Skip to main content

करुण

जीव गुंतला ( चाल : खेळ मांडला )

लेखक गणेशा यांनी बुधवार, 24/11/2010 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय पाचोळ्या तुझ्या आठवांची मनी पानं उभी र्‍हाई साद सुन्या आभाळाची तुझे गीत गाई तरी मेघ दाटला हा पाचोळ्याच्या ठायी हरवल देह भान मावळल्या नभी झाकोळुनी हरवतो श्वास वेडापिसा वनवा ह्यो उरी पेटला... जीव गुंतला जीव गुंतला ....जीव गुंतला ...जीव गुंतला...जीव गुंतला सोडली रे फ़ुलपान घेतला वसा तुझा तूच प्रीत दाखीव गा जीव गुंतला ओली दवा थंडगार, झोंबती रे ही हवा ह्यो तुझ्याच काळजात जीव गुंतला ओघळली प्राणज्योत दुर, डोंगर , दु:खाची खायी झडलेल्या झाडापरी जीनं, अंगार, जीवाला जाळी आस घेयी भिडायाला पीरतीची ओढ दे बोलवीती प्रीतगान वादळात झेप घे उसवला श्वास राजा संपला प्रवास तरी न्हाई प्राण सोडला ...
काव्यरस

माझिया केसानो!!

लेखक रमणरमा यांनी बुधवार, 24/11/2010 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
"माझिया मना" या अप्रतिम कवितेचे कवी सौमीत्र यांची माफी मागून निर्लज्जपने माझी पाण्च्ट कविता येथे टाकत आहे. अत्यंत चांगल्या कवितेची वाट लावली आहे ( ती पण नीट लावता नाही आलेली ) कविता वाचून डोके आपटून घ्यावेसे वाटल्यास दगड किवा भिंतीची सोय आम्ही करणार नाही. ते आपले आपन बघून घ्यावे. माझिया केसानो सरळ व्हा ना, माझिया मस्तकी तुमचा धिंगाणा... तुमचा गुंता अन मला वेदना.... माझिया केसानो || माझिया केसां जरा चमक ना, माझिया केसां जरा चमक ना, घालवु कशी मी ही तुझी रूक्षता... टकलि न मी वाढतोस तू आवरू कशी मी ही तुझी दुर्दशा!...

रक्षण

लेखक नगरीनिरंजन यांनी बुधवार, 24/11/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
डोळे मिटून मी आत डोकावतो तेव्हा मला एक वाघुळ दिसतं. तोंड झाकलेल्या विहीरीमध्ये ते गरागरा फिरत असतं. बाहेरच्या प्रकाशाला अंधार नि आतल्या अंधाराला प्रकाश समजतं, गोंगाट असल्यावर काही नाही पण शांतता झिरपलीच तर भेलकांडतं.... सकाळी जेव्हा मी उठतो मऊ बिछान्यातून दुखर्‍या अंगानं, बाहेर सृष्टी सजत असते शब्दरहित पण नवनव्या ढंगानं. गवतावर नि:शब्दपणे दवबिंदु ठिबकतात आणि मूकपणे कळ्या उमलतात. तिकडे मी चक्क दुर्लक्ष करतो, गाड्यांचा पोंगाट ऐकत राहतो.... बसची वाट पाहताना, एका कोपर्‍यात मला एक मांजर दिसतं. कोवळ्या उन्हात एक पंजा वर करून स्वतःचंच पोट चाटत असतं. बस यायच्या थोडंसं आधी, का कोण जाणे पण ते वळतं, टा
काव्यरस

आई ... मिटलेला श्वास.. ९

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 23/11/2010 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ८ :- http://www.misalpav.com/node/15526 सांजवेळ का ती अशीच सरुन गेली माझ्या मनात तू पुन्हा विरघळून गेली आकाशी उधळूनी रंग केली प्रतारणा किरणांनी ढळत्या सूर्याची साक्ष आज मावळून आस गेली माझ्या मनात तू पुन्हा विरघळून गेली ||२|| चांदण्यांच्या प्रकाशात चंद्रकोर हरवून गेली नयनांच्या कोरीव बांधावर आज आसवे न्हावून गेली वार्‍याच्या मंद झोतात गवताची पाती हलली आशेच्या पोकळ मेघातून आज स्वप्ने बरसून गेली माझ्या मनात तू पुन्हा विरघळून गेली ||२|| - शब्दमेघ
काव्यरस

