतचे टाईम मासिकाचे अंक' होते ते. खजिनाच तो, दुसरा शब्दच नाही!!
हापिसातून उतरून खाली आलो, आणि अलीबाबाच्या पोतडीतून एक एक गोष्ट बाहेर येऊ लागली. रस्त्याच्या दुतर्फा ताशीव दगडांच्या, मजबूत आणि प्रशस्त इमारती. प्रत्येक इमारतीची स्वतःची एक कहाणी. ती कुणी बांधली, त्या मूळ मालक कंपनीचं पुढं काय झालं, तिची किती, कशी आणि कोणत्या कारणाने हस्तांतरे झाली, हा सगळा इतिहास सांगायला रामदासच हवेत.
देशेदेशीच्या वास्तुशिल्पकलेचे नमुने इथल्या इमारतींमध्ये साकारले आहेत. या पहा रोमन शैलीतले खांब मिरवणार्या इमारती:
इतरांच्या हातचं पाणी न चालणार्या भटांसाठी राजस्थानी ब्राह्मणांनी चालवलेलं चहाचं दुकान. पाटीचं स्वरूपच दुकान किती जुनं असेल हे सांगायला पुरेसं आहे.
ही आहे पारशी लोकांची विहीर. काळाच्या ओघात तिची देखभाल होत नाहीय, पाणी दूषित होतं आहे आणि आजूबाजूलाही अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय. साहजिकच त्यामुळं ती सध्या बंद अवस्थेत आहे.
विहीरीचा दुरून काढलेला फोटो:
विहिरीवरची भित्तीशिल्पे:
विहिरीवरचा फारसी/इराणी मजकूरः
ग्रीक शैलीतली (बहुधा मार्शल & मार्शलची) इमारतः
मोडकांनी उल्लेखलेलं इटालियन मार्बलः
थोडंसं दुरून पाहिलं की दुरवस्था लक्षात येते:
या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर भित्तीशिल्पं आहेत. मी फक्त पहिल्या मजल्यावरच्या शिल्पाचा फोटो घेतला आहे.
लढवय्या पुरूष, त्याची लेकुरवाळी स्त्री आणि ड्रॅगनशी झुंजतानाचा त्याचा अविर्भाव अगदी प्रेमात पडावं असाच!!
प्रसिद्ध स्ट्रँड बुक स्टॉल आणि दारातून बाहेर पडताहेत ते श्री. अशोक शहाणे(संदर्भः मोडकांचा प्रतिसाद):
सगळ्या विलायती शैलींमधून आपलं वेगळेपण दाखवणार्या इमारतीवरची ही लक्ष्मीची मूर्ती:
काळाच्या ओघासोबत न बदललेली आणि अजूनही लाकडावर चालणार्या भट्टीची बेकरी:
बेकरीवरच्या पाट्याही तितक्याच जुन्या आहेत.
इथली खारी, मावा केक आणि बन मस्का इतका रूचकर होता की फोटो काढण्याचं लक्षातच आलं नाही. खास यांचा आस्वाद घेण्यासाठी इथं कितीही वेळा जाण्याची माझी तयारी आहे. :-)
हे रेमण्डसचं दुकान, पण इतर दुकानांहून जास्त महत्त्व मिळालेलं. शपथविधीपूर्वीचे मंत्र्यासंत्र्यांचे कपडे इथेच शिवले जातात म्हणे. (आर आर आबांनी मात्र ही परंपरा मोडली. शपथेपूर्वी की नंतर हे माहित नाही)
ही देखणी इमारत इथे मुंबईतच आहे असं कुणी सांगितलं असतं तर माझा त्यावर विश्वास बसला नसता.
तिच्या शेजारची ही दुसरी इमारतः
या दोन इमारतींसमोरच हे शांत, धीरगंभीरसं चर्च.
याची बहुधा पुर्नबांधणी झाली असावी. ही त्याच चर्चची मागील बाजू.
पारशांची विहीर बुजवली असली तरी एशियाटिक सोसायटी समोरील ही १८७३ साली बांधलेली विहीर वापरात आहे. तिच्यावरची कोनशिला:
तिथेच असलेला हंडा:
यानंतर एशियाटिकसमोर काळाघोडा संगीत महोत्सवाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. ऐकू येणार्या तबल्यावरच्या खड्या बोलांनी जागीच थांबवलं. तालबद्ध लयीत सहजगत्या एकेक बोल लीलया निघत होते. माईक टेस्टिंगसाठी असा काही तुकडा वाजवला गेला की यंव रे यंव!! हाती थोडका वेळ असल्याने इच्छा असूनही काढता पाय घ्यावा लागला.
मोडकांनी यांना नांव दिलंय, टिपकागद! मी कधी अशी होईन, माहित नाही!!
निघताना मोडकांनी या फोटोंवरती कधी लिहितेयस असं विचारलं, आणि 'बंदा आणि खुर्दा' वाचल्याना मी आळस केल्याचं सार्थक झालं!! :-)
(हे लेखन क्रमशः असावं हीच मनोमन इच्छा आहे)
याद्या
12413
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक राहून गेलं. यजदानी
झालं...!
हेच मनात आलं.रामदासांनी
In reply to झालं...! by श्रावण मोडक
मी तुला व्य. नि.तून
सेंट्रल बस स्टेशन समोर
In reply to मी तुला व्य. नि.तून by रेवती
इ है मुंबई नगरिया!
वर्णन/स्टोरी येऊ द्या अजून
टाकलीत काडी?? आता क्रमशः
मस्त कलन्दर'जी... खूप मस्त
In reply to टाकलीत काडी?? आता क्रमशः by अन्या दातार
ही
In reply to मस्त कलन्दर'जी... खूप मस्त by मृगनयनी
ही पिण्याच्या पाण्याची विहीर
In reply to ही by रामदास
हेरीटेज वॉक आवडला. आता जायलाच
निसतेच फटू??? ष्टोरी कुट्टे
पारशी अग्यारीवरून सुरुवात करतो.
हां, लिहा, आम्ही वाट पाहतो.
In reply to पारशी अग्यारीवरून सुरुवात करतो. by रामदास
+१
In reply to हां, लिहा, आम्ही वाट पाहतो. by रेवती
+ २
In reply to +१ by नंदन
विहीरी
In reply to + २ by मेघवेडा
सीटीओ....
वडापाव
In reply to सीटीओ.... by कुंदन
_/\_ मला माझ्याच गावाची सफर
मिनी युरोप
महाजनो येन गत: स पन्था
छान पण ही तर फोर्टची उडती झलक
केळकर उपहारगृहातला साबुदाणा वडा
In reply to छान पण ही तर फोर्टची उडती झलक by दीपा माने
धन्स मकीकाकू, श्रा. मों.च्या
मुंबई दर्शन मधे हे सगळे
रामदासांचं लेखन जसं निगुतीनं
सिद्ध
In reply to रामदासांचं लेखन जसं निगुतीनं by मस्त कलंदर
छान ! आयुष्यातील काही
वा वा!
उगाच वाकडा रिप्लाय देवून
In reply to वा वा! by चतुरंग
मस्त
वा वा वा
धन्यवाद
खजिना आहे हा खजिना...
व्वा!!
+ १
In reply to व्वा!! by प्रदीप
छान माहिती
धन्यवाद