Skip to main content

(तो लिहितो तेव्हा...)

(तो लिहितो तेव्हा...)

लेखक चतुरंग
Published on बुधवार, 15/07/2009 प्रकाशित मुखपृष्ठ
मिसळपावावर नवीनच आलेले कवी ज्ञानेश ह्यांच्या 'मी लिहितो तेव्हा...' ह्या सुंदर कवितेने आम्हाला स्फूर्ती दिली नसती तरच नवल! :) ============ तो लिहितो तेव्हा माझी, बोबडी पहा हो वळते तो इथे सारखा दिसतो अन दशा बावरी होते तो लिहितो तेव्हा सगळ्या जालाचा लगदा होतो शब्दांच्या भडिमाराला मी 'टिपतो', बोळा होतो तो लिहितो तेव्हा लिहिणे, दु:स्वप्न जणू का होते झीनत, हेलन, बिंदूने स्वप्नातच थरथर होते तो लिहितो तेव्हा तेव्हा, तो लिहितो ऐसे काही, जणू डोक्याखाली त्याच्या उशी हिमालयाची घेई.. तो लिहितो तेव्हा मजला, जाणवते जंतर मंतर कवितेला भिडतो 'रंगा', कवितेच्या थोडे नंतर....! ============ -चतुरंग
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 4779
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

या एका 'तो'मधून किती बाण निघाले आहेत!!! वावा... चौफेर आहात अगदी. चांगले विडंबन, त्यातही झीनत, हेलन, बिंदूमध्ये 'चतुरंग' दिसले.

In reply to by श्रावण मोडक

रंगाशेठ, मस्त एकदम! (आस्वादक)बेसनलाडू

In reply to by श्रावण मोडक

रंगाशेठ, एकदम जबर्‍या विडंबन.. (सहमत)केशवसुमार

झालं!! नारळ फुटला यांच्याही स्वागताचा!! :) छान विडंबन! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वा ! मस्त मजा आली वाचून -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

चतुरंगाचा हा कितवा रंग? भलताचा चमकदार आहे ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

रंगाशेठ, चांगल्या कवितेचे तितकेच चांगले विडंबन. बर्‍याच दिवसांनी मजा आली. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

कोण आहे रे तो? एका तो मधून बरेच काही सूचित !! तो लिहितो तेव्हा सगळ्या जालाचा लगदा होतो हे तर भारीच !!

बाकी विचार करत आहे कि तुमच्या कविते मधे "तो" एवजी "ती" वापरुन एका कवियेत्रीला समर्पित करु, ज्यांच्या कविता कधीच मला आणी बर्‍याच लोकांना उमजल्याच नाही... :D

विडंबन मस्तच जमलंय. मिपावरच्या सूर्याने न पाहिलेलं साहित्य वाचून आनंद झाला.

तो लिहितो तेव्हा मजला, जाणवते जंतर मंतर कवितेला भिडतो 'रंगा', कवितेच्या थोडे नंतर....! मस्त विडंबन. :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

मस्त.. मजा आली :) अवांतरः "नसतेस घरी तू जेव्हा" च्या चालिवर नीट म्हटता येतंय ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

कर्कशी सहमत. विडंबन आवडलं. -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे