मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खरचं गरज आहे का?

कर्नलतपस्वी · · जे न देखे रवी...
पेरणा कोण शिकवते कळ्यांना कसे, केव्हां उमलायचे कोण शिकवते पानांना केव्हां कसे गळायचे ऋतुराज वसंत येता झाडे बहरून येती निसर्ग चक्र फिरता होती फुले कळ्यांची श्वानास कसे कळते मास भादव्याचा आला खरचं गरज आहे का? हे सर्व शिकवावयाची बुद्धिमान मानवाला!!! जानुके आपुली आदम आणी ह्व्वाची स्वर्गातूनच शिकून आली कला फळे चाखायची धन्वंतरी कशाला हे सर्व शिकवण्यास मग मित्र मैत्रिणीं कशाला? फक्त पार्टी झोडण्यास!!!!! (दारू ढोसण्यास) ह्म्म ...... असे हा सहावा वेद न लगे संथा कुणाची का भांबावलास तू रे ही कस्तुरी तुझ्याच पाशी अदृष्य सापळे हे का पळे तू उगाच जे पाहिजे ते आहे जवळ तुझ्याच कधी समजेल या खुळ्यांना जे पाहिजे ते आहे तुझ्याच पाशी -कवी चाहूल ३१-९-२०२२ ता. क.- कवीता वाचकांना एक अनुभव (शब्दात ओन्ली) फ्रि...फ्रि...फ्रि

वाचन 5011 प्रतिक्रिया 0