जुन्या चहाला पुन्हा नव्याने उकळी आणू,
दात नसू दे, चणे खायला कवळी आणू!
अंदर नंगे बाहर चंगे सगळे येथे
ज्ञान पाजण्या कफनी थोडी ढगळी आणू!
ढंग, लहेजा, भाषा आपली आतषबाजी,
माळ लवंगी, बॉम्ब लक्षुमी-सुतळी आणू!
दुनियेला या कसले सोने लागुन गेले?
आपण आपली बाळ बाहुली (बेबी डॉलही) पितळी आणू!
गूण लागला नाही तरिही वाण लागु दे
ढवळ्या-पवळ्यासाठी ढवळी-पवळी आणू !
कृष्ण व्हायचे आहे पण वाजेना पावा,
दह्या-दुधा-लोण्याला शोधुन गवळी आणू !
~मनमेघ
हा हा
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्य झालो....
कहर आहे कर्नलसाहेब =))
काकानु
पेरणा लिवली नाही
In reply to पेरणा लिवली नाही by ज्ञानोबाचे पैजार
माऊली.....
In reply to पेरणा लिवली नाही by ज्ञानोबाचे पैजार
खरडवही
In reply to पेरणा लिवली नाही by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद
मनापासून आभार...
जानुके आपुली
In reply to जानुके आपुली by कर्नलतपस्वी
तसं नव्हे !