आई ... मिटलेला श्वास.. ८ (मनपक्षी माखले सारे)
भाग ७ : http://www.misalpav.com/node/15457
पार्श्वभुमी : लहानपणी आई बरोबर शेता मध्ये येणारा नायक, बांधावर बसुन हरबरा खाताना समोरच्या पाखरांना आवाज देवुन उडवुन लावतानाचा नायक आणि नंतर आई नसताना पुन्हा शेतात आल्यावर व्याकुळणारा नायक .. बस्स
शेतात बसलो असता
बांधावर भासांची टोळी
आठवणींच्या दाण्यांची
फाटकी माझी झोळी
मन होउन पाखरु
मायेचा शोधते घास
नभी थकलेला चांद
केविलवाणा विराण प्रवास
आठवांच्या धुळसर वाटेवर
मनपक्षी माखले सारे
शेतात बसता आठवे
मायेचे तुटलेले धागेदोरे
-------- शब्दमेघ
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
1613
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
आई -मिटलेला श्वास !!
धन्यवाद मित्रा .. पण या
In reply to आई -मिटलेला श्वास !! by प्रकाश१११
सुंदर, भावस्पर्शी कविता!