हास्य
बुधवारची कविता: तमाशा
विधानसभेच्या बोर्डावर अबूचा तमाशा
हिंदीची पुंगी अन मराठीचा ताशा
मराठीची सक्ती अन् वांजळेची शक्ती
काँग्रेसची लोचटगिरी अन् मनसेपासून मुक्ती
राष्ट्रभाषा हिंदी म्हणत मराठीचा र्हास
बंडलबाजी करुन म्हणती,"विधायक मार्गाचा ध्यास"
सामान्य माणूस म्हणे 'कशाला आम्हाला त्रास'
म्हणतो ना तोच "भैया,दो पानीपुरी और दो पान खास"?
म्हणो कोणी काही, हलकट राजकारण्यांचा अनर्थ
"भाषा माझी मराठी, मी पाहीन माझा स्वार्थ"
मालक, मित्र,समविचारी पाठींबा स्वाभिमान्यांचा
गांधीगिरी सोडून बसंत्री वाजवती ढोल वांजळेचा
-पुण्याचे पेशवे
अबू आझमीची लावणी..!
(शांता शेळके, आशा भोसले आणि लता मंगेशकर यांची क्षमा मागून)
(कालच्या विधानसभेतील प्रसंगानंतर अबू आझमी असंच काही म्हणत असावेत)
मनसेच्या कदमांनी,
आणि शिशिर शिंद्यांनी,
कानाखाली आवाज ऐसा काढीला...
हात नका लावू माझ्या दाढीला...
पर्वा केली नाही मी विनंतीची,
मतं मोठी माझ्यासाठी हिंदीची.. हिंदीची बाई हिंदीची
धावला वसंता पुढे, वांजळेही जोडीला...
हात नका लावू माझ्या दाढीला...
निलंबन झालं मोठ्या थाटात जी थाटात.
चार डबे चार वर्ष यार्डात जी यार्डात.
नऊ डबे अजुन बाकी "इंजिनाच्या" गाडीला...
हात नका लावू माझ्या दाढीला...
मने जिकली मराठी माणसाची,
मती गुंग झाली सेना भाजपाची...
काव्यरस
(पोटातला कावळा)
कच्चा माल
भग्न खवल्यांचे तळे दाटलेले
तुझे अंगही पूर्ण पाणावलेले
मनी आठवे आमटीचा वाफारा
काटे गिळतांना घशां टोचलेले
असे मी मनाच्या खुशीच्या महाली
जरी विळीने हात रक्ताळलेले
सुखाची करू कामना मी कशाला?
सुर्मई-भाताचे मीलन ठरलेले
असे डांबिस पूर्ण कृतज्ञ तुझा
मला आज हे प्राण तू वाहिलेले
||ओम श्री परमेश्वरस्य प्रथमावतारः नमः ||
:)
काव्यरस
(कवी)
सुवर्णमयींची माफी मागुन हे दु:ख विडंबन
स्वतःला कवी समजुन
काहीजण प्रयत्न करतात
ढापले म्हणु नये म्हणून
शब्द बदलतात
समोर जे जे दिसेल
त्यावर
कविता करतात
भुक्कड माणसे!
पण वाचकांना
अर्थ लागतोच असं नाही
अथवा
डोके बंद करुन
लिहित असतो कवी!
इथेच सगळी गोची आहे
फुलांनी नटलेला वसंत
अल्लड हसणारी
लहान मुले
प्रेम, प्रेमभंग, मन, आभाळ, श्रावण, पाउस अन्
वर्षानोवर्षे चालणारे
फुटकळ विषय
सगळे जेव्हा लोकांसमोर येते
तेव्हा
काव्य झालेले असते
सजलेले, सजवलेले ,
व्रुत्ताच्या चौकटीत असते
मोहवणारे असते
खर आहे-
विषय साधे असतात, कवी चलाख असतो!
काव्यरस
(मुक्तिदाता)
श्रावण मोडकांची मुक्तिदाता वाचुन हे काही तरी मोडकं तोडकं ;)
प्र-भाव, तर्र, बोळा
देशी, विदेशी, वारुणी!
