मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आयुष्य

मुखवटे

अनुस्वार ·
लेखनविषय:
घरातून आलो माणसांच्या घोळक्यात अचंबित झालो पाहून नाना रूपे. सुख, दुःख, एकांत वेगळे प्रत्येकाचे मुकी नजर विचारे, "जायचे आहे कुठे?" आकाश सम, जमीन विषम आहे हातात हात घ्यायला पूर्वग्रहांची बंदी आहे. शरीर सारखेच पण पांघरूण 'लायकी'नुसार माणूसकी सोडून सगळे बाकी जोरदार. हाव मनात व्यसन, पैसा अन् वासनेची भूक मिटते रात्रीपुरती, ओढ नाही झोपेची. कत्तली करण्यात मशगुल रक्तपिपासू ओळख न सांगता वाहतात कोरडे आसू. घरी परत जायच्या वाटा बंद केल्या दया आणि करूणेच्या भावनाही मेल्या. यंत्र झालो नाही, माझ्यात आगच पेटेना अनोळख्या गर्दीत कुणी वाटाड्या भेटेना. जीव गुदमरला की माणूस तडफडतो मरणाच्या भितीने हातपाय मारतो.

नकोच ते युद्ध नको

पाषाणभेद ·
लेखनविषय:
नकोच ते युद्ध नको नकोच ते मृत्यू नको सहन न होणार्या वेदना नकोच नको पैशापायी जायी पैसा युद्धापायी भरडते जनता भावनेला घालती गोळी "युद्धच हवे" बोलतो वर नेता रणभुमीवर कुणी मारतो कुणी मरतो बाप, मुलगा, नवरा, भाऊ जातो घर दार कोसळूनी होते सुने नशीबी राही केवळ वाट पहाणे जमावात बातमी युद्धाची ऐकता विरश्री संचारून अंगी हाताच्या मुठी वळतसे परी कुणी एकच घरचा धारातिर्थी पडता युद्ध नको, युद्ध नकोच शब्द वदनी येतसे - पाषाणभेद ०२/०३/२०२२

कळते जगत जाताना

चांदणे संदीप ·
लेखनविषय:
युगायुगांचे असते एकटेपण लाखोंच्या सोबतीने जगताना खोल खोल भासते आयुष्य रितेपन भरून काढताना अनामिक नात्याची वीण दिसते कधी घट्ट बसताना नकळत मग तुटते काही तिथे मनापासून गुंफताना डोळ्यादेखत ढळते, ज्यात वेचले आयुष्य रचताना हे असे घडू नये वाटते नेमके तेच घडत असताना पतंग विसरतो दाहकता पिंगा घालून जळताना आयुष्यही असते असेच कळते जगत जाताना - संदीप चांदणे

सिंधूताई सपकाळ

बाजीगर ·
लेखनविषय:
काव्यरस
अनाथांची एक माय आता राहिली नाय जाता सिंधू सपकाळ गहिवरला खूप काळ असंख्य अन्याय साहिले अपमानांचे धग दाहिले मग मागे नाही पाहिले उपेक्षितांना आयुष्य वाहिले जग वंदू वा नि नींदू होते निराधार जे हिंडू झाली करुणा-सिंधू अनाथाची मान बिंदू एके दिसी दारावर कोण? ना चिट्ठी नाही फोन लिन -दीन ते डोळे दोन पती पापाचे फिटे ना लोन ज्याने केले निराधार उन्मत्त होता जो भ्रतार त्याचाही केला उद्धार विकलांगा दिला आधार झाली जितेपणीच आख्यायिका राखेतून उठता समाज नायिका कीर्ती झाली गुणगान गायिका गौरवू त्या अनाथ आधारदायिका

(स्वप्ना, जागृती, सीमा)

प्रसाद गोडबोले ·
स्वप्ना, जागृती, सीमा आल्या तिघीही घरी कुणास घेवु कवेत अन कुणास ठेऊ दुरी? सीमेसोबत जरा लोळलो कामज्वराच्या धगीं पोळलो स्वप्ना, जागुस शेजेघेऊनी षड्-मोहघटांसवे खेळलो (स्वसंपादित) (अतिशृंगारिक कडवी स्वसंपादित) (स्वसंपादित) आवेगाचे वेग अनावर असे गळुनी पडताना एकांमेकीं विरुनी जाऊ द्वैत आपुले विस्मरताना - शृंगार्_रात्रीं

