गुरुवार. कंपनीतला नेहमीचा दिवस. दुपारच्या जेवणात आमच्या आप्पाने ट्रेकचा विषय काढला. कामाचा ताण खूप होता; कुणाचे काही काम, तर कोण गावी जाणार होता. आम्ही हो-नाही, हो-नाहीला सुरुवात केली. मी, विक्या, वैभ्या, बापू, पप्या, अण्णा, आप्पा ( हायटेक सॉफ्टवेअरमध्ये असलो तरी घरगुती टोपणनावांची प्रथा आम्ही कायम ठेवली आहे.) चर्चेला सुरुवात झाली. पाऊस नुकताच सुरु झाला होता, शनिवार धरून ‘तिकोणा’ गाठायचे ठरले. जेवण आटोपून जागेवर आलो. कोणी गूगलवर नकाशे बघू लागला, कोणी आधी कोण जाऊन आले आहेत त्यांचे फोटो बघू लागला. आता खरी सुरुवात झाली होती. मी खायला काय न्यायचे, पाणी की ताक, इत्यादी गोष्टी बघू लागलो.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे
माझा अतिशय आवडता किल्ला....
छान लेख
मस्त लेख...
चांगले विचार आहेत, आणि लेख पण
In reply to चांगले विचार आहेत, आणि लेख पण by जॅक डनियल्स
तुमचा मुद्दा योग्य आहे