निर्माल्य
लेखनविषय:
काव्यरस
आज माझ्या डायरीत
केविलवाणं झालेलं
एक गुलाबाचं फूल सापडलं..
तुझ्या वाढदिवसाला घेतलेलं
आता बरचसं हिरमुसलेलं
डायरीच्या
त्याच दोन पानांवर दिसले
आठवणींच्या शिंतोड्यांसारखे
उमटलेले गुलाबी ठिपके
खिडकीबाहेर दिवसा मोहवणार्या
नेहमीच्याच गुलमोहराने
रात्री सावल्यांचे भेसूर आकार
नाचवावेत तसे...
आपल्या आठवणींच्या जणू
तशाच सावल्या झाल्या आहेत
आणि नातंही
त्या गुलाबासारखं....
वाहिलेल्या दुर्वांचं शेवटी
निस्तेज निर्माल्यचं होतं ना गं,
कालच्या पूजेची
अस्पष्ट आठवण करुन देणारं!
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
मोगरा फुलला दिवाळी अंक २०११ आणि माझ्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
वाचने
1970
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
आवडली..
(विरहगीते / कविता आवडणारा) चिगो
छान लिहिताय. कविता आवडली.
छान !
आवडली रचना.
परांतर :- 'मोगरा फुलला' मध्ये 'निर्माल्य' प्रासिद्ध झालेले बघून अंमळ हसू आले. ;)
In reply to छान ! by परिकथेतील राजकुमार
बॅटांतरः परांतराशी सहमत.
र॑चना आवडली....
विशेषतः "कालच्या पूजेची, अस्पष्ट आठवण करुन देणारं!" ह्या ओळी भावल्या.
इथे पूर्वी 'पूजेची' झालेली सांगोपांग चर्चा आठवली :P
खिडकीबाहेर दिवसा मोहवणार्या
नेहमीच्याच गुलमोहराने
रात्री सावल्यांचे भेसूर आकार
नाचवावेत तसे...
मनाला फारच भिडण्यार्या ओळी..
छान आहे संपूर्ण कविता.
वाहिलेल्या दुर्वांचं शेवटी
निस्तेज निर्माल्यचं होतं ना गं,
आवडली.
चांगली कविता..