बघ
ती सावलीच ठरली वरचढ उन्हावरी बघ
माझाच जीव जडला माझ्या व्यथेवरी बघ
वारीत पांडुरंगा सावध रहा जरा तू
मारेल चोर डल्ला तुझिया विटेवरी बघ
म्हणतात जे मराठी चित्रपट अता न चाले
नसते पकड जराही त्यांची कथेवरी बघ
साहेब जे कधीही दिसले मुळी न मजला
होते हजर परंतू कायम पटावरी बघ
वाऱ्यामुळे खरेतर पडली कळी उमलती
आरोप त्या बिचाऱ्या आला दवावरी बघ
करतात यार आग्रह बहुतेक याचसाठी
मी बोलतो खरे ते, थोडी पिल्यावरी बघ
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1243
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय सुंदर
मस्त गझल आहे....
आवडल्या गेली आहे
प्रतिसाद दिल्याबद्दल आपण
गझल आवडली
ती सावलीच ठरली वरचढ उन्हावरी