संपादकीय

नमस्कार मंडळी, मिसळपाव संस्थळाकडून हा सलग दुसर्‍या वर्षीचा 'दिवाळी अंक' सादर करताना मनात अभिमान अन आनंद याशिवाय कोणत्याच भावनेला थारा नाहीये. हे संपादकीय जरी मी लिहीत असले, तरी या अंकावर आपल्या सर्वांचा हक्क आहे. कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस जागून, खपून, ठरवून केलेल्या कार्यक्रमाची गोडी या दिवाळी अंकालाही आहे. संपादक मंडळाने दिवाळी अंकाची जाहिरात केल्या दिवसापासून ते अगदी आजपर्यंत भरघोस लेखनाचा आशीर्वाद आम्हाला तुम्हा सदस्यांकडून लाभला, आणि या आशीर्वादाबद्दल, तुम्ही दाखवलेल्या या आत्मीयतेने आम्ही सर्वच जण अतिशय भारावून गेलो आहोत. अन का नाही असणार आत्मीयता आपल्या सर्वांना? मिपा आहेच तसं!

अभंग

शब्दांमध्ये ताकद असते, या शब्दांना सुरांची सजावट केली कि ते अधिक प्रभावी होतात, अर्थ भावनेसाहित ऐकाणाऱ्यापर्यंत पोहोचतो. माझा अभंग "चरणी ठेवुनी माथा…" असाच सजवला गेला आहे. चाल आणि गायन आहे माझा मित्र श्री. अतिंद्र सरवडीकर याचे, शब्द - सचिन पु. कुलकर्णी (सार्थबोध) संगीत संयोजन श्री. ओंकार गोखले, ध्वनी तंत्रज्ञ श्री. संदीप इंदप, ध्वनी मुद्रण - स्वरसंवाद, मुंबई. गाण्याचे सर्व हक्क संबंधित कलाकारांकडे आरक्षित. अभंगाची लिंक इथे देत आहे.

असू दे

दिवाळीत फार फार प्रदूषण होतं. पण वात पेटवून दोन्ही कान गच्च दाबत जीव खाऊन दूर पळणारं पोरगं.. वळून वळून पाहात राहतं.. धम्माड स्फोट होतो.. पण आपल्याला काही होत नाही.. या जाणिवेत खूप सुख असतं.. मनगटात बळाच्या मनगट्या चढतात.. पुढे कधीच न चढणार्‍या.. म्हणून असूदेत थोडे फटाके..!! .. तेल तूप बेसन नेहमी महागच होत असतं..

दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा

दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा. शाळेतील दिवाळीची सुट्टी जाहीर झाल्यापासून दिवाळीचा आनंद सुरू व्हायचा. आज येईल, उद्या नक्की येईल, अशी दिवाळीच्या सुट्टीची नोटिस घेऊन येणार्याा शिपायाची आतुरतेने वाट पाहायची. हो, माझ्या लहानपणी शाळेतील प्रत्येक वर्गात ध्वनिक्षेपक वगैरे नसायचा. सूचनावहीद्वारे प्रत्येक वर्गात कुठलीही महत्त्वाची घोषणा व्हायची. तो आला की दिवाळीच्या अनारसारखेच आमचे चेहरे फुलायचे. दिवाळीच्या सुट्टीच्या घोषणेचा आनंद बाक वाजवून साजरा केला जायचा. अगदी ‘मॅडमनी’ किंवा ‘सरांनी’ दिवाळीच्या अभ्यासाच्या नावाखाली तो हिरावून घ्यायचा प्रयत्न केला, तरीही.

श्रीधर

देवांनी दिलेल्या आणि आपल्याला लाभलेल्या या छोट्याशा आयुष्यात आपल्याला किती आणि किती तर्‍हेची माणसे भेटतात! काही जण पहिल्याच भेटीत जिवाभावाचे मित्र होऊन जातात, काही जण अकारण शत्रूसारखे वागतात. काही नीट ओळख झाल्यावर त्याच्याविना जगणे अशक्य करून टाकतात. यामध्ये वयाचा, मानाचा कसलाही मुलाहिजा नसतो. एखादा लहानगाही त्याच्या मोजक्या शब्दांनी आपल्याला विचारात पडतो, तर कधी वृद्धांचे कातरलेले शब्द काळजाला घर करून जातात. ह्या सगळ्यात कधी आपली अपंग, मतिमंद, अंध किंवा काही व्यंग असलेली व्यक्ती जर समोर आली, तर आपण सहसा टाळायचा प्रयत्न करतो. माशी झटकल्यासारखे किंवा तुच्छतेने कटाक्ष टाकून आपण दुसरी वाट घेतो.

