मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०१३

निवळशंख डोळे

मिसळलेला काव्यप्रेमी ·

निवळशंख डोळे

क्षितिजावर पसरलेली लाली सूचिपर्णीवृक्षांनी पांघरलेले गडद धुक्याचे अस्तर आणि तुझे निवळशंख डोळे बस्स..

म्हैसूरपाक

सानिकास्वप्निल ·
. साहित्यः दीड वाट्या बेसन दोन वाट्या साखर १/२ वाटी पाणी २ वाट्या तूप वेलचीदाणे . पाकृ: साखरेत पाणी घालून पाक करायला ठेवावा. दुसर्‍या भांड्यात तूप कडकडीत गरम करायला ठेवावे. तूप गरम होत असताना डावभर तूप बेसनात घालून चांगले चोळून घ्यावे. पाकाला उकळी आली की त्यात वेलचीदाणे घालावे. पाक

दिवाळी

मीनल ·
मिटवुनी रात्र काळी, झळके पहा दिवाळी ओल्या नव्या सकाळी, आली पहा दिवाळी पसरे नभी झळाळी, उठवे पहा दिवाळी झाकोळुनी नव्हाळी, नटते पहा दिवाळी कोवळी कळी डहाळी, उमले पहा दिवाळी शोभुनी दारी रांगोळी, सजते पहा दिवाळी ज्योत ज्योत पिवळी, उजळे पहा दिवाळी आतशबाजी आभाळी, चमके पहा दिवाळी गोडधोड फराळी, खुणावते पहा दिवाळी नातीगोती कोवळी, जपते पहा दिवाळी शांती, सुख ओंजळी, घालते पहा दिवाळी सुचवुनी चार ओळी, बोलते पहा दिवाळी अशी ही मराठमोळी, सुखावते पहा दिवाळी. मीनल गद्रे.

तमसो मा ज्योतिर्गमय

प्यारे१ ·
 दीपावली. दिवाळी. सणांचा जणू राजा. भारतीय संस्कृतीमधल्या उत्सवप्रियतेचा जणू कळस. सण प्रकाशाचा, रोषणाईचा, आतषबाजीचा. सण गोडाधोडाचा, अभ्यंगस्नानाचा, सुवासाचा, सडा घातलेल्या अंगणातल्या सुंदर रांगोळीचा, तुळशीवृंदावनाबरोबर जपल्या जाणार्‍या पावित्र्याचा. थोडा दिनविशेषांचा विचार करुया. भारतीय समाजजीवनामध्ये माणसाबरोबरच निसर्गातील मानवासाठी उपयुक्त जवळपास प्रत्येक गोष्टीला सणावारां मध्ये समाविष्ट करुन त्याबद्दल एक प्रकारची कृतज्ञ भावना जपण्याचा नेहमीच प्रयत्न असतो.

मिपाकरांचे मंगळावर संमेलन

मुक्त विहारि ·
मंगळावरील पहिले संमेलन आणि तेसुद्धा मिपाचे! गेले काही दिवस श्री. प्रमोद देर्देकर ह्यांनी मिपाचे एक जागतिक संमेलन व्हावे, असा विचार मांडला. बराच ऊहापोह चालू होता. (गदारोळ हा शब्द मुद्दाम टाळला आहे. जुन्या, जाणत्या आणि नेणत्या मिपाकरांना माहीत आहे की मिपावर बर्‍याचदा गदारोळच होतो.) थोडीफार चर्चाही होतीच चालू. मीही दोनतीन ठिकाणांना अनुमोदन दिले. आपल्या पिताश्रींचे काय जाते, असे म्हणून गप्प बसलो होतो. दसरा झाला आणि आम्ही थोडे मोकळे झालो. उगाच आपला टाईमपास करायला म्हणून प्रत्येक धागा उघडून मला योग्य वाटेल त्या ठिकाणी प्रतिसादही घालायला लागलो. एकमेकांना व्य.नि.

जाग

मनीषा ·
जाग उसळती काळोखाच्या बहु लाटा अंबरात किनार शुभ्र रुपेरी खुलते कृष्णमेघात ॥ तम गर्द दाटलेले काजळी दशदिशात ॥ शुक्र चांदणी एकली लखलखे निमिषात ॥ रजनी विसावलेली धरेवरी शांत शांत चाहूल असे तिजला हलके येई प्रभात ॥ मधुगंधी गार वारा वाहतो शीळ घालीत डोलतात वृक्षवेली अंगांग भिजे दवात ॥ गवताच्या सान पाती लवलवती तालात फुले फुले उमलुनी बहरला आसमंत ॥ उडती गाती ते पक्षी विहरती आनंदात जागी होत वसुंधरा नाहतसे सोन्यात ॥ -- मनीषा

काजूची फुले

अनन्न्या ·
साहित्यः काजूगर एक वाटी साखर अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी खाण्याचे रंग. कॄती: काजूगरांची पावडर करावी. साखर बुडेल इतके (साधारण अर्ध्या वाटीला थोडे कमी) पाणी घालून पाक करण्यास ठेवावा.साखर विरघळून बुडबुडे दिसू लागले की त्यात काजू पावडर मिसळावी. गुठळी होऊ देऊ नये. तीन-चार मिनिटे शिजू द्यावे. थोडे घट्ट होत आल्यावर मिश्रण खाली उतरून घोटावे.. गोळा तयार झाल्यावर आवडीनुसार खाण्याचे रंग मिसळावे. फुले करायला घेताना आधी छोटी गोळी करावी. त्याला लांबट गोल आकार द्यावा. त्याचा खालचा भाग तसाच ठेवून वरचा भाग चपटा करावा. मधला भाग कळीसारखा दिसेल असा गुंडाळावा. पुढे कडबोळ्यासारखे गुंडाळावे.

समुद्रमंथन : मानवाचे प्राचीन जलप्रवास

डॉ सुहास म्हात्रे ·
प्रास्ताविक : या लेखातली सर्व माहिती मी केवळ कुतूहलाने केलेल्या आतापर्यंतच्या ‘संदर्भ-उत्खननाचा’ परिणाम आहे. माझा या विषयातला अभ्यास सखोल किंवा परिपूर्ण आहे, असा माझा दावा नाही. तसेच सतत चाललेल्या नवीन संशोधनातून अधिकाधिक विश्वासू पुरावे जसजसे बाहेर येतील, तसतसा आता माहीत असलेल्या इतिहासात भर किंवा बदलही संभवतो. या कारणानेच या प्रकरणाचा प्राचीन मानवाच्या प्रवासासंबंधीच्या लेखमालिकेत अंतर्भाव केला नव्हता. तरीही आतापर्यंत कळलेला हा मानवाचा रोचक जलप्रवास सांगायचा मोहही आवरत नव्हता. त्यामुळे यात काही माहिती थोडक्यात, तर काही तुटकपणे आहे.

म्युझिकल मेमरीज

चौकटराजा ·
 तुम्ही काहीही म्हणा मंडळी पण आमची १९५० च्या दरम्यान जन्मलेली पिढी फार नशीबवान हं. आता एक बरीक खरं की आम्हाला नाही पहायला मिळाला महात्माजींचा 'चले जाव' चा नारा. ना आम्हाला पहायला मिळाले ब्रॅडमनचे एका दिवसात केलेले त्रिशतक! आम्ही वंचित राहिलो प्रभातचे चित्रपट अगदी ताजे ताजे असताना पाहण्यापासून. आमच्या नशिबी नव्हताच हो विजय मर्चंट यांचा नाजूक स्क्वेअर कट. मग म़हंमद निसार, लारवूड यांचा तुफानी मारा निरखणे दूरच.