Skip to main content

मस्तानी

लेखक झुम्बर यांनी शनिवार, 17/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
चार घोडे चार हत्ती त्यांच्या मागून चंद्रबत्ती मेणा हवे संगे डोलतो त्यातून गोरा हात डोकावतो नितळ कांती हातावरती बोटे नाजूक निमुळती नखामध्ये खेळे जास्वंदी आकार त्याचा कुसुम्बी मेणा अचानक थांबतसे "काय झाले?" ती हळूच पुसे मधुर तो आवाज तिचा नाद मुरलीचा भासतसे कांचन सोने फिके पडे अशी ती गौर सौंदर्या हिर्याचेही तेज निमाले अशी तिची कर्पूर चर्या मुखडा जणू आभाळी चंद्र पौर्णिमा उधळतो नयनाचे दोन दिवे नक्षत्र साक्षात्कार घडवितो धनुष्याची जणू प्रत्यंचा असा भुवईचा बाक झोकदार वळण सफाई अशी तिची की ढंग भासे छबीदार नाक चाफेकळी नाजूक नथनी जणू जडावली रत्न कोंदणी ओठांचा तलम पडदा लाल झाकून टाके दंतकळी हनुवटी निमुळती अशी तलवार जणू ती लखलखती त्यावर उमटे खळी नाजुकशी चांदणी नभी जशी चमचमती डौल मोराचा मान मिरविती वक्षी रतीचा भास असे संगमरमरी कटी नितळसी लावण्यावर साज दिसे अशी मोहक रमणी मायेने फुरसदिने घडवली असे घेवूनी कुंचला सौंदर्याचा पिंड तिचा सजलासे कायेला तिच्या रंग देण्या इंद्रधनु हे वापरले गळ्यात तीचिया देवाने जणू मधुगंध फुलांचे ओतिले तिच्या मादकतेचे तेज जणू सौदामिनीने मढले असे तिच्यातील नाजूक मार्दव हे जाई जुई चा अर्क असे तिला भेटला असा मर्द की कुर्बान तिने केली जवानी माय अश्या प्रेमकहाणीची ती बाजीरावाची मस्तानी बाजीरावाची मस्तानी अनुजा(स्वप्नजा)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3701
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

कविता मोठी आहे. पण मस्तानी चे सौंदर्य या कवितेच्या शब्दाशब्दातून ओंथबते आहे. वर्णन आवडले तसेच उपमा आवडल्या. मीनल. http://myurmee.blogspot.com/

In reply to by मीनल

हेच म्हणतो म्या... :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

In reply to by मीनल

अप्रतिम शब्दचित्र ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

साक्षात डोळ्यासमोर मस्तानीच उभी राहिली बरं

सुंदर कविता. जय महाराष्ट्र , जय मराठी !

आभार मन्ड्ळी पन +१ म्हन्जे?

लखनवी जरी काठ वेल बुट्टी शोभतसे तिचे तलम वस्त्र हे सौंदर्याची परिसीमा असे वस्त्रहुनी तलम अशी ही कांती तिजला लाभली असे ती गिळता हे पान मगाई गळा ही लाल लोभस दिसतसे तिने चढवली आभूषणे ही तीही फिकी तिच्यापुढे मोत्यंची चमक कोवळी नयनी तीचिया वसतसे सोन्याचाही तिच्या पुढती टिकाव क्षणभर लागत नसे तिची पूर्ण काया ही सुन्दर सुवर्ण ओतून घडली असे सर्वांगावर नक्षी सुंदर सौंदर्याची फिरली असे अशी ती नाजूक रम्या नाचण्या पुण्यात उत्सुक असे अनुजा(स्वप्नजा)

छान आहे कविता ... "तरिही मस्तानी मुस्लिम होती ना ? अन मुस्लिम नथनी घालतात का ?" binarybandya™

हो म्हन्जे काय घालतात ते.... आनि मस्तानी बुन्देल खन्ड्चि होति .... ती घलत होतिच ...