Skip to main content

ह्स्नेल

लेखक कोंबडी प्रेमी यांनी मंगळवार, 01/03/2016 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
झोप उडवणारी बातमी काय चाललंय आपल्या कडे ?? एखादी व्यक्ती अशी कशी वागू शकते ? एक मात्र खटकते "हस्नेल हा मुंगी सुद्धा मारू शकत नव्हता" असे त्याचे मित्र म्हणतात आणि पुढच्याच वाक्यात त्याला बकऱ्यांची कुर्बानी देण्याचा शौक होता असे म्हटले आहे .... ह्यात काही विसंगती आहे अशी शंका सुद्धा येत नाही का ह्या पत्रकाराला ? गेले ते तर गेले ...त्या बिचाऱ्या वाचलेल्या बहिणीचे मात्र आयुष्य कठीण आहे ...

विज्ञानदिनाच्या निमित्ताने

लेखक यनावाला यांनी रविवार, 28/02/2016 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञानदिनाच्या निमित्ताने ..... विज्ञान हे माणसाने संशोधित केलेल्या निसर्गनियमांचे, सत्यज्ञानाचे भांडार आहे. त्यात आपल्याला अचंबित करणार्‍या अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेतच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही विषयावर, निरीक्षणांवर, सुसंगत विचार करून तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याची आणि ते शक्यतो प्रयोगाने सिद्ध करण्याची ती एक विचारसरणी आहे. वैज्ञानिकांनी ती विकसित केली आहे. या पद्धतीत कोणत्याही पूर्वग्रहाला थारा नाही. भावनेच्या गुंतवणुकीला स्थान नाही. कुणाच्याही अधिकारवाणीला मान्यता नाही. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, यांची स्वीकृती नाही.

कट्टा औरंगाबाद

लेखक अत्रन्गि पाउस यांनी मंगळवार, 16/02/2016 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
२२ तारखेला औरंगाबाद मध्ये आहे .... संध्याकाळी साधारण ४-७ वेळ मोकळा आहे ...एखादा छोटा कट्टा होऊ शकेल किंवा कसे ?

लंबर स्पॉन्डेलिसिस / सायटिका इत्यादी आणि त्यावरील उपचार.

लेखक कलंत्री यांनी सोमवार, 15/02/2016 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
जवळ जवळ १ १/२ महिन्यापूर्वी बराच प्रवास झाला, दगदग झाली, प्रवासात थोडे सामान उचलण्यात आले त्याच बरोबर कंबरेवर ताण पडेल असे वाकुनही काम करावे लागले. याचा परिणाम किंवा कारण असावे, पण पायाला चालताना / उभे राहताना पोटरीमध्ये रग लागु लागली. चालणेही अशक्य आहे असे वाटु लागले. सुरवातीला घरगुती उपचार केले, गरम पाण्याने अथवा बर्फाने शेकणे, मालिश इत्यादे उपचार १० / १२ दिवस केले पण काहीही फायदा झाला नाही. दरम्यान फॅमिली डोक्टर ( आयुर्वेदिक) याची ट्रिटमेंट घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु केले. त्यांनी सांगितले की लंबर स्पाँडेलिसिस / सायटिका असे दुखणे आहे. ओषधाने २ महिन्यात बरे होईल.

श्री.जपे यांचा युक्तिवाद

लेखक यनावाला यांनी सोमवार, 01/02/2016 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
श्री.जपे यांचा युक्तिवाद आमच्या सहनिवासात (सोसायटीत) जपे आडनावाचे एक कुटुंब राहाते. दोन मुले आणि त्यांचे आई-वडील अशी चार माणसे. आई-वडील नामांकित कंपन्यांत उच्च पदावर. मुलगी बारावीत, मुलगा दहावीत. लगतचे दोन फ्लॅट जोडून केलेला चार बेड रूम आणि मोठा हॉल असा त्यांचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर आहे. सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. चारही माणसे चांगल्या स्वभावाची आहेत. श्रीमंतीचा गर्व नाही. प्रदर्शन नाही. जपे कुटुंब सज्जन, सुसंस्कृत आहे. कुटुंबातील माणसे धार्मिक वृत्तीची आहेत. सगळे सणवार साजरे करतात. कधी सत्यनारायण पूजा असते. होम-हवन तर प्रत्येक महिन्याला असते. सकाळी चार पुरोहित येतात.

