Skip to main content

लिहायचे आहे, पण कसे?

लेखक अनुप देशमुख यांनी बुधवार, 19/07/2017 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्या धाकधुकीनेच हा धागा काढतोय पण माझ्यासारख्या नवख्याला तुमच्यासारख्या दिग्गज लोकांकडून मार्गदर्शन मिळेल हीच अपेक्षा आहे. लहापणापासून मी वाचन भरपूर केलंय, करतोय. पुस्तक, कादंबऱ्या, मोठ्या बहिणीची चार वर्ष पुढची पाठ्यपुस्तक, वानसामानाचे कागद, बाबांच्या ऑफिसातले रद्दीचे पेपर, वाचनालयातील पुस्तक, मासिक काही काही म्हणून सोडलं नाही. काही वर्षांनी आंतरजालीय लिखाण आलं आणि मग वाचनाला सीमाच नाही उरली. त्यातच काही दिवसांनी वाटलं कि लिहून पाहूया. एक दोन लेख लिहून जिलब्या पाडल्या पण मध्येच अखंड असा खंड पडला.

डायरेक्ट सेलिंग चे लॉजिक काय?

लेखक अत्रे यांनी गुरुवार, 22/06/2017 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
काही कारणानिमित्त आज नेटवर "डायरेक्ट सेलिंग" या विषयावर वाचत होतो. डायरेक्ट सेलिंग म्हणजे वस्तू एखाद्या दुकानात न विकता, आपल्या एजंट्स मार्फत विकणे.

तुम्हाला किती मार्क पडले होते दहावीला ?

लेखक सतिश पाटील यांनी गुरुवार, 15/06/2017 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याही घरी, शेजारी किंवा नात्यागोत्यात कोणाचातरी 'निकाल' लागलाच असेल. अपेक्षेप्रमाने काही जणांनी पेढे वाटले असतील , काही जणांना अपेक्षेपेक्षा जरा कमी गुण आले असतील. निकालाच्या निमित्ताने मी देखील १७ वर्ष पूर्वीच्या आठवणीत हरवलो. गणितात नापास झालो होतो मी. धाग्याचा उद्देश हाच की इथल्या सदस्यांनी देखील त्यांचे १० वीचे खरे मार्क सांगावेत. त्याच सोबत आज ते व्यवसायिक आयुष्यात कुठपर्यंत पोहोचलेत हे ही सांगावे. इतरांचे निकाल पाहताना बर्याच चर्चा केल्या असतील आता जरा स्वतःच्या निकालाची चर्चा सुद्धा होऊ दे की.

माथाडी कामगार - काही प्रश्न

लेखक अत्रे यांनी शनिवार, 10/06/2017 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
"माथाडी कामगार" हा शब्दप्रयोग काहीवेळा पेपरात वाचला होता, पण कधी यावर विचार नव्हता केला. आज " स्वयंघोषित माथाडी नेत्यांकडून खंडणी वसूल " http://www.esakal.com/pune/pune-news-marathi-news-maharashtra-news-pimp… ही बातमी वाचून हे "माथाडी कामगार" प्रकरण काय आहे , हे जाणून घेण्याची उत्सुकता वाटली. https://mahakamgar.maharashtra.gov.in/lc-mathadi-boards-mr.htm या सरकारच्या साइटनुसार
"माथा" म

पिढींमधला टेक्निकल गॅप - वाढत आहे/कमी होत आहे?

लेखक अत्रे यांनी रविवार, 28/05/2017 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल आपण बघतो की बऱ्याच 50-60 च्या वरती वय असणाऱ्याना नवीन टेक्नॉलॉजी (स्मार्टफोन, इंटरनेट) शिकायला अवघड जाते / त्यात रस नसतो. या उलट शाळेतल्या मुलांना मात्र या गोष्टी लवकर समजतात/ हाताळता येतात. मिपावरच्या वयस्कर लोकांकडून हे जाणून घ्यायला आवडेल कि ते स्वतः तरुण असताना त्यांच्या आणि त्यांचा वडीलधाऱ्या पिढीमधला "टेक्निकल गॅप" केवढा होता? आजच्या इतकाच का खूप छोटा? तेव्हा सुद्धा 50-60+ लोकांना तेव्हाची नवीन टेक्नॉलॉजी वापरायला अवघड जात असे का? याच अनुषंगाने अजून एक प्रश्न - आजपासून पन्नास वर्षांनी अशी काय टेक्नॉलॉजी येईल असे तुम्हाला वाटते; जी आजच्या तरुण लोकांना "अवघड" जाईल?

