Skip to main content

ई-उपवास

लेखक रघुनाथ.केरकर यांनी बुधवार, 17/08/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
आपण बर्‍याच प्रकारचे उपवास करतो, कुणी अमुक एक महिन्यात मांसाहार टाळतो, कुणी चपला वापरायचे टाळतो, कुणी एकवेळ जेवतो, कुणी आपल्या मागण्यांसाठी अन्न पाणी त्याग करतो. वैगरे वैगरे, मी सुद्धा दर शनीवारी न चुकता उपवास करायचो. मग पुढे शनीवारी लांबचे प्रवास घडायला लागले तेंव्हा मात्र शनीवारी उपवास करायचे सोडुन दीले. पण शनीवारचा मांसाहार करीत नाही.पण हे झाले ठरवुन केलेले उपवास. कधी कधी न ठरवता देखील उपवास घडतो.मागच्या आठवड्यात असाच उपवास मला घडला.

'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी '

लेखक भम्पक यांनी मंगळवार, 16/08/2016 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
महाड मध्ये सावित्री नदीवरचा ब्रिटिश कालीन पूल वाहून गेला.मोठी जीवित हानी झाली. ह्या आणि अश्याच कित्येक ब्रिटिशकालीन पुलांचे , शासनास वय झाले म्हणून पत्रं आली होती म्हणे. किती खरे किती खोटे देव जाणे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की , आपण अश्या पुलांचे म्हणा अगर कोण्या बांधकामाचे म्हणा , परीक्षण करण्यास नालायकच ठरलो आहोत. याला कारण काहीही असून द्या , पण हे मान्य करावे लागेल कि ब्रिटिशांची पुण्याई आता संपत चालली आहे आणि आपण वेळीच सावरलो नाही तर अवघड आहे. 'ब्रिटिशांची पुण्याई' शब्द ऐकल्यावर बऱ्याच जणांची अस्मिता दुखावली जाईल.किंबहुना मलाच तो शब्द जड वाटतो आहे परंतु वास्तव आहे.

मुंबईत खादाडीसाठी-खरेदीसाठी कुठे काय?

लेखक कबीरा यांनी मंगळवार, 02/08/2016 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले मुंबई दर्शन झाले नाही, आधी फक्त मुंबई वारी कामासाठी व्हायची. पण आता मुद्दामहून एक-दोन दिवस काढून मुंबई अनुभवायची असा विचार आहे. "मनसोक्त हादडायची ठिकाणे कुठली?" - एक पुणेकर खवय्या. (दादर मधले गोमंतक बद्दल ऐकून आहे), पण अजून जाण्याचा योग आला नाही. आणि सपत्नीक जात आहे त्यामुळे खरेदी करण हे ओघानी आलंच. तर मिपाकरांनो कुठले पर्याय सुचवाल?

समलैंगिकांच्या बाहू -"विळख्यात"

लेखक जहीर सय्यद यांनी शुक्रवार, 15/07/2016 16:36 या दिवशी प्रकाशित केले.

समलैंगिकांच्या बाहू -"विळख्यात"

समलिंगीसंबंध चळवळ या विषयावर लिहण्याचे कारण की फार दिवसापासून सोशल नेटवर्किंग, वृत्तपत्रे अथवा विविध मासिकातून मला एक गोष्ट प्रकर्षणाने जाणवू लागली की पश्चिमात्य वाऱ्यावर स्वार होऊन येणाऱ्या कल्पनेला हाथो हाथ स्वीकारणारे तथाकथित पुरोगामी विचारसरणी असलेले तसेच कोणतीही वैचारिक बैठक नसलेला उथळ युवावर्गाने या नवीन कल्पनेला म्हणजे समलिंगीसंबंधाला देखील स्वीकारलेलं (कमीत कमी एक सिद्धांत म्हणून) आहे हे जेंव्हा माझ्या ध्यानात आले तर मला अनपेक्षित धक्काच बसला.

शाप व अभिशाप

लेखक दिव्य यांनी रविवार, 05/06/2016 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
शाप व अभिशाप या शब्दांमध्ये फरक काय? शाप हा शब्द संस्कृत भाषेतून अालेला दिसताे. पण अभिशाप नेमके काय?

अहंकार कमी कसा करावा?

