साहित्य: तीन मोठ्या वाट्या मैदा, सहा ते सात टीस्पून्स साजुक तूप/डालडा,तीन टेबलस्पून्स् तांदूळ पिठी , कक्ष तापमानाचे पाणी, चवीपुरते मीठ, दीड मोठ्या वाट्या साखर, वेलदोडा पूड, केशर, आवडत असल्यास केशरी रंग, लिंबूरस, सजावटीसाठी उपलब्ध असलेले नट्स, तळणीसाठी तेल.
कृती: प्रथम परातीत साडेतीन टीस्पून्स तूप कणी मोडेपर्यंत हाताने फेसावे. मीठ घालून फेसावे. त्यात मोजलेला मैदा घालून त्यास तूप चोळावे. मुटका वळता आला पाहिजे असे मिश्रण झाले म्हणजे थोडे थोडे पाणी घालून पोळीच्या कणकेइतपत घट्ट भिजवावे. हा मैद्याचा गोळा झाकून ठेवावा.