Skip to main content

पाणी, नळातलं आणि डोळ्यातलं!

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 27/03/2012 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच (बहुधा २२ मार्च) जागतिक जलदिन होऊन गेला असे वाचनात आले. बाकी हे असले दिन (जलदिन, एड्स दिन, पर्यावरण दिन, वगैरे) दुर्दैवाने फक्त वाचनातच येतात. महिला दिनाला बाजारपेठ आहे; रोझ डे, व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, वगैरे नाजूक दिवसांनादेखील भरभक्कम (पण ज्वलनशील) बाजारपेठ आहे. थोडंफार असं नशीब मातृदिनाला पण लाभलेलं आहे. दागिन्यांच्या पानभर जाहिराती देऊन "सेलिब्रेट द वुमन इन युअर लाईफ" किंवा "मेक युअर वाईफ फील लाईक अ क्वीन" सारख्या भावनिक आव्हान करणार्‍या जाहिराती बघून या दिवसांचं महत्व दागिन्यांच्या, हॉटेल्सच्या, गिफ्टसच्या कंपन्यांनी किती खुबीने वाढवलंय हे लक्षात येतं.

गप्पा युजींशी

लेखक यकु यांनी रविवार, 25/03/2012 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
युजी कृष्‍णमूर्तींची ओळख इथल्या बहुतेक लोक

कंदमूळ-उन्हा़ळ्याचं फळ

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 22/03/2012 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला कंदमुळ या नावावरुन सामान्यतः सुरण/रताळी इ.इ. कंद जमातीची अठवण होते...पण आज मी एक वेगळाच कंद प्रथम पाहिला... म्हणजे खाऊनही पाहिला.आणी तोही मिळावा कुठे..? तर आमच्या त्या अजब दुनियेत...मार्केटयार्ड मधे...! उद्या पाडवा असल्यानी फुलं आणायला मुद्दामच यार्डात ११:३० ला गेलो होतो,कारण सगळीकडचा मालही आलेला असतो,आणी बाजारही जरा बरा मिळतो,म्हणुन. आधी उन्हानी फुल्लं तापलेलो होतो.तेंव्हा आधी जरा एक शहाळं मारावं,आणी मग आत गाळ्यात उकडुन निघायला घुसावं अश्या विचारात होतो... तर कडेनीच जाणार्‍या एका हार वाल्यानी...

ढक्कन खोलना नहीं आता ! इंदुरी दुकानदारीची एक झलक

लेखक यकु यांनी गुरुवार, 22/03/2012 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच झालेला, शेअर करण्‍यासारखा फाऊंटन पेनचा किस्सा आहे. आत्मशून्य इथे आला तेव्हा आम्ही असेच राजवाड्याशेजारच्या रोडवर बाजारातून फिरत होतो. जुनी कळकट दुकाने बंद व्हायची रात्रीची वेळ. एक फाऊंटन पेनचं दुकान दिसलं. फाऊंटनपेन भलेही रोज वापरत नसलो तरी दुकान दिसलं की पहावे, घ्यावे वाटतातच. त्या दुकानदाराने नेहमीचीच सत्तर, शंभर रुपयांची शाईपेनं समोर मांडली. त्यापैकी बरीच ऑलरेडी इथेतिथे पडून आहेत. मूड गेला. पण दुकानातून निघून कसं यावं म्हणून उगी शान मारत - ''अरे नहीं नहीं, ये तो सब चालू माल है, कलेक्‍शन के लिये कुछ है तो दिखाईये '' अशी वाक्ये फेकली.

कट्टेकर्‍यांची वारी... चिंचवडवर स्वारी ...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 19/03/2012 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
कवनरुपे कहाणी-श्री.अन्नक्षेत्र चिंचवड,मिपा खादाडवारी,संयोजक-मोदक ;-) एक आहे गावं चिंचवड,तेथे मिपाची एक कावडं अजोबा एक नातू सगळे,नाती काही असती... मोदक नामे नवमिपाकरू,वल्ली मागे महामेरु चिंचवडकरांसी आधारु,मिपा कट्टा करण्या... तारीख सतरा वारं-शनिवार,रोजवूड मधला आहार सायं-काली पक्ष्यांचा बहर,बरा होता तेथे बा...

वाह उस्ताद!

लेखक अक्षया यांनी शनिवार, 17/03/2012 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच गेल्या महिन्यात उस्ताद झाकिर हुसेन यांच्या एका कर्यक्रमात मॅनेजमेंट टीम मध्ये काम करण्याची (सुवर्ण)संधी प्राप्त झाली. त्यांच्या सहवासात आमची पूर्ण टीम तब्बल दोन दिवस होती. त्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचं झालं तर प्रवासापासूनच हळूहळू त्यांचं व्यक्तिमत्व उलगडत गेलं. आम्ही कार्यक्रमाच्या शहरात पोचत असतानाच गाडीच्या ड्रायवरला चहा विचारण्यापासूनच ते नंतर त्याच्यासोबत चहा एंजॉय करेपर्यंत आम्हाला समजून चुकलं, की आपले पुढचे दोन दिवस एका उमद्या आणि नम्र कलाकरासोबत जाणार.

माझी चित्तरकथा

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 16/03/2012 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आणि चित्रकलेचे नाते डॅरील कलीनन आणी शेन वॉर्नचे नाते जसे होते अगदी तसेच होते. कलीनन शेन वॉर्नला प्रचंड घाबरायचा. त्याच्या हातभर वळणार्‍या चेंडुला जास्त घाबरायचा की तोंडातुन हातभर बाहेर येउन चालणार्‍या जीभेला जास्त घाबरायचा ते नाही माहिती. पण त्याला म्हणे स्वप्नात सुद्धा शेन वॉर्न दिसायचा. त्याने त्यासाठी खास मानसोपचार घेतले. दुर्दैवाने ही गोष्ट वॉर्नीला कळाली. झाले. पुढच्या वेळेस मैदानात गाठ पडताच वॉर्नने त्याला टोमणा मारलाच "कली बाळा घाबरु नकोस. पाहिजे असल्यास तु माझ्या बेडवर झोपु शकतोस." शेन वॉर्न ने त्याचे आयुष्यभर भांडवल केले आणि जमेल तेव्हा कलीननला टोमणे मारले.

पुन्हा सालं 'वैचारिक'

लेखक यकु यांनी मंगळवार, 13/03/2012 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
हे सगळं कशासाठी सुरु आहे ? लोक का जन्माला येतात? लग्न का करतात? दु:खी का असतात ? या प्रश्नांची उत्तरं कुणीही समाधानकारकपणे देऊ शकत नाही. उत्तरं लाख मिळतात पण ती लागू पडत नाहीत. याचं कारण हे प्रश्न पडले असले तरी कुणीही उत्तरं मिळेपर्यंत त्यांना तडीस नेलेलं नाहीय. ज्यांनी नेलं ते गेले.. उलटून गेले.. त्यांचंही नेमकं काय झालं हे फक्त वर्णनं वाचून कळतं. वास्तविक आजूबाजूला जन्म, मृत्यू, लग्ने, संसार गतीमान असणे या सगळ्या प्रोसेसला बळ आहे फक्त विचाराच आणि समोर अफाट पसरलेल्या अंध:कारमय भविष्‍याचं, भावनांचं, आकांक्षांचं - शब्द कोणतेही आणि कितीही वापरा, परिणाम एकच होतो.