थांब राजसा..
प्रेषक, प्राजु, Tue, 21/07/2009 - 06:20
रात मधुमती, चांद संगती
थांब राजसा जाऊ नको..
स्पर्श अमृती, रे तुझी मिठी
दूर उभा तू राहू नको..
थांब राजसा जाऊ नको..
स्पर्श अमृती, रे तुझी मिठी
दूर उभा तू राहू नको..
धरेस बिलगुन, गगन झोपले
गळा चांदण्-मणी गुंफले
दूधाळ होई , अकाश गंगा
क्षितिज माखले , जांभूळ रंगा
रंग मिलनी पुसटू नको..
थांब राजसा जाऊ नको..
रूणझुण वाजे पुन्हा पाऊल
नव्या उषेची नवी चाहूल
आर्त स्वरांनी रात पुकारे
मनी मिलनी, नवे धुमारे
स्वप्न टिपेला नेऊ नको..
थांब राजसा जाऊ नको..
मिठीत ओल्या, मला राहु दे
मधुमिलनी, मला न्हाऊ दे
कुशित तुझा गंध घेऊ दे
उरांत तुझा छंद लेऊ दे
रात सुनी ही ठेऊ नको
थांब राजसा जाऊ नको..
- प्राजु
काव्यरस:
लेखनविषय::
प्रतिक्रिया
फारच छान ...
जाम आवडली ...
जगण्याचे त्रैराशिक मांडण्याचा प्रयत्न आणि त्याला फुटलेली वाचा ..
इथे वाचा
http://trairashik.blogspot.com
सुरेख,
सुरेख, आवडली !
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
प्राजुताई,
प्राजुताई, तुमची कविता मनाला भिडली बर्र का!
- कोकणी फणस
======================
कोकणी फणस
आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/
मस्त
मस्त कविता. आवडली.
कवितेला असलेल्या विशिष्ट लयीमुळे वाचायला छान वाटत आहे.
--शाल्मली.
--शाल्मली.
असेच म्हणतो
(सहमत)बेसनलाडू
मस्त!
कविता मस्त आहे.
खूप आवडली.
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
छान भावना!
आमचा 'दूसरा' इथे वळलेला आहे!
(मुरली)चतुरंग
वा ! छान
वा ! छान कविता. आवडली
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात
-- लिखाळ.
तेच ते तेच ते !
छान कविता.
छान कविता.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
"फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची " -अरुण म्हात्रे
मस्त
मस्त कविता.
--अवलिया
--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..
कविता
कविता आवडली
निखिल
================================
सुंदर
छान आहे कविता, एकदम तालात
लयदार
अरे वा! छान लयदार कविता.. वाचायला मजा येतेय
आवडली..
(लयदार)ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
ऋषिकेश
------------------
माझे मिपावरील लेखन इथे वाचा
प्राजक्ता,
मस्त!
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
मस्त
मस्त कविता..!! खुप आवडली...
मी माझी..
चिंब भिजलेले .. रुप सजलेले.. बरसुनी आले.. रंग प्रितीचे..
अवेळी दिव्याची वात जाईल... रात फुलांना गंध येईल.... अनोखे पाखरु गाणे गाईल.. तेव्हा तुला माझी आठवण येईल..
बंध रेशमी तुझ्यासवे जे जुळले.. अन क्षितिजावर रंग नवे अवतरले.. घन दाटताच एका क्षणात ते रंग-बंध विस्कटले..
एकदम छान
एकदम छान.
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
छ्या!
छ्या! पुन्हा एकदा प्रेमकविता..
ठीक वाटली..
तात्या.
-- या आमच्या शिळोप्याच्या ओसरीवर.. बसा घटकाभर..!