Skip to main content

आजचं वास्तव

लेखक गणेश.१० यांनी रविवार, 25/02/2018 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
We now live in a nation where doctors destroy health, lawyers destroy justice, universities destroy knowledge, governments destroy freedom, the press destroys information, religion destroys morals, and our banks destroy the economy. -Chris Hedges थोडी अतिशयोक्ती सोडली तर आजचं वास्तव याहून खूप काही वेगळं आहे असं म्हणता येणार नाही. मानवजातीची दिशा भरकटली आहे का? चांगली माणसे उरलीच नाहीत असं मला म्हणायचं नाही पण एकूणच व्यक्ती आणि संस्थांवरील विश्वास हळू-हळू (की वेगाने?) कमी होत/संपत चाललाय?

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...

लेखक यनावाला यांनी सोमवार, 19/02/2018 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्‍यांना आस्तिक म्हणतात. आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे. ( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.) जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत.

लोकशाहीची अधोगती ?

लेखक गणेश.१० यांनी शनिवार, 13/01/2018 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा गोंधळ म्हणजे फक्त निमित्त. आपली न्याय व्यवस्था अगदी सर्वोच्च पातळीवरही आतून किती पोखरलेली आहे याची एक झलक काल (१२ जानेवारी २०१८) पाहायला मिळाली. लोकशाहीचा आधारस्तंभ असं बिरुद मिरवणारी न्यायव्यवस्था तिला मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून अधोगतीकडे वेगाने प्रवास करतेय असं स्पष्ट दिसतंय. तसं पाहायला गेलं तर चारही आधारस्तंभ संविधानात अभिप्रेत असलेली जबाबदारी खरंच पार पाडताहेत का याची काही सोप्या शब्दात मांडणी केली तर उत्तर 'नाही' असेच मिळेल. मी कोणत्याही पक्षाची वकिली करत नाही. माझा हेतू पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण थोडंसं आत्मचिंतन करावं एवढाच.

भिमा कोरेगाव ला नक्की काय झाले आहे?

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 02/01/2018 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी काल कोरेगाव भिमा येथे झालेल्या लढाईला २०० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या नंतर तिथे २ गटांमध्ये दगडफेक झाली आणि काही जण म्रुत्युमुखी पडुन वातावरण तंग झाले. मग नगर रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला आणि कोरेगाव पार्क, नगर रोड,वाघोलि परिसरात कलम १४४ लावण्यात आले. दुसरी म.टा.

ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा

लेखक गावठी फिलॉसॉफर यांनी शनिवार, 30/12/2017 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
"इतिहासाला जो विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही" हे सत्यवचन आहे. इतिहास अनेक अनेक प्रकारे समजू शकतो. त्यासाठी अनंत साधने आहेत. कादंबरी, शोधग्रंथ, निबंधमाला ही जनमानसात रुजलेली आणि विस्तृतपणे इतिहास समजण्यास मदत करणारी साधने. इतिहास अध्ययनाचे आणि वाचकांचे अनेक प्रकार असू शकतात. त्यापैकी इतिहास प्रेमी, इतिहास अभ्यासक आणि इतिहास संशोधक याप्रकारे एक वर्गवारी होऊ शकते. इतिहासप्रेमी हे इतिहास वाचनासाठी कादंबरी, लेखमाला, काही प्रसिद्ध ग्रंथांचा आधार घेतात. इतिहास अभ्यासक हे बखरी, ग्रंथ, डायरी, पत्रे, शिलालेख, पुरातन नकाशे यांचा आधार घेतात.

वाचक व चर्चाकारांच्या हितार्थ सल्ला

लेखक रंगीला रतन यांनी रविवार, 10/12/2017 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपा वर लाल व हिरव्या सापांच्या काही पिल्लावळी अनेक चांगल्या धाग्यांवर गरळ ओकताना दिसत आहेत. मूळ मुद्दा किंवा विषयाला बगल देऊन उगाच चर्चा इतरत्र भटकावण्याचा त्यांचा उद्देश स्पष्ट जाणवतो (टीव्ही वरील चार्चासत्रां प्रमाणे). त्यामुळे अभ्यासपूर्ण प्रतिसाद, चांगली चर्चा व लेख वाचण्यासाठी इथे आलेल्या माझ्यासारख्या अनेक वाचकांची निराशा होतेच पण मूळ विषयावर आधारित चर्चा करणाऱ्या लोकांचापण हिरेमोड होतो. अशा लोकांच्या उपद्रवापासून मुक्ती मिळवण्याचे काही अगदी साधे उपाय मी खालील प्रमाणे सुचवत आहे.

एवढ्यात कुठली TV/वेब सीरिअल पाहिलीत/ पाहत आहात?

लेखक साधा मुलगा यांनी बुधवार, 06/12/2017 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
टीप : हा धागा जे मुख्यतः इंग्लिश TV/वेब सेरीअल बघतात त्यांच्यासाठी काढला आहे. मराठी/हिंदी सिरीअल साठी नाही. इंग्लिश सिरीअल बघतो म्हणजे आपण कोणी हुच्च आहोत असा आव आणायचं नाहीये, मराठी/हिंदी मध्ये काही बघण्यासारखे आहे अस वाटतं नाही, तरीही काही अपवादात्मक पर्याय असल्यास नक्की सांगा. स्पोईलर देऊ नयेत. ---------------------------------------------------------------------------------------------------------- मागे मिपावर बऱ्याच वेळा एखाद्या सीरिअल वर धागे निघाले आहेत. GOT वाल्यांनी स्वतंत्र धागा काढला होता.

Whats app वरील आहार-विहार मेसेज भाग -१

लेखक दीपक११७७ यांनी मंगळवार, 05/12/2017 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
Whats app वर कधीना कधी आहार-विहार विषयीचे मेसेज सर्वांनी वाचले असणारच आहे. त्यातील किती गोष्टी ख-या आहेत व किती खोट्या या विषयी शंका मनात येतेच, ह्या शंकांचे निरसन बरेचदा होत नाही किंवा करता येत नाही. मला अस वाटतं की मिपाकर आश्या मेसेजची चिर फाड चांगल्या प्रकारे करतील व निर्विवाद सत्य बाहेर येईल. याच मालीकेतील पहीला मेजेस खाली प्रमाणे आहे प्रत्येकाने लिहून ठेवा ही विनंती. घसा दुखत आहे ? घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते. घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला होतेा.

२६ नोव्हेम्बर संविधान दिन

लेखक ओम शतानन्द यांनी गुरुवार, 23/11/2017 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
२६ नोव्हेंबर१९४९ रोजी देशाचे संविधान -घटना- तयार झाली , त्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो काही ठिकाणी बौद्ध समाजाच्या संघटनांनी -२६ नोव्हेंबर संविधान गौरव दिन असल्यामुळे संविधानाच्या प्रतिकृतीची भव्य मिरवणूक किंवा तत्सम काही कार्यक्रम करून उत्सव साजरा करण्याचे banner लावलेले आहेत , हे पाहून माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले १) भारतीय संविधान -घटना - यास धार्मिक ग्रंथाप्रमाणे पावित्र्य प्राप्त होऊ होऊ लागले आहे काय २) संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ऐवजी अन्य कुणी सवर्ण व्यक्तीने लिहिले असते तर असले उत्सव साजरे केले गेले असते का ३) उत्सव साजरे करणारे लोक, संविध

आक्रंदन

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 20/11/2017 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
चुकीच्या बाजूने वाहन घालणाऱ्यांची संख्या वाढते आहे हे चिंताजनक होतच आणि आहेच. परंतु त्यातील संकोच कमी होतोय. त्यात काही चूक आहे असे हल्ली बघ्यांनाच वाटेनासे झालंय. प्रत्येक कायदा, नियम बेदरकर पाने मोडणार्यांची संख्या वाढते आहे, नियम पाळणारे बावळट मूर्ख ठरताहेत .... दंडात ताकद, खिश्यात दमड्या किंवा सत्तेशी जवळीक ही जीत की अधिक तितका हा माज जास्त .. सिस्टीम समाज गेला खड्ड्यात तू तुझा फायदा बघ आणि तेवढच बघ असे पालकच मुलांना सांगत आहेत. त्यात त्यांचा नाईलाज आहे असं म्हणतात ... व्याख्याच बदलताहेत उर्मटपणा : धडाडी.