गज़ल

सदैव उघडे मज दुःखाचे दार नको फक्त वेदना आयुष्याचे सार नको कोण खेळला कैसा येथे पाहून घे, मला कुणाची जीत नको वा हार नको!!! का विसरावी प्रीत माणसा मनातली जगात कोणी इतकाही लाचार नको मला झेलता यावे इतके पदरी दे, मला पाहिजे ते ही काही फार नको माझा व्हावा मीच दिलासा कायमचा, कोणाचाही खांदा वा आधार नको. --स्नेहदर्शन

कातळ माळ

कसल्यातरी जाणिवेने `ते' जागं झालं. ही जाणीव कसली, ते `त्या'ला कळत नव्हतं. पण ती कशाने शमते, हे चांगलंच माहीत होतं. कुणीतरी त्याला ‘भूक’ अशी संज्ञा दिल्याचं `त्या'ला आठवत होतं. `ते'.... `ते' कधी इथे आलं ते `त्या'लाही आठवत नव्हतं. गेला कित्येक काळ `ते' इथेच पडून होतं. काळ ही आपली संज्ञा झाली. `त्या'च्यासाठी तो अस्तित्वातच नव्हता. आता जाग आल्यावर त्याने पुन्हा अंगावरचं ओझं ढकलून द्यायचा प्रयत्न केला, पण शक्ती क्षीण झालेली.. हेही `त्या'ला नवीन नव्हतं. जाग आली की शक्तिसाठा पूर्णं करून सुप्तावस्थेत जायचं, हेच त्याचं गेल्या कित्येक काळाचं कार्य होतं.

बुंदीचे लाडू

साहित्य: दोन मोठ्या वाट्या हरभरा डाळीचे पीठ (बेसन), दोन टीस्पून मोहनासाठी गार तेल, दोन वाट्या साखर, कक्ष तापमानाचे पाणी, तेल अथवा तूप, वेलदोड्यांची पूड भरडसर, काजू, बेदाणे आवडीप्रमाणे, असल्यास बुंदी पाडायचा झारा, नसल्यास नेहमीचा झारा, डाव. कृती: एका पातेल्यात डाळीचे पीठ पाणी घालून कालवून ठेवावे. गुठळ्या राहू देवू नयेत. त्यात दोन चमचे तेल घालून पीठ घोटत रहावे. दोन वाट्या बेसनाला साधारण दीड वाटीपेक्षा थोडे जास्त पाणी लागले. पाण्याचे प्रमाण थोडेफार वेगळे असू शकेल. पिठाची चांगली धार पडू लागली व पीठ चकचकीत झाले की थांबावे. तळणी तापत घालावी. तेल/तूप तापल्यावर आच मध्यम ठेवावी.

जनरेशन गॅप

वेळ : अपरात्र स्थळ : कुणाच्याही घराचा असू शकेल असा हॉल “हाय डॅड” “आलास? बापाला डॅड केलाच आहेस, आता उशिरापर्यंत बाहेर उनाडून त्याला डेडपण कर.” “पण आता मी मोठा झालो बाबा, काळजी कशाला करताय?” “आधी मला सांग, कुठे उधळला होतास इतक्या रात्री?” “चांदण्या बघत होतो!” “निर्लज्जपणे सांगतोयस हे?” “का? तुम्हीच तर लहानपणी दाखवायचात की, कधी कधी मोजायचातसुद्धा.” “त्याला नाइलाज होता. घर गर्ल्स हॉस्टेलसमोरच होतं, म्हटल्यावर..” “काय सांगताय बाबा, ही बातमी आईला द्यायलाच हवी. आई, ए आई” “अरे, मस्करी केली रे, लगेच प्रश्न संसदेत नेऊ नको.
Subscribe to दिवाळी अंक २०१३