पंतप्रधान आवास योजनेबद्दलची माहिती

लेखक अ.रा. यांनी शुक्रवार, 26/05/2017 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो , तुम्हा सर्वाना परिचयात असलेलया 'पंतप्रधान आवास योजनेबद्दल' थोडी अधिक माहिती जाणून घ्यावयाची आहे. केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत ‘सर्वासाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित ‘प्रधानमंत्री आवास योजना’ २०१५ मध्ये सर्वसामान्यांसाठी सादर केली. पण सरकार दफ्तरी या योजनेची कोणाला माहिती आहेच असे नाही. या योजनेंतर्गत घरकुल योजनेसाठी चार घटक ठरविण्यात आले आहेत. त्यातील पहिल्या घटकांत झोपडपट्टय़ांच्या पुनर्विकासाचा समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत झोपडय़ांचा आहे त्याच जागेवर पुनर्विकास करण्यात येणार आहे.

भारतात रेल्वेने प्रवास करताना काय काळजी घ्यावी?

लेखक अत्रे यांनी बुधवार, 24/05/2017 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे एक नातेवाईक रेल्वे ने प्रवास करत होते. रात्री ३.३० वाजता कोणीतरी डब्याची चेन खेचली आणि रेल्वे थांबवली. आमच्या नातेवाईक खिडकीजवळ होत्या आणि जवळच त्यांची पर्स होती. एका चोराने बाहेरून पर्स ओढण्याचा प्रयत्न केला पण झटापटीत पर्स चा बंद तुटला आणि तो पळाला. तुमच्या जवळ काही रेल्वेने प्रवास करताना उपयोगी येतील अशा सेफ्टी टिप्स आहेत का? अशा टिप्स ची एक लिस्ट बनवून वॉट्सअप वर फॉरवर्ड केली तर लोकांचा फायदा होईल. धन्यवाद.

अभी तो पार्टी शुरू हुई हैं ...

लेखक पद्मावति यांनी शुक्रवार, 12/05/2017 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
रामगढचे ते लहानसे रेल्वे स्टेशन. एकच प्लॅटफॉर्म! ट्रेन मधून खाकी यूनिफॉर्म मधला एक माणूस उतरतो. त्याची वाट पाहत असलेला रामलाल या माणसाला घेऊन स्टेशनच्या बाहेर पडतो. दोघेही घोड्यावर बसून रामगढच्या दिशेने दौडत निघतात...... आणि बॅकग्राउंडला सुरू होते ते हिंदी चित्रपटांच्या आजवरच्या इतिहासातले एक अतिप्रचंड दिलखेचक, जबरदस्त पार्श्व संगीत. गाण्यांपेक्षा कधी कधी बॅकग्राउंड स्कोर भाव खाऊन जातो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शोलेचा हा टायटल ट्रॅक. नेहमीप्रमाणे इथेही जूनियर बर्मनदा गाण्यांइतकाच पार्श्व संगीतातही जीव ओततात. आता शोले हा चित्रपट!

पाकिस्तान चे हल्ले

लेखक ओम शतानन्द यांनी बुधवार, 03/05/2017 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या लोकसत्ते मध्ये एक विनोदी बातमी आली आहे जवानांच्या मृतदेहांच्या विटंबनेची किंमत मोजावी लागेल.. भारताचा पाकिस्तानला सज्जड इशारा वाचुन खूप हसायला आले , पकिस्तान ला ह भारताचा कितवा सज्जड कडक इशारा असेल ?

शिवाजी महाराजांचा मृत्यू कशामुळे झाला?

लेखक अत्रे यांनी बुधवार, 26/04/2017 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत शिकवलेला इतिहास फारसा आठवत नव्हता. नुकतेच मी Quora या वेबसाइट वर
What is the actual reason of Chatrapati Shivaji Maharaj's death?
या प्रश्नाची उत्तरे वाचली. त्यात वेगवेगळी कारणे वाचली - १. "गूढघी" रोग २. विषमज्वर ३. विषप्रयोग (सोयराबाई कडून) ४. विषप्रयोग (मंत्र्यांकडून ) तिथे सर्वाधिक लोकप्रिय उत्तर चौथ्या क्रमांकाचे कारण सांगते.