मांगी तुंगी, स्टॅच्यू ऑफ अहिंसा, धर्मवाद, निसर्ग आणि आपण

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 27/01/2016 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या भारत देशाचं एक फार मोठं दुर्दैव आहे. इथे नैतिकाची पूजा करणारे लोक नगण्य आहेत, आणि भौतिकाची पूजा करणारे असंख्य. त्यात इथे पुतळे, स्मारकं यांचं लोकांना व्यसनच आहे असं म्हणायला हवं. त्या मूर्ती, पुतळ्यांकडून लोकं काय आणि कशी प्रेरणा घेतात हा एक प्रश्नच आहे कारण लोकांचं आचरण कुठेच बदलताना दिसत नाही. अशाच एका पुतळ्याविषयी एक व्यथित करणारी बातमी पाहिली. महाराष्ट्रात नाशिकच्या पुढे सटाणा येथे एक 'मांगी-तुंगी' नावाची जागा आहे. हा एक सुमारे ४४०० फूट उंचीचा पर्वत आहे ज्यावर जायला ४५०० हून अधिक पाय-यांचा मार्ग आहे.

मरणकल्पना, आत्मा, पुनर्जन्म

लेखक यनावाला यांनी रविवार, 03/01/2016 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
......... सजीव येई जन्मासी ।अटळ असे मृत्यू त्यासी ।जाणीव प्रत्येक व्यक्तीसी ।जी का असते सज्ञानी ॥१॥ अनुभव आणि निरीक्षण । परस्पर संवाद , वाचन । निष्कर्ष तर्काने शोधून । जाणीव विकसित होतसे ॥२॥ सजीवासी मृत्यू अटळ । प्राण्यांना नकळे सकळ । सज्ञानी मानव केवळ । या सत्यासी जाणतसे ॥३॥ व्याघ्र-सिंह- ससे-भेकरे । मेंढ्या-बकर्‍या-गाई-गुरे । मरणाधीन असती सारे । परि ते सत्य न जाणती ॥४ ॥ पुराणांतरी सात जण । अश्वत्थामा-बळी-बिभीषण । परशुराम-व्यास-हनुमान । तैसा कृप पैं सातवा ॥५॥ यांसी म्हणितले चिरंजीव ।कल्पना केवळ मानीव । त्या त्या काळी सजीव ।ते असतील सातही ॥६॥ परंतु काळीं सा

श्रीशिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन

लेखक कोकणप्रेमी यांनी गुरुवार, 24/12/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीशिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन -- ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांनी भक्ती शक्ती संगमाच्या निमित्ताने पुण्याच्या जंगली महाराज मंदिरात दिलेले व्याख्यान लिखित स्वरुपात अभ्यासकांच्या माहितीसाठी मिसळपाववर देत आहे. अवश्य वाचा...अनमोल माहिती.. मी १९६९ मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल टाकलं...शिवचरित्राचा अभ्यास करायला...तेंव्हा माझं वय होतं २२...आता माझं वय आहे ६८...या एवढ्या प्रदीर्घकाळात मी शिवचरित्रविषयक कागदपत्रं वाचली नाहीत, असा दिवस गेलाच असला तर एखाद-दुसरा असेल, सहसा असं झालेलं नाही, की मी शिवचरित्रावर काही वाचलं नाही.

१९८२ मुंबई गिरणी संप आणि गिरणी कामगाराचे पर्याय

लेखक स्वप्निल रेडकर यांनी गुरुवार, 17/12/2015 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
मुबईतील मराठी टक्का घसरण्यासाठी कारणीभूत ठरलेला आणि अडीच लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या १० लाख कुटुंबियांना देशोधडीला लावणारा हा संप मानला जातो. डॉ. दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखालील या संपाने जसे कामगारांच्या अभूतपूर्व एकीचे दर्शन घडवले तसेच सरकार,नोकरशाही,उद्योगपतीच्या अमानवी वृत्तीचे देखिल.तसेच गिरणी कामगाराची अधिकृत संघटना मानल्या गेलेल्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाची भूमिका देखील संपाच्या बाबत संशयास्पद मानली जाते.

सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक

लेखक यनावाला यांनी शनिवार, 12/12/2015 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे. आठवला तसा लिहिला आहे. त्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतो. तिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झाला. त्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होती. एक मिनिबस ठरवली. त्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारले. सहल तीन दिवसांची होती. सगळी माहिती घेऊन मी हो म्हटले. पैसे भरले. नियोजित दिवशी सहल निघाली. सहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरून) असे तेवीस पर्यटक सहभागी होते. सर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होती. पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झाली.