आकाशवाणी
काव्यरस
अवलियाची 'जखम' आणि मग ब्रिटिशची 'दगड' वाचून जे सुचलं ते. ह्या कवितेचा रस खरं "गंभीर" आहे असं मला वाटतं.पण तसा ऑप्शनच नव्हता!
इथे मला देव म्हणजे (असेलच तर) खरा खरा देव असं अभिप्रेत आहे. मिपावरील सभासद नाही.
देवबिव साला सब झूट आहे...
वेठबिगार करून ठेवलंय मला...
काही लाखांच्या बदल्यात ह्यांच्या सात पिढयांची सोय करायची...
ह्यांच्या खुर्च्या धरून ठेवायच्या...
ह्यांच्या पापांचं ओझं डोक्यावर वागवीत ह्यांच्या मागे फिरायचं...
हमालासारखं...
मी कोण कुठचा माहित नाही हेच बरं...
नाहीतर माझीही निघाली असती एक...
नाडीपट्टी...
कोण मारतंय रे ते दगड...
म्हणून एक दगड तिरमिरीत त्याच्याच दिशेने भिरकवून दिला...
आणि त्या क्षणी वाटलं...
किती माणसासारखा वागतोय मी!
पण काय करणार...
लाच खायला तुमच्याच नवशागवश्यांनी शिकवलं मला...
आणि तुमच्यातलेच ते टोपीवाले, फेटेवाले, निशाणवाले, दाढीवाले प्रात्यक्षिक देतात दंगे करण्याचं..
“माणसातला देव शोधावा” असं तुमची संतमंडळी म्हणून गेली...
पण इथे तुम्ही माझ्यातलाच माणूस जागा केलाय!
पृथ्वीच्या कारभाराचे दोर तर
माझ्या हातातून कधीच पार निसटून गेले आहेत...
मरून जावं म्हटलं तर मरताही येत नाही हो मला...
त्याने टाकलेला दगड उशाला घेऊन...
बाल्याच्याच शेजारी पथारी पसरीन म्हणतो...
सांगायला अतिशय दु:ख होतंय पण सांगतो...
तुमच्या देवातच आता काही राम राहिलेला नाही...
वाचने
3490
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
सांगायला
सांगायला
In reply to सांगायला by मदनबाण
ह्म्म...
ओह
In reply to ओह by श्रावण मोडक
हा हा हा...
मस्त!
गंभीर रचना
आयला! आता
In reply to आयला! आता by प्रशांत उदय मनोहर
मी चाल लावली तर...
In reply to मी चाल लावली तर... by प्रमोद देव
लोक
In reply to मी चाल लावली तर... by प्रमोद देव
देव
सुंदरच
आवडली.
In reply to आवडली. by यशोधरा
मलाही...
In reply to मलाही... by बिपिन कार्यकर्ते
१+
काय पन कल्ले न्हाय!
छान!