इन्फोसिस व विप्रो (नारायण मूर्ती आणि अझीम प्रेमजी ) यांनी अभियंत्यांचे नुकसान केले कि फायदा ?
मी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. गेली अकरा वर्षे या व्यवसायात आहे व त्या आधी १० वर्षे उद्योग क्षेत्रात होतो. माझ्या व त्या आधीच्या काळी अभियंते कोअर ( ज्या क्षेत्रातली पदवी, त्याच क्षेत्रातली) कंपनी मिळवण्यासाठी अतिशय उत्सुक असत.
सध्या मात्र जवळपास सर्व अभियंते थोडा जास्त पैसा, मोठ्या शहरातील राहणीमान, परदेश गमनाची संधी या व अश्या अनेक कारणासाठी माहिती व तंत्रज्ञानं क्षेत्रातील नोकरीला सुवर्णसंधी समजून त्या क्षेत्रात नोकरी करत आहेत . बऱ्याच जणांनी घेतलेल्या शिक्षणाचा योग्य असा वापर या ठिकाणी होत नाही .
बऱ्याच अनुभवी लोकांचे असे मत आहे कि भारतीय अभियंते हे सुशिक्षित हमालाचे / क्लार्कचे (पण चकचकित, वातानुकुलीत कार्यालयात ) काम करत आहेत . या सगळ्याचा परिपाक म्हणून भारतातील अभियंत्यांकडून एक सुद्धा नेत्रदीपक, जग बदलून टाकणारे संशोधन झालेले नाही .
हे मत साक्षात नारायण मूर्तीनी काल परवाच भारतीय शास्त्र संस्थान (IISC ) बंगळूरू येथे व्यक्त केले आहे .
म्हणजे तुम्हीच IIT , NIIT व मोजक्याच प्रसिध्द महाविद्यालातून होतकरू, हुशार तरुण निवडून त्यांना लायकीपेक्षा कमी दर्जाचे काम, कदाचित अभियांत्रिकी / उत्पादन क्षेत्रातील कंपनी पेक्षा जास्त वेतन देवून देणार. आणि वरती भारतातील अभियंत्यांकडून एक सुद्धा नेत्रदीपक, जग बदलून टाकणारे संशोधन झालेले नाही असे जगाला ओरडून सांगणार .
मग शेवटी इन्फोसिस व विप्रो (नारायण मूर्ती आणि अझीम प्रेमजी ) यांनी अभियंत्यांचे नुकसान केले कि फायदा ? तुमचे मत काय ?
वर्गीकरण
वाचने
12603
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
नुकसान!
+१
In reply to नुकसान! by आरोह
अभियंता हा Applicational
काय फरक आहे - आधी आणि आत्ताच्या काळात
पुण्यात COEP पण होती आणि
In reply to काय फरक आहे - आधी आणि आत्ताच्या काळात by मंदारपुरोहित
+१
In reply to पुण्यात COEP पण होती आणि by सटक
पुण्यात COEP होती,टेल्कोपण होती....
In reply to +१ by चिरोटा
बर्याच सीओईपी वाल्यांना
In reply to पुण्यात COEP होती,टेल्कोपण होती.... by बबन ताम्बे
+११११११११११
In reply to पुण्यात COEP पण होती आणि by सटक
तु संस्कृतातून केलेस कै रे
In reply to +११११११११११ by बॅटमॅन
तु संस्कृतातून केलेस कै रे मेक्यॅनिकल
In reply to तु संस्कृतातून केलेस कै रे by टवाळ कार्टा
खिक्क....
In reply to तु संस्कृतातून केलेस कै रे by टवाळ कार्टा
फायदा
ह्या
In reply to फायदा by चिरोटा
या सगळ्याचा परिपाक म्हणून भारतातील अभियंत्यांकडून एक सुद्धा नेत्रदीपक, जग बदलून टाकणारे संशोधन झालेले नाही. ह्या दोन्ही कंपन्या व्यवसाय करण्याकरीता स्थापन झाल्या होत्याप्रत्येक व्यावसायीक... मग तो
पोपकोर्ण आणि पेय
In reply to प्रत्येक व्यावसायीक... मग तो by डॉ सुहास म्हात्रे
या लेखात वैचारीक गडबड आहे हे
In reply to पोपकोर्ण आणि पेय by माहितगार
गोष्टीचे शिक्षण घेतले त्या पेक्षा वेगळे काम करणे आणि पोटेंशीयल पेक्षा कमी उत्पादकतेचे काम करणे इरिस्पेक्टीव्ह ऑफ मनी अर्न्ड, असमतोलाचे लक्षण नाही का ?