परदेशी गेलेल्या मुलास ......./

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 23/11/2010 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
किती वर्षे झाली तू गेला आहेस आता तुझे वय देखील वाढले नाही का ..? तू गेलास तेव्हा मी तसा तरुण होतो आणि तू तर अगदी मस्त होतास आता बरीच वर्ष होऊन गेली बघ अन मी तर आता खूप थकून गेलोय रे कसे वय वाढते माणसाचे ? कळत नाही बघ..!! आता नाहीरे राहिला उत्साह पूर्वीसारखा तू बोलावतोयस खरा पण पायच निघत नाही बघ .. ह्या मातीतून ही माती मला खूप आपली वाटू लागलीयरे आताआताशी ..... आपण बघतोयना एकमेकांना काम्प्युटरवर तेव्हा किती वाटतो आपण जवळ आपण बोलतो किती मनमोकळे .... खूप छान वाटते बघ कितीवेळा तू स्वप्नात येतोस अगदी शाळेतल्या वयाचा असतो तुझ्या हातात कसला कप आणि फुललेला चेहरा मला अजूनही आनंद
काव्यरस

परदेशी गेलेल्या मुलास ......./

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 23/11/2010 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
किती वर्षे झाली तू गेला आहेस आता तुझे वय देखील वाढले नाही का ..? तू गेलास तेव्हा मी तसा तरुण होतो आणि तू तर अगदी मस्त होतास आता बरीच वर्ष होऊन गेली बघ अन मी तर आता खूप थकून गेलोय रे कसे वय वाढते माणसाचे ? कळत नाही बघ..!! आता नाहीरे राहिला उत्साह पूर्वीसारखा तू बोलावतोयस खरा पण पायच निघत नाही बघ .. ह्या मातीतून ही माती मला खूप आपली वाटू लागलीयरे आताआताशी ..... आपण बघतोयना एकमेकांना काम्प्युटरवर तेव्हा किती वाटतो आपण जवळ आपण बोलतो किती मनमोकळे .... खूप छान वाटते बघ कितीवेळा तू स्वप्नात येतोस अगदी शाळेतल्या वयाचा असतो तुझ्या हातात कसला कप आणि फुललेला चेहरा मला अजूनही आनंद
काव्यरस

म्हातारा

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 22/11/2010 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
अरुंधती ची म्हातारपणाची प्रार्थना वाचली आणि दै. सकाळ ४/४/२०१० मधे आलेली कविता देशोदेशीच्या सदरात कॉन्स्टंटाईन पी कवाफी या ग्रीक कवि ची म्हातारा ही कविता आठवली.
काव्यरस

आई ... मिटलेला श्वास.. ८ (मनपक्षी माखले सारे)

लेखक गणेशा यांनी सोमवार, 22/11/2010 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ७ : http://www.misalpav.com/node/15457 पार्श्वभुमी : लहानपणी आई बरोबर शेता मध्ये येणारा नायक, बांधावर बसुन हरबरा खाताना समोरच्या पाखरांना आवाज देवुन उडवुन लावतानाचा नायक आणि नंतर आई नसताना पुन्हा शेतात आल्यावर व्याकुळणारा नायक .. बस्स शेतात बसलो असता बांधावर भासांची टोळी आठवणींच्या दाण्यांची फाटकी माझी झोळी मन होउन पाखरु मायेचा शोधते घास नभी थकलेला चांद केविलवाणा विराण प्रवास आठवांच्या धुळसर वाटेवर मनपक्षी माखले सारे शेतात बसता आठवे मायेचे तुटलेले धागेदोरे -------- शब्दमेघ
काव्यरस

चुंबिण्या येऊ नको तू............

लेखक मयुरेश साने यांनी रविवार, 21/11/2010 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
संपलेला ध्यास आता दोन उरले श्वास आता मोडुनी त्रिज्या सुखाच्या विश्व केले व्यास आता स्वप्न ती देऊन गेली सत्य भासे भास आता जिंकुनी पैजा विजांच्या सोसुदे मधुमास आता ओंजळी अश्रु तुझा "ही " फक्त उरली प्यास आता चुंबिण्या येऊ नको तू डंख मुरले आत आता घेउनी संन्यास जावे हा खरा हव्यास आता मयुरेश साने..दि.२५-ऑक्टोबर-२०१०
काव्यरस

फार पडझड झालीय ह्या शरीराची !!

लेखक प्रकाश१११ यांनी रविवार, 21/11/2010 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
कितीतरी उन्हाळे पावसाळे उलटून गेले शरीराने खूप भोग घेतले भोगून सुख दुख घेतले पचवून पण आता नाही सहन होत त्याला ह्या ऋतूंचे बहाणे नाही सहन होत ह्या शरीराला आता हे बदल थकून गेलेत त्याचे गात्र नि गात्र गंजून गेलेत ह्या सांध्याच्या बिजागर्या कुरकुरतोय सांधा नि सांधा नेत्र लागलेत पैलतिराला....!! आतला तो असतो अजूनही प्रचंड टवटवीत लाथेने हे जग ठोकरीत तेवढी वाटते प्रचंड हीमत तो आहे तितकाच उत्साही .ताजा टवटवीत मन किती ताजे आहे त्याच्यात अजूनही ताकद आहे हे शरीर सांभाळण्याची पण हे शरीरच गेलेय घाबरून त्यानेच दिलाय धीर सोडून हातपाय बसलाय गाळून संपून गेलीय सारी उमेद किती सांभाळून
काव्यरस