Skip to main content

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

लेखक अत्रे यांनी सोमवार, 27/03/2017 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-…) माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. मिपा वर कोणी तिथून आहे काय?

हल्लीच काय खरेदी केलंत ?

लेखक गवि यांनी बुधवार, 08/03/2017 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
अमेझॉनकृपेने किंवा लोकल बाजारात काहीना काही खरेदी चालूच असते. रीटेल थेरपीचा वापर वाढतोच आहे. एखाद्या अतिभव्य मॉलपासून ते गावच्या आठवडी बाजारापर्यंत कुठेही काहीतरी खास हवं असलेलं मिळून जातं अतीव समाधान किंवा भ्रमनिरास होतो. कदाचित इकडेतिकडे चार रिव्ह्यूज टाकले जातात आणि ती वस्तू मागे पडते. तर एकंदरीत आपण खरेदी केलेल्या सामानाबद्दल काही सांगावंसं वाटलं तर इथे नोंदवून ठेवावं अशी इच्चा आहे. यामधे प्रत्यक्ष खरेदी केलेल्या वस्तू, विशलिस्टवर असलेल्या पण कुठे मिळतील हे माहीत नसलेल्या वस्तू, सर्व्हिसेस, वस्तूंविषयीचं चांगलंवाईट परखड मत, चालू आणि भावी "डील्स"ची / सेल्सची माहिती..

वाळूमाफिया कोण असतात? काय करतात?

लेखक अत्रे यांनी शुक्रवार, 03/03/2017 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याचदा वर्तमानपत्रात "वाळूमाफिया/ रेतीमाफिया" हे शब्द ऐकिवात आले आहेत. पण यांच्या "व्यवसायाची" सखोल माहिती कधी कुठे वाचली नाही. मला काही प्रश्न आहेत १. वाळूमाफिये नेमके काय काम करतात? किती पैसे कमावतात? २. त्यामुळे निसर्गाला कांय धोका होतो? ३. जर भविष्यात बांधकामासाठी वाळूच नाही मिळाली तर त्याचे काय परिणाम होतील? हा प्रॉब्लेम जगात कुठे निर्माण झाला आहे का?

किंडल वरची टायपिंग मिस्टेक नसलेली चांगली मराठी पुस्तके कोणती?

लेखक अत्रे यांनी रविवार, 26/02/2017 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी किंडल वर "का रे भुललासी वरलीया रंगा" - व पु काळे (प्रकाशक: मेहता) हे इ-बुक विकत घेतले. त्यात बर्याच काना/मात्रा/ वेलांटीच्या प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत. म्हणून मी म्हटले की इथून पुढे इ-पुस्तक घेण्याआधी लोकांना विचारावे आणि मगच घ्यावे. कोणी किंडल वर घेतलेली वाचनीय आणि टायपिंग मिस्टेक नसलेली पुस्तके सुचवू शकेल काय? धन्यवाद!

आकर्षण, प्रेम आणि जवळीक

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 10/02/2017 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रथमच त्याने तिचा हात हातात घेतला आणि दोघांच्या हृदयाचे ठोके वाढले, अंगावर रोमांच उभे राहिले. प्रेमाचे ते काहीच क्षण पण खूप काही देवून गेले. पुढचे कित्येक तास ती हुरहुर मनात पिंगा घालत राहिली. एकमेकांबद्दलच्या प्रेमाने आणि शारिरिक आकर्षणाने दोघे संमोहित झालेत. हा अनुभव.. खूपच रोमांचक वाटतो , हो ना ? *********************************************************** पण प्रश्न पुढचा आहे. त्याची ,तिची जवळीक अधिकृतरीत्या समाजमान्य झाली. दोघांचे लग्न झाले. काही वर्षे गेलीत.. चाळीशी जवळ आली..म्हंटलं तर तरुण म्हंटलं तर थोडं वय होत आहे...

नवीन थीमबाबत चर्चा

लेखक नीलकांत यांनी रविवार, 01/01/2017 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज मिपाला एक नवीन रूप आहे. याला नवीन थीम असं म्हणू या. या नवीन थीमबाबत तुमचं मत काय? यातील काय आवडलं? काय नाही आवडलं? ते नक्की लिहा. या रंगरूपासोबत आपण मिपाची ठेवण बदलायला सुरुवात केलीये. एखादं नवीन लेखन करताना जोडायचे संबंधित टॅग आता सहज जोडता येतील. नवीनसुद्धा जोडता येतील. आजपासून प्रत्येक सदस्याला आपला फोटो लावता येईल. सर्वांना विनंती आहे की त्यांनी 'माझे खाते'मध्ये जाऊन आपला फोटो लावून घ्यावा. याशिवाय यापुढे काही काळ हे बदल होत राहतील, त्या बदलांबाबतसुद्धा येथेच चर्चा व्हावी. आपल्या प्रतिक्रिया, सूचना, मत हे मिपाच्या जडणघडणीत खूप मोलाचं आहे. त्यामुळे आवर्जून आपलं मत मांडा.

मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?

लेखक बार्नी यांनी रविवार, 20/11/2016 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे , उदा . १) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत . २) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते . सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ?

द स्केअरक्रो - अँड्रॉइड बुक अँप

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 03/10/2016 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिपा वरील बोका ए आझम ह्यांनी अनुवाद केलेली 'द स्केअरक्रो' हि कादंबरी अनेक वाचन प्रेमींच्या पसंतीस उतरली आहे. ह्या दीर्घ कादंबरीच्या अनुवादा साठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे मिपाकरांनी आपल्या प्रतिक्रियांतून कौतुकही केले आहे. त्यांची हि कादंबरी जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अँड्रॉइड बुक अँप च्या स्वरूपात उपलब्ध करण्यात आलेली आहे, ज्याद्वारे वाचक ती ऑफलाईन पण वाचू शकतील अर्थातच मोफत.

लोकांमध्ये वाचनाची आवड वाढण्यासाठी 'Booklet' चळवळ

लेखक माधव यांनी बुधवार, 21/09/2016 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, श्री. अमृत देशमुख नावाचे एक सद्गृहस्थ आहेत. ते प्रत्येक आठवड्याला एक बेस्ट सेलर पुस्तकाचा सारांश (बुकलेट) लिखित व ऑडिओ मध्ये तयार करून व्हाट्सअँपवर पाठवतात. हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे. श्री. अमृत हे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून "मेक इंडिया रीड' हा उपक्रम चालवतात. मी या उपक्रमाचा सभासद आहे व गेले 3 आठवडे त्यांच्या बुकलेटचा आस्वाद घेत आहे. मिसळपाववरील वाचनप्रेमी मंडळींनी या उपक्रमात सहभागी व्हावे ही विनंती.

मजार की मझार

लेखक दिव्य यांनी शनिवार, 27/08/2016 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
हजी अली दर्जासंदर्भातील बातमी अाज वाचली. या बातमीत काही वर्तमानपत्रात मजार तर काही ठिकाणी मझार हा शब्द वापरला अाहे. मराठीत याेग्य शब्द काेणता