मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उकळी

खरचं गरज आहे का?

कर्नलतपस्वी ·
पेरणा कोण शिकवते कळ्यांना कसे, केव्हां उमलायचे कोण शिकवते पानांना केव्हां कसे गळायचे ऋतुराज वसंत येता झाडे बहरून येती निसर्ग चक्र फिरता होती फुले कळ्यांची श्वानास कसे कळते मास भादव्याचा आला खरचं गरज आहे का? हे सर्व शिकवावयाची बुद्धिमान मानवाला!!! जानुके आपुली आदम आणी ह्व्वाची स्वर्गातूनच शिकून आली कला फळे चाखायची धन्वंतरी कशाला हे सर्व शिकवण्यास मग मित्र मैत्रिणीं कशाला? फक्त पार्टी झोडण्यास!!!!!

आठवण....

कर्नलतपस्वी ·
https://www.misalpav.com/node/50568/backlinks आमची बी एक आठवण... कविवर्यांची क्षमा मागीतली आहे. खिशातल्या रूमालाला घामाचा वास मनाला लागला तूझाच की ग ध्यास चार कप्प्यातला एक कप्पा होता खाली तू येणार म्हणून साफसफाई केली घरावरून मारल्या दिवसाच्या चकरा सात बात नाय बनली कारण जय विजय उभे दारात बांधीन म्हणलं सात तळाची माडी पण सावळ्या कुभांराची गाढवं मधी आली ऊगाच घेतला ध्यास डोक्याला कल्हई झाली चांदोबा नाय दिसला पण फुकट धुलाई झाली काय सांगू आता आठवणीत जगतो मनातले मांडे खाऊन रूमालाला घाम पुसतो कसरत १४-८-२२

(किती काळ तुडवायचे)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा किती काळ झुलवायचे http://misalpav.com/node/50291

किती काळ तुडवायचे

खरे सांग केव्हा तुझ्या बंद ओठी साथीदारांचे नाव केव्हा उमटायचे किती घालायचे तुला टायरी अन किती वेळ पाण्यात बुडवायचे तुला कोठडी लागली आवडायला आम्ही रिमांड कितीदा मागायचे मळकट घोंगडे पुन्हा पांघरोनी तू मात्र बिनघोर झोपायचे अरे प्राक्तनाचे असे काय देणे तुजभोवती दिनभर नाचायचे कोर्टातही तू अससी मुक्याने माXXXX जजनाही किती काळ झुलवायचे कोपऱ्यात ढीग तुटक्या वेत छड्यांचा अजून किती काठ्यांना तोडायचे कितीदा करावे रफू शर्टाला कितीदा पुन्हा तुला

बकध्यान....

कर्नलतपस्वी ·
http://www.misalpav.com/node/50007/backlinks श्रीमान बाजीगर यांनी मांडलेल्या विषयाची दुसरी बाजू..... रिकामटेकडा मी खरडतो चार ओळी नका शोधू यात जोडगोळी कुणाची पहिलेच सागंतो मी ही तर कसरत अक्षरांची नाहीतर उगा द्याल मज शिवीगाळी फुकाची शोधिसी दानवा गुपीते कुणा कुणाची का तोडू पहातो घरटी कुणाकुणाची लागेल हाय तुला माझ्या रवळनाथची (पैचान कौन) दिला हात गरिबांना त्यांच्या अडी नडीला फेडले त्यांनी पांग देऊन बिडी काडीला बाधंली ही माडी जोडून पै...

जुन्या चहाची नवीन उकळी

मनमेघ ·
जुन्या चहाला पुन्हा नव्याने उकळी आणू, दात नसू दे, चणे खायला कवळी आणू! अंदर नंगे बाहर चंगे सगळे येथे ज्ञान पाजण्या कफनी थोडी ढगळी आणू! ढंग, लहेजा, भाषा आपली आतषबाजी, माळ लवंगी, बॉम्ब लक्षुमी-सुतळी आणू! दुनियेला या कसले सोने लागुन गेले? आपण आपली बाळ बाहुली (बेबी डॉलही) पितळी आणू! गूण लागला नाही तरिही वाण लागु दे ढवळ्या-पवळ्यासाठी ढवळी-पवळी आणू ! कृष्ण व्हायचे आहे पण वाजेना पावा, दह्या-दुधा-लोण्याला शोधुन गवळी आणू ! ~मनमेघ