लेखक नीलमोहर यांनी बुधवार, 27/04/2016 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस मोठा की त्याचा अहंकार, असा प्रश्न विचारला तर साहजिकच उत्तर असेल माणूस. अनेकदा हे आपल्याला कळत असतं पण वळत नाही, आपण स्वतःपेक्षा या 'अहं' ला जीवापाड जास्त जपतो. या अहंकाररूपी शत्रूला आपल्या मनातून, जगण्यातून हद्दपार करण्याऐवजी आपण त्याचे कोडकौतुक करतो, त्याला डोक्यावर बसवून मिरवतो, खतपाणी घालून वाढवतो, जोपासतो. मात्र त्यानंतर हा अहं आपल्यालाच डोईजड कधी होऊ लागतो कळतही नाही, त्यापायी आपण इतरांशी शत्रुत्व पत्करत राहतोच, अणि त्याहून वाईट म्हणजे स्वतःचेही शत्रू बनत जातो. आपण स्वतःपुरता विचार केला तरी आपल्याला जाणवेल, आपल्यात अहंकार आहे की नाही.. असेल तर का आहे.. कशाबद्दल आहे..

पनामा फाईल्स च्या निमित्ताने

लेखक शान्तिप्रिय यांनी मंगळवार, 05/04/2016 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
पनामा फाईल्स चा डाटा लीक झाल्यानंतर काही धक्कादायक गोष्टी प्रकाशात आल्या आहे. त्या निमित्ताने काहि गोष्टींची चर्चा व्हायला हवी. १. खरच एका ठराविक मर्यादेनंतर पैसा हातात आल्यानंतर आयकर वाचवता येत नाही हे खरे. म्हणून अशा गोष्टींची चलती आहे का? २. पनामा फाईल्स ही टिप ऑफ आईसबर्ग आहे का? ३. एका ठराविक मर्यादेपेक्षा पैसा पगार किंवा मानधन म्हणून दिलाच जाऊ नये का? ४. पनामा सार्ख्या कंपन्या आतंक वादाला मदत करतील का? जाणकारांनी मते मांडावीत. ५. लालच आणि लोभ यातून अशा घटना घडतात का? ६.

बार्बारोसा आणि मोसाद च्या लेखकांना विनंती

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 14/03/2016 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
जकु आणि बोकोबा, तुमच्या अतिशय उच्च प्रतीच्या लिखाणाची मजा आम्ही सगळे घेत आहोत आणि त्या बद्दल तुम्हा दोघांचे मन:पूर्वक आभार .... काही विनंती वजा सूचना ज्या अमलात आणल्यास किंवा त्यावर स्वतंत्र लेखमाला लिहिल्यास दुधात साखर पडेल ...... १. सम्बन्धित लोकांचे उल्लेख करतांना त्यांचे फोटोवरील डकवले तर ? २. नकाशे टाकून त्यात कोण कुठून कसे गेले हे दाखवले तर ? ३. हे सगळे लोक जेव्हा मूळ कामगिरी करत असतात त्यावेळी त्यांना सपोर्ट करणारी जी यंत्रणा असते ती कशी काम करते ह्यावर एक प्रकाश टाकला तर ..उदा?
  • रसद (इंधन, अन्न, कपडे, संदेश इत्यादी )कोण कशी कुठून पुरवते ?

आमच्या ऑफिस मध्ये रोज होत असलेली चर्चा - शेतकऱ्यांना सरकार करत असलेली मदत

लेखक उमेश पाटील यांनी सोमवार, 07/03/2016 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्ती रोज अनंत समस्यांना तोंड देत असतात किंबहुना त्यांच्यावर नेहमी या ना त्या कारणाने नोकरी जाण्याची टांगती तलवार असते. मग जसे आपले सरकार शेतकऱ्यांना कर्ज माफी वैगेरे देते, नुकसान भरपाई देते तशी काही मागणी ह्या वर्ग कडून आली तर त्यावर आपले काय मत असेल ? कारण एक वर्ग असा विचार करणारा बघण्यात आला आहे कि आम्ही प्रामाणिकपणे कर भरतो आणि त्यातलाच पैसा वापरून सरकार शेतकऱ्यांना मदत करते मग आमच्यासाठी काय? किंवा त्यांनी अशी मागणी करावी कि नाही ह्यावर आपले काय मत आहे. मला ह्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यात मदत करा.