मुखवटे

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
खरे चेहरे झाकण्या चढवूनी खोटे मुखवटे खरेच आहे भासवतात मग ते चेहरे खोटे ||१|| मनात कटूता असूनी वाहवा करती हसूनी खोटे वार करती पाठीवरती ||२|| तोंडदेखला आदर देवूनी स्वागत होई पाठ वळता निंदा करण्याची करती घाई ||३|| स्वार्थ साधण्या स्तूती करती तोंडभरूनी कार्यभाग संपला, टिकेची झोड वदनी ||४|| खोटे चेहरे वागवीत खोटे जीवन का जगावे? मुखवट्याविना खरे चेहरे जगाला दाखवावे ||५|| - पाषाणभेद २१/०९/२०२१

माझे अन इतरांचे

पाषाणभेद ·
लेखनविषय:
माझेच दु:ख मोठे का? इतरांचे दु:ख छोटे का? हातातले गमावले सारे काही त्यांनी तरी कमावले का? पर्वतासम संकटे आली हादरून मी गेलो, ते नाही का? जे गेले ते माझे होते इतरांचे काहीच नव्हते का? मानले माझे माझे, केले माझे माझे असेच असते इतरांचेही, नव्हे का?

जपून ठेव!

अनुस्वार ·
लेखनविषय:
मी जरा बाहेर जातोय माझे शब्द जपून ठेव. काही तुला आवडलेले काही मुद्दाम न वाचलेले. रात्रीचे, पहाटेच्या स्वप्नांतले बोललेले आणि अबोल राहिलेले. अर्थाच्या शोधात पडू नको तो मलाही लागत नाही. आता शब्दही तुझेच आहेत माझा कोरा कागद पतंग व्हायचं म्हणतोय. अलगद हाताळ या शब्दांना मुलायम असले तरी घावही घालतात. दिसत नाहीत नेहमीच पण असतात जरूर अश्वत्थाम्याप्रमाणे शब्दांनाही शाप आहे अमरत्वाचा. तुझ्याशी नीटच वागतील हे शब्द हृदयातली खळबळ त्यांनी जवळून पाहिलीये. परतीचा प्रवास नाहीच शक्य झाला, तर शब्दांसोबत माझी एक आठवण सुद्धा ठेव. स्वतःला जपून ठेव!

चक्कर

अनुस्वार ·
लेखनविषय:
प्रश्न आयुष्याचा असतो उत्तर असते आयुष्याचे. आपण निव्वळ कोरे कागद नशीब छपाईच्या कामाचे. शब्दांना का कळतो अर्थ लिहिणाऱ्याच्या मनातला? अर्थ कोणता जीवनाला मग जन्म देत असे अज्ञातातला. मृत्यू म्हणजे शेवट कसला? पितरांच्या शांतीत काकही फसला. अनुभवाचे गाठोडे सोडून वर्तमानावर भूतकाळ हसला. विश्वाचे मुळ गूढ भयंकर सोबत नाही एकही शंकर. अंधाराला शोधीत भास्कर पृथ्वीस सांगे, "मारत राहा चक्कर"!

पाचा ऊत्तराची कहाणी

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
काव्यरस
देवाघरची नाती संभाळावी खत पाणी घालुन वाढवावी तेव्हा कुठं प्रेमाच फळ आणी विसाव्या पर्यंतची साथ मिळते पाचा ऊत्तराची (आयुष्याची) कहाणी साठा ऊत्तरी सुफळ संपूर्ण होते जो पर्यंत होत नाही जाळ तो पर्यंत तुटत नाही नाळ कमळाची फुले सोडुन उचलत बसतात गाळ नाईलाजाने आशांची साथ आणी हातातला हात सोडावा लागतो कारण बुडत्याचा पाय खोलात आसतो पण आतला माणुस काही मरत नाही माणुसकीचा उमाळा काही सुटत नाही कधितरी कुठेतरी थांबावेच लागते स्वताःचे अस्तित्व जपावेच लागते नाही सोडली आशांची साथ तर मग तो ठरेल आत्मघात देवाचं काम देवावर सोपवावे माणसातल्या देवाने हरी हरी करीत बसावे पांडुरंग हरी वासुदेव हरी।