साहित्य: दोन मोठ्या वाट्या हरभरा डाळीचे पीठ (बेसन), दोन टीस्पून मोहनासाठी गार तेल, दोन वाट्या साखर, कक्ष तापमानाचे पाणी, तेल अथवा तूप, वेलदोड्यांची पूड भरडसर, काजू, बेदाणे आवडीप्रमाणे, असल्यास बुंदी पाडायचा झारा, नसल्यास नेहमीचा झारा, डाव.
कृती: एका पातेल्यात डाळीचे पीठ पाणी घालून कालवून ठेवावे. गुठळ्या राहू देवू नयेत. त्यात दोन चमचे तेल घालून पीठ घोटत रहावे. दोन वाट्या बेसनाला साधारण दीड वाटीपेक्षा थोडे जास्त पाणी लागले. पाण्याचे प्रमाण थोडेफार वेगळे असू शकेल. पिठाची चांगली धार पडू लागली व पीठ चकचकीत झाले की थांबावे. तळणी तापत घालावी. तेल/तूप तापल्यावर आच मध्यम ठेवावी.