बालांच्या कल्लोळात,
इंद्रियांच्या अविष्कारातही
उच्चाराच्या अपेक्षेत,
उद्गाराच्या प्रतीक्षेतही
तराठलेल्या डोळ्यांत,
जडावलेल्या पापण्यांतही
विरलेल्या विस्मृतीत,
दाटलेल्या आठवणींतही
सुन्न एकटेपणात,
समुहांच्या दाट गर्दीतही,
सकाळी दुपारी,
संध्याकाळी रात्रीही
भरलेल्या मद्यालयात,
आभास अन् अस्तित्त्वाचा
आसक्त मुक्तिपावक
टुल्लतराठ बेवडा
काव्यरस
(बलुतं)
कौतुक शिरोडकरांची बलुतं वाचुन एक हि & ही प्रयत्न टारझन रावांस अर्पण ;)
तसा अनेकांनी प्रयत्न केला
त्याच्या बालिशपणाला आवर घालण्याचा,
फसलेल्या स्थळांचा पराक्रम करणार्या
दादाला सरळ करण्याचा,
षडरिपूंनी चढवलेल्या कल्पनांना
विडंबनरुपी विरजण घालण्याचा,
पण किडे वळवळणारा आणि हो उद्योग
जन्मसिद्ध अधिकार्यासारखाच...
या प्रवृत्तीचे मूळ शोधण्यासाठी
ग्रंथसंपदा चाळण्याची गरज नाही....
दहावीला असंख्य कल्पना पुजुनच
जन्माला आलाय तो...
गटण्यासारखाच...
म्हणून तर ....
किडे वळवळणारा आणि हो उद्योग
जन्मसिद्ध अधिकार्यासारखाच...
जसा पहिल्यांदा तसाच आताही.......
काव्यरस
<काहीच्या काही ...> अर्थातच कैच्या कै
आमची प्रेरणा
आभास कविता
कि पास कविता
*त्यास कविता
मिळालेली |
हे शिडशीडीत
ना फटफटीत
ना धडधडीत
साध्य कसे ?
अर्थ गर्भ पोरी
खिसा कशी जाळी
गूढ कधी काळी
घे जाणोनी |
शब्दांचा कंटाळा
अर्थांचा घोटाळा
नि*धाचा पाचोळा
फार झाला |
तो श्वास, नि: श्वास
लसणाचा वास
सार बाजू त्यांस
आज तूही |
मागणी प्रमाणे
प्रेम प्रसवावे
मूढ प्रेमीस रे
कोणी सांगा |
चलनात नाणे
मद्य आणि खाणे
'बार' ' बार' करणे
एक सत्य |
पाहिजे तनू
जे पाहता स्तब्ध
करी नाद लुब्ध
समोरच्यास |
आम्हा व्यथा फार
नको पुन्हा भार
जगू क्षण चार
एकट्याने |
जो घेई अर्जंटं
होई डॉक्टरी पेशंट
तो इंटेलिजंटं
होई
(किराणा मालाच्या दुकानाचा अति संक्षिप्त इतिहास...)
किराणा मालाचे दुकान काढावे असे माझ्या मनात आले, आले गेले मला सल्ला देउ लागले, लागले सवरले काही तर आम्हाला सान्ग म्हणत सर्वजण, सर्वजण मदत करु लागले आणी दुकान सुरु झाले, झाले सुरु दुकान तसे सगळे मिपाकर खरेदीला यायला लागले, लागले यायला बरेच लोक तसा मला स्टाफ़ कमी पडु लागला, लागला तसा नोकरीला दुकानात माझ्या अवलिया व परा, परा मग येइल जाइल ते पाखरु न्याहाळु लागला, लागला मग वाटु मला सिन्सियर एकच अवलिया, अवलिया झाला कालान्तराने मग म्यानेजर, म्यानेजर झाला तसा लागला हा कविता करु नाना, नाना नाना म्हणत पोरी गोन्डा घॊळवु लागल्या, लागल्या हिशोबाची वजा जाता मला घाम फ़ुटु लागला, लागला मला शोध मिच दुकानाची ड्
काव्यरस
मिसळपाव