१. गोष्टीचे शिक्षण घेतले आहे किंवा दिले आहे तेच काम करण्याची सक्ती कम्युनिझम किंवा हुकुमशाहीत होते. इतर कोणत्याही व्यवस्थेत तसे करणे मानवी अधिकारांची पायमल्ली केल्यासारखे समजले जाते. आपण स्विकारलेला एखादा पर्याय आपल्याला अपेक्षित यश अथवा मानसिक समाधान देत नाही असे ध्यानात आल्यावरही इतर योग्य पर्यायांचा अवलंब न करणे हे फारसे बुद्धीमत्तेचे लक्षण नाही. उलट आपली चूक घ्यानात आल्यावर योग्य ते बदल करणे हेच मानवी प्रगतीचे आद्य लक्षण आहे. कोणीतरी म्हटले आहेच की हुशार माणसे त्यांच्या आयुष्यात तीनदा आयुष्यक्रम (करिअर) बदलतात. या संबंधात हा (50 Famous People Who Failed at Their First Attempt at Career Success) लेख बरेच काही सांगून जातो. किंबहुना चुकीची दिशा बदलून आपल्या आवडीचा विषय निवडला तरच माणसातले पोटेंशियल उत्तम रितीने वस्तुस्थितीत येइल, नाही का? २. पोटेंशीयल पेक्षा कमी उत्पादकतेचे काम करणे म्हणजे काय याची व्याख्या करणे कठीण आहे. कोणतीही पदवी माणसाचे पोटेंशीयल ठरविण्याचा मानदंड होऊ शकत नाही... अन्यथा केवळ पदवी अथवा पदवीचे गुण (मार्क्स) पाहूनच काम दिले गेले असते आणि एच आर नावाच्या खात्याची गरजच पडली नसती... अर्थात बरेच एच आर खूप दिवे लावतात असा दावा अजिबात नाही (बर्याचदा ते नेसेसरी इव्हीलचे काम करते :) ). मुद्दा एवढाच की पदवीच्या पलिकडे अनेक गोष्टी संभाव्य कर्मचार्यामध्ये बघावे याची कंपन्यांना गरज पडते, यामुळेच एच आर खात्याची गरज भासते. सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की... Potential of Productivity in real life = (knowledge*) X (Ability to put knowledge to use in order to produce "required" results) X (Aptitude) X (Attitude) X (Integrity) (* : Which is not necessarily directly proportional to a degree, or marks/grades obtained while acquiring the degree.) वरच्या समीकरणाच्या उजव्या बाजूची गृहीतके एकमेकाचा गुणाकार करतात, हा मुद्दा सर्वात कळीचा आहे ! =============================== असो. खर्या जीवनात माणसे... १. एकतर त्यांना आवडणारे काम करण्यासाठी दुसर्यांची पर्वा न करता शिक्षण/कामाची दिशा बदलून, झगडून आपले सुख शोधतात... त्यात काही जण यशस्वी होतात काहीजण होत नाहीत. २. इतर माणसे आपला निर्णय चुकला हे ध्यानात आले तरी शिक्षण/कामाची दिशा बदलण्याची धडाडी दाखवू शकत नाहीत आणि एकदा निवडलेल्या दिशेनच चालत राहतात... त्यात काहींना पुरेसे आर्थिक यश मिळते काहींना मिळतही नाही... पण दोघांनाही आपल्या आवडीची निवड चुकली ही रुखरुख लागते. =============================== आणि विषेश म्हणजे... ज्यांनी दुसर्यासाठी एकही कामाची संधी (जॉब) निर्माण केली नाही त्यांनी लाखो जॉब निर्माण करणार्यांना "तुम्ही काय केले ?" असे विचारणे हास्यास्पद असण्यापलिकडचे आहे !प्रतिसाद आवडला .
In reply to पोपकोर्ण आणि पेय by माहितगार
अर्धवट श्रवण किंवा आकलन
खरच की??
In reply to अर्धवट श्रवण किंवा आकलन by आयुर्हित
माझ्या मते दीर्घकालीन फायदा
गेल्या साठ वर्षात
नै नै....
In reply to गेल्या साठ वर्षात by दा विन्ची
इन्फोसिस व विप्रो किंवा इतर भारतीय कंपन्या..........
काय नुकसान केलं या साहेबांनी ?
हे एकदम पटलं. आज ज्या आई
In reply to काय नुकसान केलं या साहेबांनी ? by अर्धवटराव
एक गोष्ट नारायनमुर्तिंना
मंदारपुरोहित >>>+111111111111
लेख वाचून हसायला आहे.
किमान १ टक्का भारतीयान्कडे आर्थिक सुबत्ता आली आहे....
In reply to लेख वाचून हसायला आहे. by श्रीगुरुजी
आता
पुण्यात रिक्षा ची पण भाडे वाढ
In reply to आता by चिरोटा
ह्यात गुंता काय झाला बुआ
तुम्ही त्यान्ना सुशिक्षित
फक्त IIT चा का ? VJTI , COEP
In reply to तुम्ही त्यान्ना सुशिक्षित by निनाद मुक्काम …
चर्चा
चर्चा वाचली
मूलभूत / व्यापारी संशोधन आणि संशोधनाचे व्यापारीकरण (मॉनेटायझेशन)
खुपच सुंदर प्रतिसाद.
In reply to मूलभूत / व्यापारी संशोधन आणि संशोधनाचे व्यापारीकरण (मॉनेटायझेशन) by डॉ सुहास म्हात्रे
आणखीही एक फरक
क्षमस्व - DC currents च्या
In reply to आणखीही एक फरक by शेखरमोघे