Skip to main content

तू असं यावस......

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 22/04/2010 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
तू असं यावस.... नकळत........ थंडगार वाऱ्याच्या झुळकी सारख.... गरम उन्हाच्या झळा माग साराव्यास... विसावलेल्या देहाला वेटोळावस... तप्त कपोलावरचे घर्मबिंदू अधरांनी टिपावेस.. आणि, अगदी मोकळ; निर्व्याज हसावस... तू असं यावस..... तू असं यावस..... उबदार किरणासम... गारठलेल्या मनाला उबीची शिदोरी घेऊन ... थकलेल्या तनाला; उभारीच हसू घेऊन.. धुतल्या सोनेरी रुपेरी रंगांत... मलाही रंगवत, हसत ;खिदळत... तू असं यावस.... आणि तू असही यावस... तडाडता कडाडता वळीव होऊन ... तृष्णेला दूर सारीत , तृप्तीला भोवळ आणित.... रसरसलेल्या देहाला शांतवत.... टपोरा टपोरा थेंब होऊन सडाडत..... तू असही यावस..... तू असही यावस.....
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1986
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

काय मस्त आहे कविता ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.

तडाडता कडाडता वळीव होऊन ... तृष्णेला दूर सारीत , तृप्तीला भोवळ आणित.... रसरसलेल्या देहाला शांतवत.... टपोरा टपोरा थेंब होऊन सडाडत.....
क्या बात हैं !