मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धनी माझं कसं येईना अजून

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
धनी माझं कसं येईना अजून
दिस हा गेला रात चढली कितीक बसावं सजून धजून वाट पाहूनी डोळं थकलं धनी माझं कसं येईना अजून ||धृ||
रातीचा मी शिणगार केला शेज सजवूनी गजरा माळला शालू नेसूनी तयार झाले कुंकू ल्याले भांगातून ||१|| धनी माझं कसं येईना अजून
सांगून गेलं आठदिस झालं कुठं आसलं कुना ठावं लवकर येतो म्हनलं होतं लढाईतून परतून ||२|| धनी माझं कसं येईना अजून
काळीज माझं चिमनी जसं नाही काही थार्‍यावर फोलपणा हा सजण्याचा न जाई मनातून ||३|| धनी माझं कसं येईना अजून - पाषाणभेद (दगडफोड्या) ३०/०४/२०१०

वाचने 2159 वाचनखूण प्रतिक्रिया 6

जयंत कुलकर्णी 01/05/2010 - 14:46
सरळ, सुंदर, काव्य. शब्द बंबाळ कवितांपेक्षा ही कविता / काव्य मला आवडली. त्या कविता मला कधी कधी वाटते, मला किती मराठी शब्द येतात हे सांगण्यासाठी लिहीतात की काय. आपल्या या काव्यातून माझ्या डोळ्यासमोर २०० वर्षापूवर्वीचे मराठी खडेगावातले चित्र उभे राहिले. असेच एखादी लुगड नेसलेली स्त्री दरवाजात उभी रहात असेल आणि तिच्या डोळ्यात पाणी येत असताना कदाचित हेच विचार तिच्या मनात येत असतील...... काय सांगावे..... जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

टारझन 01/05/2010 - 15:29
हाहाह ... मस्त रे पाभे .. :) - (धनी) टारझन

स्पंदना 03/05/2010 - 19:08
कुठ गुन्तला ... शब्द विसरला.... देउन अपुल्या सजणीला.... अगदी ती आठवण आली बघा शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

शुचि 03/05/2010 - 20:42
लढाई वगैरे बाबींमुळे मस्त वातावरण निर्मीती झाली आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

धमाल मुलगा 03/05/2010 - 21:19
पठ्ठे पाषाणभेद, मजा आली. मस्त विरहगीत.