Skip to main content

कविता माझी

थोडे अंतर...

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 19/10/2016 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
थोडे अंतर... असावे तुझ्यामाझ्यात थोडे अंतर ठेवील ओढ ते निरंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा अबोला संपेल तो मनवल्यानंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा गैरसमज पडेल उमज समजल्यानंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा संशय वाढवेल प्रेम आशय कळल्यानंतर राजेंद्र देवी

अपहार...

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 18/10/2016 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
अपहार... तीर तुझा घुसला आरपार घाल तूच फुंकर हळुवारं झाले असतील घायाळ बहू मीच झालो तुझी शिकार झंकारल्या तारा हृदयिच्या सांग कसा देऊ नकार भ्रष्ट या दुनियेत झाला माझ्या हृदयिचा अपहार राजेंद्र देवी

नशीब...

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 17/10/2016 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
नशीब... जागोजागी फाटले नशीब किती ठिगळे लावू विरणावर काय काय भोगले हे न आठवे नाही विश्वास आता स्मरणावर आयुष्यभर रडत होतो कोण रडेल माझ्या मरणावर आजवर जळत राहिलो तरी टाकिती सरणावर राजेंद्र देवी

ओढ घरट्याची

लेखक माहीराज यांनी रविवार, 16/10/2016 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
पाखरे उडता आकाशी या    घरटे सुने सुनेच उरते.. परतीची ही ओढ लागता    तसे पाऊल मागे वळते.. कानोसा घेऊ राञ निघाली.. कात टाकुनी पहाट ही आली.. रानपाखरे घरट्यातुन या उंच भरारी घेऊ लागली... उन्हे दाटता डोक्यावरती  घरटे आतुर रडु लागले... डोळे शिणले वाट पाहुनी काळजीचे मग बांध ही फुटले... तु असा गेलास कुठे की हरवलास या वाटेवरती... शोधलास तु मार्ग नवा की विसरलास ही माझी प्रिती.....
काव्यरस

हिरकणी (कविता)

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी रविवार, 16/10/2016 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
आसमंत तो काळोखाने पूर्ण व्यापला होता रायगडावर अडकुन पडली सैरभैर ती माता मावळतीला गेला सूर्य बंद जाहली दारे दंडक होता शिवरायांचा शिस्त पाळती सारे कष्टकरी ती नार अपूर्व नाव जाणती हिरा गडाखालती राहत होती वाळूसरेतील घरा दूध विकाया रायगडावर ती मायमाऊली जाई उरकुन जाता काम रोजचे घरास परतुन येई एके दिवशी गड सोडण्या वेळ जाहला तिला उघडण्याला बंद ती दारे त्यांनी नकार दिला घरास होते बाळ तान्हुले कंठ दाटुनी आला राहावयाचे कसे लेकरु गलका मनात झाला भिरभिर फिरली रायगडावर शोधित तिथल्या वाटा उंच कडा एक दिसला जेथे ना पहारा फौजफाटा उतरु लागली मरणकडा तो बाळासाठी जीव तुटे खरचटला तो सारा देह तिला परंतु भान कुठ
काव्यरस

मनाचा एकांत - स्मरणाचा काटा

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 14/10/2016 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता इथे इतके वाजलेत, म्हणजे आपल्या घरी आता तितके वाजले असतील..... तिथे आता हे हे असे असे घडत असेल आणि इथे हे हे असे असे ..............! स्मरणाचा एक तास काटा तिथे तर एक इथे! बाकी मन, सेकंद काटा होऊन सांधणाऱ्या प्रिय समुद्रासारखे टिकटिकत राहते दोन किनाऱ्यांमध्ये अष्टौप्रहर.............. . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! -शिवकन्या

निसर्गाचं गाणं

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 14/10/2016 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गाचं गाणं ओला घाट, नागमोडी वाट केवड्याचे रान, घनदाट केवड्याचे रान, सळसळते नागीण वारा वाजवी सुमधुर बीन ओले रान, ओले पान ओंजळ छोटीसी, निसर्गाचे दान कडेकपारीतून वाहती निर्झरांचे पाट रानातून हुंदडे वारा पिसाट विसरुनी भान, तुडवितो रान ओठावरती फक्त निसर्गाचं गाणं राजेंद्र देवी

माझे स्वप्न...

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 13/10/2016 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
माझे स्वप्न... तुझी नाजुकता फुलात आहे फुलाचा गंध तुझ्यात आहे तुझी अवखळता पाण्यात आहे पाण्याची झुळझुळता तुझ्यात आहे तुझ्या रागाची धग आगीत आहे आगीची तेजस्विता तुझ्यात आहे तुझा अबोला वाऱ्यात आहे वाऱ्याची दिशा तुझ्यात आहे तुझे अस्तित्व स्वप्न आहे माझे स्वप्न तुझ्यात आहे राजेंद्र देवी

अंधारलेल्या निशा...

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 12/10/2016 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारलेल्या निशा... पाहून स्वप्ने उद्याची सोकावली आहे निराशा आता कोठे जागू लागल्यात आठवणी जराश्या का करीशी वणवण या रखरखलेल्या वाळवंटात आता कोठे विसावल्यात उन्हात सावल्या जराश्या आजूबाजूला कोलाहल किती कोण ऐकेल माझे वाचाळ झाली आता कोठे माझी मौनाची भाषा ना भिजते मन माझे या कोसळत्या पावसात राहतं नाही माझ्या आठवणी पारोश्या भरकटत जात आहे मी दिशाहीन झाल्या या दिशा दाविती उजेड मज या अंधारलेल्या निशा राजेंद्र देवी

देगा देवा....

लेखक कवि मानव यांनी मंगळवार, 11/10/2016 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
देगा देवा एकच दान मना लागे समाधान होऊ नये उंच एवढा इतर वाटती लहान !!१!! देगा देवा एवढे बळ, सोसण्या आयुष्यातली झळ, जगणे कर एवढे सुंदर, मरण तर आहे अटळ !!२!! देगा देवा दया- माया, व्हावे मी एखाद्याची छाया, झालो आधार न कोणाचा, तर व्यर्थची गेली ही काया !!३!! देगा देवा एवढे ज्ञान, असे भल्या-बुऱ्याची जाण, अहंकार न अंगी यावे, असावे मज सदैव भान !!४!! देगा देवा सदाचार, उजळत जावे माझे विचार, अंतरीतला राम विजयी व्हावा रावणाचे करून संहार !!५!
काव्यरस