Skip to main content

मी ,ओककाका,भानामती आणि मिपा

लेखक साती यांनी सोमवार, 12/03/2012 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
पैसाताईंनी इथे दिलेला प्रतिसाद बघून आज मुद्दामून इथे आलेय. पैसा, ओककाका काही चुकीचं म्हणत नाहीयेत गं! पण काय आहे ना त्यांना कुठलेही संदर्भ कुठेही आणि ते ही स्वत:च्या सोयीने हवे तिथे कापून द्यायची आणि त्यावर कुणी काही स्पष्टीकरण दिले असेल तर साफ़ दुर्ल़क्ष करायची सवय आहे (हे मी वेगळे सांगायची गरज नाही म्हणा :) ) तर या त्यांच्या भानामतीच्या करण्या दुसर्‍याही एका मसंवर प्रसिद्ध होतात. तिथे मी त्यांना असं लिहिलं होतं की “मी स्वत: एम डी डॊक्टर आहे आणि अश्या भानामत्या बर्‍या करते”.

मंत्रालयाच्या दारातल्या उपेक्षिताचं मनोगतं

लेखक रघु सावंत यांनी रविवार, 11/03/2012 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
१०/०५/२००५ साली मंत्रालयाच्या दारात एका शेतकर्‍याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता .ती घटना इतकी मनात कोरली की आजही ते चित्र डोळ्यासमोर उभं राहिल कि अंगावर काटा उभा राहतो.

भांग अ‍ॅट फर्स्ट (अ‍ॅन्ड लास्ट) टाइम

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 08/03/2012 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो ते गाव, आगाशी (विरार), सर्व सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात माहिर होते. होळी आणि धूळवड हा तर साजरा करण्यासाठीचा आमचा टवाळांचा हक्काचा सण. आगाशीत पूर्वी भरपूर वाडे आणि आळ्या होत्या. मी राहायचो मराठेवाड्यात. होळीला रात्री वाड्यातील सर्व 'सीनियर' मेंबरांबरोबर दारू चढवायची आणि रात्रभर पुरंदरे आळीपासून सुरुवात करून मराठेवाडा, पाध्येवाडा, फडकेवाडा असे वाडे पालथे घालत शेवटी देवआळी अश्या मार्गाने शिव्या घालत, बोंबाबोंब करत शिमगा साजरा केला जायचा. सगळे जुने स्कोर्स व्यवस्थित आणि पद्धतशीर सेटल करण्यासाठी हा सण आमच्या फारच आवडीचा होता.

भांग का रंग जमा हो...

लेखक चिगो यांनी मंगळवार, 06/03/2012 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
होळी येतेय.. सगळ्यांनी मस्त पैकी रंगात रंगून मजा करायचा हा दिवस.. "होळी रे होळी, पुरणाची पोळी.." म्हणत मस्तपैकी पुरणपोळ्या रिचवायचा दिवस.. होळीच्या दिवशी पत्ते खेळणे, लिटल-लिटल घेणे आणि भांग पिणे हेही चालतं. आमच्या लहानपणी आम्ही वार्निश वगैरे पण माखायचो एकमेकांना, आणि मग आई आमच्या अंगाला कपडे धुवायच्या साबणाने घासून, गरम पाण्याने अंघोळ करायला लावायची. (आमच्या "शिशू की कोमल त्वचा"चं कुणाला काय पडलीच नव्हती.. :-)) तर मोठे झाल्यावर आम्हाला भांग (?) पण प्यायला मिळायची होळीच्या वेळी.. त्याचाच हा अनुभव.. मी कॉलेजला फर्स्ट इयरला असतांना दादाचा ग्रुप आमच्या गावी होळी साजरी करायला आला होता.

एक संध्याकाळ "संतूर"लेली

लेखक जयवी यांनी गुरुवार, 01/03/2012 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
संतूरच्या सुरांनी दरवळलेली एक संध्याकाळ ..... कुवेतच्या वाळवंटात एक सुखद, तरल, गोड झुळूक !! संतूर हे वाद्यच मुळी अतिशय आनंदी आणि Romantic आहे आणि ते वाजवणारे जर साक्षात पंडित शिवकुमार शर्मा असतील तर.... ह्याहून जास्त कुणी काय अन् कशाची अपेक्षा करेल ..... ? मंचावर ७४ वर्षे वयाचा अतिशय देखणा तरुण ..... आपल्या सुरांनी समोर जमलेल्या प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतो. तरुणाई अजून वेगळी काय असेल ? कमालीचं आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेले शिवाकुमारजी आपल्या आदबशीर बोलण्यानं मैफिलीची सुरवात करतात. फक्त कान नाही तर डोळे सुद्धा आसुसून वाट बघायला लागतात. काय पेश करणार आहेत ते छानपैकी समजावून सांगतात.

मावळतीचा सूर्य

लेखक रेशा यांनी सोमवार, 27/02/2012 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ५ ची वेळ ... अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ...

माझे केकचे प्रयोग

लेखक Pearl यांनी शनिवार, 25/02/2012 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
महिन्या-दिडमहिन्यापूर्विची गोष्ट आहे ही. लेकीचा दुसरा वाढदिवस २-३ दिवसांवर आला होता. सगळी तयारी जवळजवळ झाली होती. वाढदिवस विकडे ला होता. आणि बर्थडे पार्टी विकेन्डला ठेवली होती. त्यामुळे विकडेला मोठं सेलेब्रेशन करायचं नसलं तरी तिला नविन ड्रेस घालणं, औक्षण करणं, जवळच्या २-३ बच्चे कंपनीला बोलावून केक कापणं असं करण्याचा प्लॅन होता. मनात असं खूप होतं की तिच्या वाढदिवसाला निदान छोट्या सेलेब्रेशनला केक आपणचं करायचा. पण इथं केक येतोय कुणाला. मग म्हटलं मॉलमधून केक मिक्स घेउन येऊ आणि करून टाकू केक. हा.का.ना.का. त्याप्रमाणं केक मिक्सचं पॅकेट आणलं.