नवरत्नहार

लेखनविषय:
काव्यरस
जय जय श्री गणनायका। रिद्धी सिद्धी प्रदायका। सकल अरिष्ट नाशका। एकदंता ॥१॥ अनन्य भावाने शरण। येता मज लीनपण। आले अहंतेसी मरण। भक्तीयोगे ॥२॥ कृष्णा तू ची भक्ताधार। विश्व रूपे तू साकार। कृपा तव अपरंपार। भक्तीगम्य ॥३॥ तव कृपा ठरे सार्थ। प्रकटला गीतेचा भावार्थ। प्रपंच आणि परमार्थ। सहज साध्य ॥४॥ मी तो अभागी अनाथ। गुरू मंत्रद्रष्टे सिद्धनाथ। दीक्षा देवोनी सनाथ। केले त्यान्नी ॥५॥ नुरले मायेचे ममत्व। चित्ती साधले समत्व। मज लाभले द्विजत्व। योग बळे ॥६॥ कधी वेदनांचा चारा। कधी भोगांचा पसारा। खेळ प्रारब्धाचा सारा। लीलामात्र ॥७॥ घेता स्वरूपाचा निदीध्यास। लोपे जगाचा आभास। चाले 'सोहम' विनायास। अखण्डत्वे

संजयदॄष्टी

लेखनविषय:
काव्यरस
असावी एक "संजय दृष्टी" आपल्या जवळ आपल्याच मनातले महाभारत पहाण्यासाठी. कारण, वागत असतो कधी कधी आपण धृतराष्ट्रा प्रमाणे , जन्मजात आंधळे असल्या सारखे किंवा स्वतःच बांधुन घेतो स्वत:च्याच डोळ्यांवर पट्टी गांधारी सारखी, पतिव्रतेचा आव आणून.....!!!

मध्यरात्र..!!

लेखनविषय:
काव्यरस
मध्यरात्री कधीतरी येते जाग कशी कुणास ठाऊक ...? मी बघत बसतो खिडकीतून डोळे किलकिले करून माझ्या खिडकीतून दिसणारे आभाळ नि खिडकीतून दिसणारे हे पारिजातकाचे झाड मध्यरात्री कधी जाग आली की झाडावर ओठंगलेला चंद्र दिसतो माझ्या सुरक्षित अंतरावरून हे दृश्य सुंदर मस्त दिसतेय !! चीडीचीप्प रात्र नि हे जीवघेणे झाड ध्यान लावून बसलेले.... बायको मस्त गाढ झोपलेली नि मी असा बेचैन मी उठतो नि किचन मध्ये जातो सकाळी काहीच नसणारे झुरळे आता मस्त फिरत असतात अन्न-कण शोध मोहिमेवर .... कोठे लपतात नि कोठून येतात अचानक कुणास ठाऊक.. ?

काय करू मी बाई सांगा तरी काही

लेखनविषय:
काव्यरस
काय करू मी बाई सांगा तरी काही
काय करू मी बाई सांगा तरी काही रातीला मजला झोपच येत नाही ||धृ|| डोळं र्‍हाती माझं सताड उघडं कानं कानोसा घेती कवाडाकडं आता तुमी येनार, लगेच तुमी येनार मनाला वाटं पर तुमी काय येतच न्हायी काय करू मी बाई सांगा तरी काही ||१|| परवा म्हनं तुमी मी येतो उद्याच्याला कालचा दिस खाडा झाला, आजतरी कुठं आला एकलीच बसते विचार करते असं छळू नका डोळं लावून तुमची वाट मी पाही काय करू मी बाई सांगा तरी काही ||१|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/११/२०१०

