मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हास्य

एक उसासा.....

JAGOMOHANPYARE ·
काव्यरस
ओरिजिनल विडम्बन : पुष्टावलेला तो उंच ऊस मला म्हणतो आता नको खाऊस ओली चिंब झाली झाडे कपडे ही ओले चिंब झाले तुझं ते हळुवार खेचणं माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं आणि हळुच चीर काढणं आणि माझा रस थेंब थेंब पडणं नेहमीच हात चिकट चिकट होणं प्रत्येक उसाला टक लावून बघतोस आणि एकाला ऊचकतोस तुझं उचकणं आणि आमचं पडणं झालय आता संवयीचं शेताला कधी कळणार रे मुळासकट खाऊं नये उसाला?

(अजून आणखी एक ईडंबन केलं आहे.)

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
काव्यरस
पुष्टावलेला तो उंच ऊस मला म्हणतो आता नको खाऊस ओली चिंब झाली झाडे कपडे ही ओले चिंब झाले तुझं ते हळुवार खेचणं माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं आणि हळुच चीर काढणं आणि माझा रस थेंब थेंब पडणं नेहमीच हात चिकट चिकट होणं प्रत्येक उसाला टक लावून बघतोस आणि एकाला ऊचकतोस तुझं उचकणं आणि आमचं पडणं झालय आता संवयीचं शेताला कधी कळणार रे मुळासकट खाऊं नये उसाला? श्रीकृष्ण सामंत

( अजून एक विडंबन केलं आहे)

बामनाचं पोर ·
लेखनविषय:
काव्यरस
.. सर्वत्र दरवळणारा हा मस्त सुगंध... कोणी हाकलले तरी मी जाणार नाही... खारावलेल्या बर्फातले थंडगार शरीर तुझे.. बघताच मन पाघळुन गेले माझे... 'तीच्या' प्रसन्न हास्यानेच दिला होता इशारा तुझ्या अस्तित्वाचा.. पण 'ती' नेहमीच तुझ्यावर बारीक लक्ष ठेवते ... आणि मला झुरवते झालय आता नेहमीचच मला पण मी देखिल दबा धरुन बसलोय... कधी कळणार रे माझ्या मनातील भावना तुला ? .. तु ताजा पापलेट टोपलीतला .. अन मी बोका टपलेला ----------- 'ती' हे कोळीणीला उद्देशून आहे..

(विडंबन केलं आहे)

बेसनलाडू ·
लेखनविषय:
काव्यरस
कोसळणारा तो मंद बाजार, सध्या जडलाय कसलासा असाध्य आजार.. ओले चिंब झाले आकडे तन ही ओले चिंब झाले तुझ ते हळुवार चढणं माझ्याकडे टक लावुन बघणं आणि दणकन् खाली पडणं आणि माझी विजार चिंब चिंब होणं झालय नेहमीचच गार्‍हाणं नेहमीच असं टक लावुन बघतोस आणि मला भिजवतोस तुझ पडणं आणि माझा भिजणं झालंय आता नेहमीचच मला कधी कळणार रे माझ्या खिशातील भावना तुला? प्रेरणा: विडंबन हवं आहे ही विनंती, आर्थिक मंदी, बरेचदा कोसळणारे शेअर् बाजार आणि हवालदील सामान्य गुंतवणूकदार

(चेप राजसा..)

चतुरंग ·
लेखनविषय:
काव्यरस
प्राजूची 'थांब राजसा..' ही कविता वाचली आणी काही वेगळेच दृश्य डोळ्यांसमोर तरळून गेले! इर्शाद!

(तो लिहितो तेव्हा...)

चतुरंग ·
लेखनविषय:
काव्यरस
मिसळपावावर नवीनच आलेले कवी ज्ञानेश ह्यांच्या 'मी लिहितो तेव्हा...' ह्या सुंदर कवितेने आम्हाला स्फूर्ती दिली नसती तरच नवल!