Skip to main content

इशारा

पत्र...

लेखक प. शी. यांनी रविवार, 17/09/2017 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय, तु विचारत होतास, कि corporate life कशी आहे. मुळात नाटकात आणि यात जास्त काही फरक नाही. फरक फक्त इतकाच, कि नाटकात तु होतास आणि इथे manager आहे. नाटकाचे प्रयोग असायचे, इथे projects असतात. इथे ही उशिर झाला कि बोलणी बसतात, बर का... उलट ११ चे १२ झाले कि तु फार शिव्या घालायचास... इथ मात्र manager फक्त "Good Morning" असा टोमणा मारतो. इथली लोक यास sarcasm म्हणतात... इथे हि नाटकाप्रमाणे night shifts असतात... फरक फक्त इतकाच, नाटकात सोबती ला चहा असायची इथ मात्र coffee असते. पण इथे night shift ला झोप येते रे... कदाचीत इथल्या coffee त अापल्या चहा सारखी किक् नाही...

बोलशील तर मरशील...

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 06/09/2017 या दिवशी प्रकाशित केले.
बंदुकीची गोळी कशी गोल गोल गोल गोल रक्ताचा रंग कसा लाल लाल लाल लाल सोनू, तू माझ्याशी नीट बोल नीट बोल.... पैशाचा झोल कसा गोल गोल गोल गोल सत्तेचा माज कसा खोल खोल खोल खोल सोनू, तू माझ्याशी नीट बोल नीट बोल.. सोनूची केस कशी वायलंट वायलंट सोनूचा आवाज कसा सायलंट सायलंट सोनू, बोलशील तर मरशील मरशील..... सोssssनूssss शिवकन्या #GauriLankesh etc....

साडेपाच इंच !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 09/08/2017 या दिवशी प्रकाशित केले.
माझं मन कायम ह्या साडेपाच इंची चौकटीत वावरणारं . . . . आजूबाजूला काय चाललंय हे पाहूनही न पाहिल्यासारखं करणारं . . . काही वेगळं दिसलंच तर डोळे असूनही ह्या स्मार्ट खेळण्यातूनच बघतो. . . मग समोर खाद्यजत्रा असो की प्रेतयात्रा . . तोच निर्विकारपणा असतो ! कधीकधी मरणही टिपतो मी दुसऱ्याचं कारण असं चित्र वारंवार कुठे दिसतं ? कासावीस होतो फक्त तेंव्हाच जेव्हा बॅटरी उतरते किंवा इंटरनेट नसतं ! जगात असूनही जगाशी परत जोडण्यासाठी जपतो मी पासवर्ड. . . . . आपण आणि आपला अंडा "सेल", कोणी माणुसकी करता का फॉरवर्ड ?

डिअरपिअर...मॅकबेथले... काळाची उधई गिळी टाकई!

लेखक माहितगार यांनी रविवार, 23/04/2017 या दिवशी प्रकाशित केले.
(माफी नाम्यांची रांग आहे, विडंबन काळाची मांग आहे प्रेर्ना १ प्रेर्ना २) अरे डिअरपिअर कशास बघतोस स्वप्नात जुई...

हे फक्त माणसातच !

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 07/04/2017 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री मासे आणणाऱ्या एकाकी माणसाला बोकेमांजरे चहुबाजूने घेरतात. माणूस पळू लागला कि, त्याच्यावर झेप घेऊन त्याला बोचकारतात. त्याच्या हातातील मासे क्षणार्धात लंपास होतात. मासे मिळताच बोकेमांजरे माणसाला तिथेच सोडून देतात. हे सगळे किती विश्वासाहार्य, predictable आहे! मासे मिळाल्यावर, मासे तर फस्त करायचेच पण माणसाची आतडी बाहेर येईपर्यंत त्याला ओरबाडत, बोचकारत रहायचे, मग, रात्रीच्या भयाण शांततेत फिस्कारत हिंडायचे ....... हे मात्र फक्त माणसातच ! - शिवकन्या.

( वरपरीक्षा )

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 31/03/2017 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे

नाही का ??

लेखक कवि मानव यांनी बुधवार, 02/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
एकीकडे गोडधोड, एकीकडे पोट दौड, सामाजिक विषमता, नाही का ?? एकीकडे धर्मांद वेडे, एकीकडे दैवत्वाचा बाझार, धार्मिकतेचा मुखवटा, नाही का ?? एकीकडे उंच मनोरे, एकीकडे लहानसे घरटे, हरवला मनाचा मोठेपणा, नाही का ?? एकीकडे घनदाट वर्षा ,एकीकडे भयाण आहे सारे, नीसार्गाचाच कोप हा, नाही का ?? एकीकडे तिमिर न संपणारे, एकीकडे प्रकाश झेपावणारा, अज्ञानचा श्राप हा, नाही का ?? एकीकडे स्वार्थी राज्यकर्ते, एकीकडे दैवी श्रमकर्ते, आपल्या जबाबदारीचा अभाव हा, नाही का ?? मी राहतो व्यस्थ, माझ्या सुखाच्या गोळाबेरीजात, कळावे तयांचे दुखं कैसे, नाही का ?? चला बंध तोडू, मिटवू साऱ्या विषमता, हाती उरला वेळ थोडा, नाही का ??
काव्यरस

(हूं)

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 04/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा आशा मनात तुझी धुसर धुसर, मागताना आवाज कातर कातर, स्मरता जुन्या त्या आठवणींना, दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!! क्लायंट कायम करतो काशी, म्हणतो पगार कसा छापाल छापाल मुहूर्त काढता सणासुदीचा रिलीजला शिव्या अपुर्या पडतील पडतील !!२!! डिजाइन टीमची असते बोंब रिक्वायरमेंट नाही क्लियर क्लियर, क्यूएची आहे नसती कटकट मागे , बग सापडलेत बघा शंभर शंभर!!३!! जरी प्रोजेक्टची अवस्था दीनवाणी हवीच आहे मला सुट्टी सुट्टी असेल जरी क्रिटिकल एरर आता काम दिवाळी नंतर नंतर !!४!!

हर हर महादेव !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 19/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
नुसताच फुत्कार नको...आता डसून दाखवा..... भारतभूच्या सुपुत्रांनो ...आता करुनच दाखवा......! शब्दाचा मार फक्त शहाण्यालाच...मूर्खांना लाथाच घाला.... लाखो अश्राप मातापित्यांचे अश्रू, त्याविना कसे थांबती बोला ? आताही काही बोललो नाही... तर उरणार नाही कणा.... आता नजरा तुमच्यावर आहेत... हर हर महादेव म्हणा...!
काव्यरस

जागली स्पंदने नवी नवी

लेखक रातराणी यांनी बुधवार, 27/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: स्पंदन, सांजवेळ, हृदय, अवचित, मन, मोहरणे वगैरे शब्द इकडून तिकडे गुंफले की आजकाल मराठी रोमँटिक गाणं तयार होतं. बावरे प्रेम हे या पंचनाम्यात समीरसूर यांनी आधुनिक गीत लेखकांवर असे ताशेरे ओढलेले पाहून अंमळ डचमळून आले. त्याचा निषेध म्हणून लगोलग एक गीत लिहून काढले.
काव्यरस