हळूच द्या मज झोका कान्हा

लेखनविषय:
काव्यरस
हळूच द्या मज झोका कान्हा
हळूच द्या मज झोका कान्हा चित्त नाही माझे थारा हळूच द्या मज झोका कान्हा ||धृ|| मन विचलीत झाले वासनांनी भरले घुसळोनी लोणी काढूनी घेती तयाप्रमाणे वासना काढाना ||१|| संसारी राहून पाही जगजेठी पापपुण्या लावी गाठी कितीक करावी तुमची आरती जन्ममरणाचा पाळणा हलवा ना ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/११/२०१०

आम्ही काय म्हणूं धार्मीक

लेखनविषय:
काव्यरस
आम्ही काय म्हणूं धार्मीक
आम्ही काय म्हणूं धार्मीक | आम्ही जगाचे नास्तिक ||१|| आम्ही जप नाही केले कधी | रामनाम नाही आमच्या ओठी ||२|| नाही कधी घडला संतसंग | पाण्यावीण दुष्काळी मेघ ||३|| देवाचीये न लागू चरणा | धुळीच्याच पडलो प्रेमा ||४|| नाही कधी गेलो पंढरीसी | कधी नाही बोललो सावळ्याशी ||५|| कधी नाही लिन झालो | कधी नाही पायी पडलो ||६|| जपजाप्य कधी केले | आठवणीतून निघून गेले ||७|| पंढरीच्या पांडूरंगा | आलो तुझीया संगा ||८|| पापपुण्य निघुनी गेले | माझे स्वरूप तुझे झाले ||९|| सच्च्या म्हणे कोण नास्तिक?

अंगाई

लेखनविषय:
काव्यरस
अंगाई - - - - - आठवतंय ना? मी गाडी चालवताना सावध बसायचास मुठी आवळून - दमलायस रगड आहेत पापण्या जड तर येऊ दे डुलकी घे शांत निजून - - - - -

इतिहास

लेखनविषय:
काव्यरस
माझ्या मिटल्या डोळ्यातली स्वप्न भोळी भाबडी, अगदी साधी. तुझ्या न माझ्या साथीची आयुष्याच्या वाटचालीची.
तु उघड्या डोळ्यांनी साकारतोयस, शिल्पकारान कष्टान लेणी कोरावीत तशी. मी अन तु , अगदी भिन्न माणस. मी अधिर , आवेगी, तु शांत , संयमी. मी स्वप्नाळु, कल्पनेत रमणारी. तु वास्तवाच्या खडकाचा जाणकारी. अन तरीही मला जपतोयस, वास्तवाच्या दाहक उन्हात , सावली होतोयस. एव्हढ्या वेगवान जगात घटकाभर थांबुन मला डोळे मिटुन स्वप्न बघायला संधी द्यायची धडपड करतोस . आयुष्याच्या वाटचालीत खुप खुप पुढ गेल्यावर कधी तरी आपण माग वळु, सगळी वाटचाल डोळे भरुन निरखु, त

आपण सारे शिर्डीला जावूया

लेखनविषय:
काव्यरस
आपण सारे शिर्डीला जावूया या संसारातूनी....या या संसारातूनी थोडा वेळ काढूया....हो हो थोडातरी वेळ काढूया... चला रे चला आपण सारे शिर्डीला जावूया शिर्डीला जावूया ||धृ|| शिर्डीला लागले साईबाबांचे पाय हो.... साईनाथांचे पाय हो शिर्डीवाचूनी मग दुसरा स्वर्ग असेल काय हो? एकदातरी... एकदातरी आपण तो स्वर्ग पाहूया चला रे चला आपण सारे शिर्डीला जावूया शिर्डीला जावूया ||१|| साईबाबांनी कितीतरी चमत्कार हो केले.... हो हो चमत्कार हो केले गोरगरीबांचे कष्ट पळवून नेले बाबांच्या दर्शनाने... बाबांच्या दर्शनाने आपले दु:ख दुर करूया चला रे चला आपण सारे शिर्डीला जावूया शिर्डीला जावूया ||२|| बाबांच्या ध
Subscribe to शांतरस